व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गिलियड पदवीधरांना ‘महत्कृत्ये सांगण्याचे’ उत्तेजन देण्यात आले

गिलियड पदवीधरांना ‘महत्कृत्ये सांगण्याचे’ उत्तेजन देण्यात आले

गिलियड पदवीधरांना ‘महत्कृत्ये सांगण्याचे’ उत्तेजन देण्यात आले

सप्टेंबर १३, २००३ रोजी, वॉचटावर बायबल गिलियडच्या ११५ व्या वर्गाच्या पदवीदान समारंभासाठी ५२ देशांतून आलेला ६,६३५ जणांचा एक उत्तम समूह उपस्थित होता.

या समूहाने, १७ देशांतील लोकांना ‘देवाची महत्कृत्ये’ सांगण्याचे वर्गातील ४८ विद्यार्थ्यांना बायबलमधून जे उत्तेजन देण्यात आले ते ऐकले. (प्रेषितांची कृत्ये २:११) याच १७ देशांमध्ये हे पदवीधारक, आपले मिशनरी कार्य पूर्ण करणार आहेत.

आपल्या भाषणाच्या सुरवातीला, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य आणि पदवीदान समारंभाच्या वेळी चेअरमन असलेले बंधू स्टीफन लेट यांनी विद्यार्थ्यांना अशी आठवण करून दिली: “तुम्ही तुमच्या नेमणुकांसाठी कोठेही गेलात किंवा तुमची कोणतीही परिस्थिती असली तरी, तुमच्याविरुद्ध जितके आहेत त्याच्या कितीतरी पटीने अधिक तुमच्याबरोबर आहेत.” दुसरे राजे अध्याय ६ चा उपयोग करून बंधू लेटने विद्यार्थ्यांना याची आठवण करून दिली, की ‘देवाच्या महत्कृत्यांचे वर्णन’ करत असताना ते यहोवा देव पुरवत असलेल्या साहाय्यावर आणि अगणित देवदूतांवर विसंबून राहू शकतात. (२ राजे ६:१५, १६) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी प्रचार व शिकवण्याचे कार्य करताना विरोधाचा, लोकांच्या उदासीन प्रवृत्तीचा सामना केला; आज ख्रिस्ती मिशनरी देखील अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत. परंतु, ते स्वर्गातून येणाऱ्‍या साहाय्यावर आणि यहोवाच्या स्वर्गीय संघटनेवर भरवसा ठेवू शकतात.—स्तोत्र ३४:७; मत्तय २४:४५.

‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ बोला

चेअरमनच्या उद्‌घाटनपर बोधानंतर संयुक्‍त संस्थानाच्या शाखा समितीचे सदस्य हॅरल्ड कॉर्कन यांनी, “वाजवी अपेक्षा—आनंदी व यशस्वी सेवेची गुरूकिल्ली” या विषयावर भाषण दिले. नीतिसूत्रे १३:१२ दाखवते त्याप्रमाणे पूर्ण न झालेल्या आशांमुळे एखादी व्यक्‍ती निराश होऊ शकते, असे बंधू कॉर्कन यांनी सांगितले. परंतु, बहुतेकदा अवास्तविक अपेक्षा, ज्या पूर्ण होत नाहीत, त्यांच्यामुळे आपण निराश होऊ शकतो. पदवीधारकांनी स्वतःविषयी आणि इतरांविषयी संतुलित, वास्तविक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. आपल्या हातून चुका होतील, हे त्यांनी अपेक्षिले पाहिजे परंतु यामुळे, लोकांना ‘देवाची महत्कृत्ये’ समजण्यास मदत करत असताना त्यांनी नाराज होऊ नये. बंधू कॉर्कन यांनी नव्या मिशनऱ्‍यांना, यहोवावर विसंबून राहण्याचे उत्तेजन दिले कारण यहोवा ‘त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ’ देतो.—इब्री लोकांस ११:६.

