व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला आपली काळजी आहे का?

देवाला आपली काळजी आहे का?

देवाला आपली काळजी आहे का?

कौटुंबिक, आरोग्य आणि नोकरीविषयक समस्यांखाली किंवा इतर भारी जबाबदाऱ्‍यांच्या ओझ्याखाली तुम्ही मानसिकरीत्या दबले जात आहात असे तुम्हाला वाटते का? पुष्कळ लोकांना असे वाटते. आणि आज ज्याला अन्याय, गुन्हेगारी, हिंसा यांची झळ लागत नाही असा खरेच कोणी आहे का? आजची परिस्थिती अगदी बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे: “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोमकर ८:२२) म्हणूनच, पुष्कळ लोकांच्या मनात असे प्रश्‍न येतात, जसे की, ‘देवाला आपली काळजी आहे का? तो आपल्याला मदत करेल का?’

सुज्ञ राजा शलमोनाने देवाला प्रार्थना करताना असे म्हटले: “सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस.” शलमोनाचा पक्का विश्‍वास होता, की देव आपल्याला केवळ ओळखत नाही तर त्याला आपल्यातील प्रत्येकाची काळजी आहे. यामुळे ‘आपणास होणारे क्लेश किंवा दुःख ओळखून जो प्रार्थना’ करतो अशा देवभीरू व्यक्‍तीची प्रार्थना “स्वर्गांतील आपल्या निवासस्थानातून ऐक” आणि त्या प्रार्थनेचे उत्तर दे अशी शलमोन देवाला विनंती करू शकला.—२ इतिहास ६:२९, ३०.

आजही, यहोवा देवाला आपली काळजी आहे आणि प्रार्थनेद्वारे त्याला विनंती करण्याचे आमंत्रणही तो आपल्याला देतो. (स्तोत्र ५०:१५) त्याच्या इच्छेच्या एकवाक्यतेत आपण मनापासून केलेल्या प्रार्थनांचे उत्तर देण्याची तो हमी देतो. (स्तोत्र ५५:१६, २२; लूक ११:५-१३; २ करिंथकर ४:७) होय, त्याचे “लोक . . . जी प्रार्थना किंवा विनवणी . . . करितील” त्या सर्व प्रार्थना व विनवण्या यहोवा ऐकतो. तेव्हा, आपण यहोवावर आपला भरवसा ठेवला, मदतीसाठी त्याला प्रार्थना केली, त्याच्या जवळ गेलो तर त्याच्या प्रेमळ काळजीचा व मार्गदर्शनाचा आपल्यालाही प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. (नीतिसूत्रे ३:५, ६) बायबल लेखक याकोब आपल्याला अशाप्रकारे आश्‍वासन देतो: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.