व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

आदर्श प्रार्थनेत येशू असे सुचवीत होता का, की दुष्ट देवदूतांना अद्याप स्वर्गातून हाकलून लावण्यात आलेले नसले तरीसुद्धा देवाची इच्छा तेथे पूर्ण होत होती?

मत्तय ६:१० [NW] मध्ये नमूद केल्यानुसार, येशूने म्हटले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझी इच्छा पूर्ण होवो.” अनेक आधुनिक भाषांतरांमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मूळ वचन दोन प्रकारे समजले जाऊ शकते. एक अर्थ असा, की स्वर्गात आधीच देवाची इच्छा जशी पूर्ण होत होती तशी ती पृथ्वीवरही व्हावी म्हणून ही एक विनंती होती किंवा दुसरा अर्थ असा, की स्वर्गात आणि पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्णार्थाने व्हावी म्हणून केलेली ही विनंती होती. * येशूचे अगोदरचे शब्द, “तुझे राज्य येवो” हे सूचित करतात, की दुसरा अर्थ शास्त्रवचनांच्या अधिक सुसंगतेत असल्याचे सुचवतो. त्यावरून, येशू पृथ्वीवर होता तेव्हाच्या आणि त्यानंतरच्या मोठ्या कालावधीतील परिस्थितीला सूचित करतो. तो कसा?

प्रकटीकरणाचे पुस्तक स्वर्गामध्ये देवाचे राज्य स्थापन झाल्यामुळे जे दोन भिन्‍न परिणाम घडले त्याविषयी सांगते. पहिला परिणाम, खुद्द स्वर्गावर झालेला दिसतो आणि दुसरा परिणाम, पृथ्वीवर. प्रकटीकरण १२:७-९, १२ म्हणते: “स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा; पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.”

१९१४ नंतर सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून लावल्यानंतर स्वर्गात सर्व आत्मिक बंड नाहीसे झाले ज्यामुळे यहोवाच्या आत्मिक सृष्टीच्या बहुतांश भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या एकनिष्ठ स्वर्गीय पुत्रांना आनंदीआनंद झाला. (ईयोब १:६-१२; २:१-७; प्रकटीकरण १२:१०) त्यामुळे, येशूच्या आदर्श प्रार्थनेतील विनंती निदान स्वर्गाच्या बाबतीत तरी पूर्ण झाली. त्या स्वर्गीय वातावरणात जे कोणी उरलेले होते ते यहोवाला एकनिष्ठ होते आणि त्याच्या सार्वभौमत्वाला संपूर्णतः अधीन होते.

या आधीसुद्धा, दुष्ट देवदूतांचे स्वर्गामध्ये येणे-जाणे चालू होते तेव्हा देखील, देवाच्या कुटुंबातून मात्र त्यांची हकालपट्टी झाली होती व त्यांच्यावर अमर्यादित काळासाठी प्रतिबंध लावण्यात आले, ही गोष्ट ठळकपणे सांगितली पाहिजे. जसे की, यहुदा ६ मध्ये दिले आहे, की सा.यु. पहिल्या शतकातच त्यांना “निरंतरच्या बंधनात, निबिड [आध्यात्मिक] काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून” ठेवण्यात आले. तसेच २ पेत्र २:४, (पं.र.भा.) म्हणते: “ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर तार्तारोसात [अतिशय हिणकस परिस्थितीत] टाकून न्यायाकरिता राखण्यासाठी निबिड [आध्यात्मिक] काळोखाच्या बंधनांमध्ये ठेवले.” *

देवाच्या कुटुंबातून या दृष्ट देवदूतांना बहिष्कृत केलेले असले तरी त्यांनी पृथ्वीवरील लोकांवर आपला चांगलाच जम बसवला आहे. खरे तर, देवाचे वचन सैतानाला “ह्‍या जगाचा अधिकारी” आणि दुरात्म्यांना ‘काळोखातील जगाचे अधिपती’ असे संबोधते. (योहान १२:३१; इफिसकर ६:११, १२; १ योहान ५:१९) दियाबलाकडे अधिकार असल्यामुळेच तो येशूला, उपासनेच्या एका कार्याच्या मोबदल्यात “सर्व राज्ये व त्याचे वैभव” देऊ करत होता. (मत्तय ४:८, ९) स्पष्टतः मग, पृथ्वीवर देवाचे राज्य ‘आल्यावर’ अभूतपूर्व बदल घडून येतील.

पृथ्वीवर देवाचे राज्य ‘आल्यावर’ पूर्णपणे नवे व्यवस्थीकरण असेल. हे राज्य सर्व मानव-निर्मित शासनांचा अंत करील आणि तेच पृथ्वीचे एकमेव सरकार बनेल. त्याचबरोबर, या राज्याची देवाला भिऊन वागणारी प्रजा “नवी पृथ्वी” बनेल. (२ पेत्र ३:१३; दानीएल २:४४) हे राज्य आज्ञाधारक मानवजातीला पापापासून मुक्‍त करील आणि कालांतराने पृथ्वीचे विश्‍वव्यापी बागेत रुपांतर करेल; अशाने, सैतानी शासनाचा मागमूसही उरणार नाही.—रोमकर ८:२०, २१; प्रकटीकरण १९:१७-२१.

हजार वर्षांच्या शेवटी, मशीही राज्याने पृथ्वीच्या संबंधाने देवाची इच्छा पूर्ण केल्यानंतर “ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रहि होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.” (१ करिंथकर १५:२८) यानंतर, एक शेवटली परीक्षा होईल; मग सैतान, त्याचे दुरात्मे आणि त्यांनी फसवलेल्या सर्व मानवी बंडखोरांना ‘दुसऱ्‍या मरणाद्वारे’ कायमचे नष्ट केले जाईल. (प्रकटीकरण २०:७-१५) यानंतर, स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व बुद्धिमान सृष्टी कायमची आनंदाने यहोवाच्या प्रेमळ सार्वभौमत्वाच्या अधीनतेत राहील. मग त्यावेळी प्रत्येक बाबतीत, येशूच्या आदर्श प्रार्थनेतील शब्दांची सर्वार्थाने पूर्णता होईल.—१ योहान ४:८.

[तळटीपा]

^ परि. 3 द बायबल—ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन, येशूच्या या आदर्श प्रार्थनेतील या भागाचे भाषांतर अशाप्रकारे करते: “तुझे राज्य येवो! जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय ६:१०.

^ परि. 6 प्रेषित पेत्राने या आध्यात्मिकरीत्या बहिष्कृत अवस्थेला ‘तुरूंगात’ असल्याप्रमाणे तुलना केली. परंतु त्याच्या बोलण्याचा अर्थ, भविष्यात हजार वर्षांसाठी दुरात्म्यांना ज्यात टाकले जाईल ते ‘अगाधकूप’ नव्हते.—१ पेत्र ३:१९, २०; लूक ८:३०, ३१; प्रकटीकरण २०:१-३.