कार्यक्रमातील पुढील भाषण नियमन मंडळातील सदस्य बंधू डॅनियल सिडलिक यांचे होते; “ख्रिस्ती आशा—ती काय आहे?” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. ते म्हणाले: “आशा एक ख्रिस्ती सद्‌गुण आहे. तो योग्यतेचा दर्जा आहे ज्यामुळे आपण देवाबरोबर योग्य नातेसंबंधात येतो. गैर-ख्रिश्‍चनांना आपल्यासारखी आशा बाळगणे शक्य नाही.” बंधू सिडलिक यांनी, जीवनात येणाऱ्‍या कठीण परिस्थितींमध्येही आशावादी राहण्यास मदत करणाऱ्‍या ख्रिस्ती आशेच्या विविध पैलूंचे वर्णन केले. “ख्रिस्ती आशेमुळे आपण येणाऱ्‍या प्रत्येक दिवसाला नव्या तत्परतेने व विजयी आत्म्याने सामोरे जाऊ शकतो.” एखाद्या ख्रिश्‍चनाची आशा त्याला, यहोवाकडे उद्देश असलेला देव अशा दृष्टीने पाहण्यास आणि आनंदाने त्याची सेवा करण्यास मदत करते.—रोमकर १२:१२.

गिलियड प्रशालेचे रेजिस्ट्रार, बंधू वॉलस लिव्हरन्स यांनी विद्यार्थ्यांना ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहण्याचे उत्तेजन दिले. (गलतीकर ५:१६) त्यांनी हे दाखवले की, यिर्मयाचा सचिव, बारूख याने आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहण्याचे कसे जवळजवळ थांबवले होते. एकदा बारूख दुःखी झाला व स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागला. (यिर्मया ४५:३, ५) बंधू लिव्हरन्स यांनी दाखवून दिले की काहींनी येशूच्या मागे चालण्याचे सोडून दिले आणि तारणासाठी आवश्‍यक असलेले आध्यात्मिक सत्य नाकारले. असे होण्यामागचे कारण म्हणजे येशू जे शिकवत होता ते त्यांना समजले नाही आणि आपल्या शारीरिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे पाहून ते निराश झाले. (योहान ६:२६, २७, ५१, ६६) निर्माणकर्त्याकडे व त्याच्या उद्देशांकडे लोकांचे लक्ष आकर्षित करण्याची ज्यांच्यावर कामगिरी सोपवण्यात आली आहे ते मिशनरी यांतून काय शिकू शकतात? त्यांनी हुद्दा, लोकांची मान्यता मिळवण्याची धडपड करू नये किंवा एखाद्या ईश्‍वरशासित नेमणुकीचा स्वतःच्या लाभासाठी गैरवापर करू नये असे उत्तेजन विद्यार्थ्यांना देण्यात आले.

गिलियड प्रशिक्षक बंधू मार्क न्यूमर यांच्या प्रश्‍नरूपी भाषणाचा विषय, “तुम्ही देणारे व्हाल की घेणारे?” असा होता. त्यांची विधाने, शास्ते ५:२ वर आधारित होती; या वचनात बाराकच्या सैन्यात स्वसंतोषाने सेवा करणाऱ्‍या निःस्वार्थ इस्राएलांची प्रशंसा करण्यात आली आहे. त्यांनी, महान बाराक येशू ख्रिस्त याने आध्यात्मिक युद्धात भाग घेण्यासाठी दिलेल्या आमंत्रणाला स्वच्छेने पुढे येण्याचा आत्मा दाखवलेल्या गिलियड विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. ख्रिस्ताच्या सैनिकांनी, ज्याने त्यांना समाविष्ट करून घेतले आहे त्याचा लोभ संपादण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बंधू न्यूमर यांनी विद्यार्थ्यांना अशी आठवण करून दिली की “आपण स्वतःला खूष करण्यात व्यस्त होतो तेव्हा शत्रूविरुद्ध लढण्यास थांबतो. . . . मिशनरी सेवा ही तुमच्या हितासाठी नाही. ती यहोवाची, त्याच्या सार्वभौमत्वाची आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली सेवा आहे. यहोवाने आपल्याला सुखी करावे म्हणून नव्हे तर त्याच्यावर आपले प्रेम आहे म्हणून आपण मिशनरी म्हणून सेवा करत आहोत.”—२ तीमथ्य २:४.

