व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे कुटुंबीय ते कोण होते?

येशूचे कुटुंबीय ते कोण होते?

येशूचे कुटुंबीय ते कोण होते?

जगाच्या अनेक भागांमध्ये, डिसेंबरच्या दरम्यान, माता मरीया आणि दत्तक पिता योसेफ बाळ येशूची काळजी घेत असल्याची अनेक चित्रे पाहायला मिळतात. ही चित्रे पाहून, स्वतःला ख्रिस्ती न म्हणवणारे लोकही त्यांकडे आकर्षित होतात. ती दृश्‍ये येशूवर केंद्रित असल्यामुळे येशूच्या मानवी कुटुंबाविषयी शास्त्रवचने आपल्याला काय सांगतात?

येशूची कौटुंबिक पार्श्‍वभूमी अत्यंत रोचक आहे. मरीया नावाच्या एका कुमारिकेच्या पोटी तो जन्मला आणि अशातऱ्‍हेने मानवी कुटुंबाचा तो सदस्य बनला. बायबलनुसार, पवित्र आत्म्याद्वारे त्याचे जीवन स्वर्गातून मरीयेच्या उदरात स्थलांतरीत करण्यात आले. (लूक १:३०-३५) येशूच्या चमत्कारिक गर्भधारणेविषयी समजण्याआधी, मरीयेची योसेफ नावाच्या एका पुरुषाशी मागणी झाली होती जो नंतर येशूचा दत्तक पिता बनणार होता.

येशूच्या जन्मानंतर योसेफ आणि मरीयेला इतरही मुलेमुली झाल्या अर्थात येशूचे सावत्र भाऊ आणि बहिणी. ही गोष्ट, नासरेथकरांनी नंतर येशूविषयी केलेल्या प्रश्‍नावरून स्पष्ट होते: “हा सुताराचा पुत्र ना? ह्‍याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसेफ, शिमोन व यहूदा हे ह्‍याचे भाऊ ना? ह्‍याच्या बहिणी, त्या सर्व आपणांबरोबर नाहीत काय?” (मत्तय १:२५; १३:५५, ५६; मार्क ६:३) यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, येशूच्या कुटुंबात, त्याचे आईवडील, चार भाऊ आणि कमीत कमी दोन बहिणी होत्या.

परंतु, येशूचे भाऊ आणि त्याच्या बहिणी योसेफ आणि मरीयेची मुले होती असा काहीजण आज विश्‍वास करत नाहीत. का? न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया म्हणतो, “चर्चने अगदी सुरवातीपासूनच अशी शिकवण दिली आहे की, मरीया नेहमीच कुमारिका होती. त्यामुळे, मरीयेला आणखी मुले झाली नाहीत यात शंकाच उरत नाही.” त्याच संदर्भ ग्रंथात असा दावा केला आहे की, “भाऊ” आणि “बहीण” हे शब्द “एकाच धर्माच्या किंवा इतर बंधनातील एकाला किंवा अनेकांना” किंवा नातेवाईकांना म्हणजे कदाचित भावंडांना सूचित होऊ शकतो.

परंतु हे खरे आहे का? पारंपरिक शिकवणीला मान्य न करणारे काही कॅथलिक धर्मशास्त्रज्ञ देखील म्हणतात की, येशूला स्वतःचे भाऊ-बहीण होते. अमेरिकन कॅथलिक बायबल संघटनेचे पूर्वीचे अध्यक्ष जॉन पी. मायर यांनी लिहिले: “न[व्या] क[रारात] अडेल्फोस [भाऊ] याचा उपयोग लाक्षणिकरित्या किंवा रूपक म्हणून करण्यासाठी नव्हे तर शारीरिक किंवा कायदेशीर नातेसंबंध दर्शवण्यास केला जातो तेव्हा त्याचा अर्थ सख्खा किंवा सावत्र भावाशिवाय इतर कशालाही सूचित होत नाही.” * होय, शास्त्रवचने दाखवतात की, येशूला भाऊ आणि बहिणी होत्या ज्या योसेफाला व मरीयेला झाल्या होत्या.

शुभवर्तमानात येशूच्या इतर नातेवाईकांचाही उल्लेख आहे परंतु आता आपण येशूच्या जवळच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करू या आणि त्याच्याकडून काय शिकायला मिळते ते पाहू या.

[तळटीप]

^ परि. 6 जे. पी. मायर यांचे “ख्रिस्ती परिवाराच्या दृष्टीत येशूचे भाऊ व बहिणी,” द कॅथलिक बिब्लिकल क्वाटर्ली, जानेवारी १९९२, पृष्ठ २१.