पाणी राहत नाही असे फुटके हौद
पाणी राहत नाही असे फुटके हौद
बायबल काळांत, पाणी साठवण्याच्या उद्देशाने प्रामुख्याने जमिनीखाली हौद खणले जायचे. काही काळासाठी, वचनयुक्त देशांत हे पाण्याचे हौद पाणी साठवण्यासाठी एकमात्र माध्यम होते.
देवाचा एक संदेश लिहून ठेवताना संदेष्टा यिर्मया लाक्षणिक अर्थाने हौदांचा उपयोग करीत म्हणाला: “माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.”—यिर्मया २:१३.
“जिवंत पाण्याचा झरा,” असलेला आपला देव यहोवा याला सोडून इस्राएली लोक मूर्तीपूजक राष्ट्रांबरोबरच्या डळमळणाऱ्या लष्करी संबंधांकडे व शक्तिहीन खोट्या दैवतांच्या उपासनेकडे वळाले. ही तथाकथित आश्रयस्थाने, यिर्मयाने तुलना केल्याप्रमाणे गळक्या हौदांप्रमाणे होती ज्यांत कसलेही संरक्षण करण्याची शक्ती नव्हती.—अनुवाद २८:२०.
या ऐतिहासिक उदाहरणावरून आज आपण काही शिकू शकतो का? यिर्मयाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे, सर्वकाळचा देव यहोवा आजही जिवंत पाण्याच्या झऱ्याचा उगम आहे. (स्तोत्र ३६:९; प्रकटीकरण ४:११) केवळ त्याच्याकडून आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे मानवांना सार्वकालिक जीवन मिळू शकते. (योहान ४:१४; १७:३) तरीपण यिर्मयाच्या दिवसांतील लोकांप्रमाणे आजही बहुसंख्य मानवजात बायबलमध्ये विदित केलेले देवाचे वचन नाकारतात आणि त्याला क्षुल्लक लेखतात. त्याऐवजी ते तात्पुरत्या राजकीय उपायांवर, पोकळ मानवी तर्कांवर आणि देवाचा अपमान करणाऱ्या निरर्थक कल्पना व तत्त्वज्ञान यांच्यावर आपला भरवसा ठेवतात. (१ करिंथकर ३:१८-२०; कलस्सैकर २:८) आता तुमच्यासमोर स्पष्ट निवड आहे. तुम्ही तुमचा भरवसा कोणावर ठेवणार? “जिवंत पाण्याचा झरा” असलेल्या यहोवावर की ‘ज्यांत पाणी राहत नाही अशा फुटक्या हौदांवर’?
[३२ पानांवरील चित्र]
इस्राएलमधील एका कबरेत सापडलेली माता दैवतेची टेराकोटाची मूर्ती
[चित्राचे श्रेय]
Photograph taken by courtesy of the British Museum