गिलियडचे प्रशिक्षक, बंधू लॉरेन्स बोव्हन यांनी, “त्यांना सत्यात समर्पित कर” असा विषय असलेले पुढील चर्चासत्र हाताळले. (योहान १७:१७) त्यांनी असे म्हटले, की ११५ व्या वर्गाचे विद्यार्थी देवाचे समर्पित सेवक आहेत. प्रशालेत असताना त्यांनी क्षेत्र सेवेत भाग घेतला, सत्यावर प्रेम करणाऱ्‍या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला. येशू आणि त्याच्या आरंभीच्या शिष्यांप्रमाणे विद्यार्थी, ‘आपल्या मनचे बोलले’ नाहीत. (योहान १२:४९, ५०) त्यांनी आवेशाने ईश्‍वरप्रेरित व जीवनप्रदायक वचन सादर केले. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांवरून आणि सांगितलेल्या अनुभवांवरून, हे दिसून आले, की ते ज्या लोकांना भेटले होते त्यांच्यावर बायबलचा जबरदस्त प्रभाव पडला होता.

सल्ला आणि अनुभव यांतून उत्तेजन मिळाले

संयुक्‍त संस्थाने शाखेतील सेवा विभागातील सदस्य, बंधू अँथनी पेरझ आणि अँथनी ग्रिफिन यांनी जगाच्या विविध भागातून आलेल्या शाखा समितीच्या सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. नवीन मिशनऱ्‍यांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते ते त्यांनी सांगितले व स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी व्यावहारिक सल्ला दिला. काही आव्हाने सांस्कृतिक भेद, संपूर्ण वर्षभर असलेले उष्ण हवामान किंवा विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या राजनैतिक व धार्मिक वातावरणापेक्षा वेगळे वातावरण, अशी असू शकतात. नवीन परिसराशी जुळवून घेण्यास नवीन मिशनऱ्‍यांना कोणती गोष्ट मदत करू शकेल? यहोवाबद्दल व लोकांबद्दल प्रेम बाळगल्याने, मागील गोष्टींचा विचार न केल्याने व अविचारीपणे न वागल्याने त्यांना मदत होऊ शकेल. शाखा समितीचे सदस्य असलेल्या एका बांधवाने म्हटले: “आपल्या नेमणुकीतील लोक, आपल्याआधीपासून तेथे शतकानुशतकांपासून राहत आले आहेत. तेव्हा आपणही निश्‍चितच तेथे राहू शकतो आणि जुळवून घेऊ शकतो. जेव्हा जेव्हा आपल्या समोर अडचणी आल्या तेव्हा तेव्हा आपण सुधारणेसाठी त्यांच्याकडे पाहिले आहे. तुम्ही प्रार्थनेवर आणि यहोवाच्या आत्म्यावर अवलंबून राहिलात तर तुम्हाला ‘मी तुमच्याबरोबर आहे’ या येशूच्या शब्दांची सत्यता पटेल.”—मत्तय २८:२०.

नियमन मंडळाचे सदस्य बंधू सॅम्युएल हर्ड यांनी, “देवाच्या महत्कृत्यांविषयी बोलत राहा” असा विषय असलेल्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता केली. सा.यु. ३३ च्या पेटेंकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आल्यामुळे त्यांना ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ बोलण्याचे प्रोत्साहन मिळाले. अशाच उत्साहाने देवाच्या राज्याविषयी सांगण्यास या मिशनऱ्‍यांना कशामुळे मदत मिळू शकेल? तोच देवाचा पवित्र आत्मा. बंधू हर्ड यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना “आत्म्यात उत्सुक” असण्याचे, आपल्या नेमणुकींविषयी उत्साही असण्याचे व त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे ते कधीही न विसरण्याचे उत्तेजन दिले. (रोमकर १२:११) बंधू हर्ड म्हणाले: “बायबल हे देवाचे एक महत्कृत्य आहे. त्याला केव्हाही क्षुल्लक लेखू नका. त्यातील संदेश जिवंत आहे. तो थेट अंतःकरणाला भिडतो. तुमच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी त्याचा उपयोग करा. त्याला तुमची विचारशैली बदलू द्या. शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याद्वारे, वाचण्याद्वारे व त्यांवर मनन करण्याद्वारे आपल्या विचारशक्‍तीचे संरक्षण करा . . . ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ बोलत राहण्यासाठी आपल्या गिलियड प्रशिक्षणाचा उपयोग करण्याचे ध्येय ठेवा व दृढनिश्‍चय करा.”

जगातील विविध भागातून आलेल्या शुभेच्छा कळवल्यावर व पदवीदानाच्या समारंभानंतर, विद्यार्थ्यांपैकी एकाने, प्रशिक्षणाबद्दल वर्गाच्या वतीने कृतज्ञेचे एक पत्र वाचून दाखवले. बंधू लेट यांनी, २ इतिहास ३२:७ आणि अनुवाद २०:१, ४ यांचा उल्लेख करण्याद्वारे या आनंदी कार्यक्रमाची समाप्ती केली. आपली शेवटली विधाने सुरवातीच्या विधानांशी जोडून त्यांनी समाप्तीस असे म्हटले: “यास्तव, प्रिय पदवीधारकांनो, तुम्ही जसजसे पुढत जात राहाल, तुमच्या नव्या नेमणुकीच्या आध्यात्मिक लढतीत आगेकूच कराल तसतसे यहोवा तुमच्याबरोबर राहील. तुमच्याविरुद्ध जितके आहेत त्याच्या कितीतरी पटीने अधिक तुमच्याबरोबर आहेत हे केव्हाही विसरू नका.”

[२५ पानांवरील चौकट]]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ७

नेमलेले देश: १७

एकूण विद्यार्थी: ४८

सरासरी वय: ३३.७

सत्यात सरासरी वर्षे: १७.८

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.५

[२६ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११५ वा पदवीधर वर्ग

खालील यादीत, ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) ब्राऊन, टी; गोलर, सी.; हॉफमन, ए.; ब्रुझीझी, जे.; ट्रेहन, एस. (२) स्मार्ट, एन.; कॅशमन, एफ.; गारसिया, के.; लोहन, एम.; सिफर्ट, एस.; ग्रे, के. (३) बेकेट, एम.; निकल्झ, एस.; स्मीथ, के.; गुग्लिआरा, ए.; रॅपनेकर, ए. (४)ग्रे, एस.; वासेक, के.; फ्लेमिंग, एम.; बेथेल, एल.; हरमॅन्सन, टी.; हरमॅन्सन, पी. (५) रॅपनेकर, जी.; लोहन, डी.; डिकी, एस.; किम, सी.; ट्रेहन, ए.; वॉशिंग्टन, ए.; स्मार्ट, एस. (६) गोलर, एल.; बर्गहॉफर, टी.; गुग्लिआरा, डी.; निकल्झ, आर.; वॉशिंग्टन, एस.; किम, जे. (७) बेकेट, एम.; डिकी, जे.; स्मीथ, आर.; गारसिया, आर.; हॉफमन, ए.; सिफर्ट, आर.; ब्राऊन, एच. (८) फ्लेमिंग, एस.; ब्रुझीझी, पी.; बर्गहॉफर, डब्ल्यू.; बेथेल, टी.; कॅशमन, जे.; वासेक, के.