व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणाच्या वचनांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

कोणाच्या वचनांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

कोणाच्या वचनांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

“त्याची वचने तो तेव्हा होता तितकीच महान होती; पण त्याची कार्यसिद्धी, तो आता आहे त्यासारखी शून्य होती.”—विल्यम शेकस्पीयरचे किंग हेन्री दि एट्‌त.

शेकस्पीयर, इंग्रज कार्डिनल टॉमस वोल्सीच्या महान वचनांविषयी बोलत होता जो इंग्लंडमध्ये १६ व्या शतकादरम्यान अत्यंत बलवान राजकीय व्यक्‍ती होता. काहीजण म्हणतील की, शेकस्पीयरचे हे वर्णन आज ऐकायला मिळणाऱ्‍या वचनांच्या बाबतीतही लागू होते. वेळोवेळी लोकांना आश्‍वासने दिली जातीत परंतु लाभ काहीच होत नाही. म्हणून, लोक कोणत्याही वचनांवर भरवसा का ठेवत नाहीत हे समजणे कठीण नाही.

घोर निराशा

उदाहरणार्थ, १९९० च्या दशकात बाल्कन राष्ट्रांमध्ये चाललेल्या भयंकर युद्धादरम्यान, युनाटेड नेशन्स सेक्युरिटी काउंसिलने बॉस्नियातील स्रीब्रनित्सा शहराला “सुरक्षित ठिकाण” असे घोषित केले. हे आंतरराष्ट्रीय समाजाकडून विश्‍वसनीय हमी मिळाल्यासारखे होते. स्रीब्रनित्सातील हजारो मुस्लिम निर्वासितांना तरी असेच वाटले. परंतु, सुरक्षित ठिकाणाचे हे वचन पोकळ ठरले. (स्तोत्र १४६:३) जुलै १९९५ मध्ये, हल्ला करणाऱ्‍या सैन्याने युएनच्या सैन्याला बाजूला केले आणि शहरावर आक्रमण केले. ६,००० हून अधिक मुस्लिम गायब झाले आणि कमीतकमी १,२०० मुस्लिम नागरिकांचा खून करण्यात आला.

पूर्ण न केलेल्या वचनांची उदाहरणे जीवनाच्या प्रत्येक पैलूत पाहायला मिळतात. आज, “असंख्य प्रमाणातील खोट्या व फसव्या जाहिरातबाजीमुळे” लोकांना फसवल्यासारखे वाटते. “हजारो राजकीय व्यक्‍तींच्या पोकळ आश्‍वासनांमुळे” त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. (द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका, खंड १५, पृष्ठ ३७) आपल्या कळपाची काळजी घेण्याचे वचन देणारे विश्‍वासातील धर्मगुरू सर्वात तिरस्कारणीय पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करतात. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही जेथे इतरांबद्दल दया आणि काळजी हे गुण दाखवले गेले पाहिजेत तेथे काहींनी विश्‍वासघात केला आहे, लोकांचा फायदा उचलला आहे किंवा त्यांना ज्यांची काळजी घेण्यासाठी सोपवले होते त्यांचा खून देखील केला आहे. म्हणूनच, प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवू नये अशी ताकीद बायबलमध्ये दिली आहे.—नीतिसूत्रे १४:१५.

पूर्ण केली जाणारी वचने

अर्थात, पुष्कळ लोक आपला शब्द पाळतात आणि काही वेळा असे करण्यासाठी त्यांना भारी किंमत मोजावी लागते. (स्तोत्र १५:४) त्यांचा शब्द म्हणजे एक खात्री असते आणि ते त्याचा आदर करतात. इतरजण सद्‌हेतूने काही वचने देतात आणि त्यांना आपले वचन पूर्ण करण्याची मनापासून इच्छा असते. आपले वचन पूर्ण करायला ते तयार असतात आणि उत्सुकही असतात पण त्यांना ते जमत नाही. परिस्थितीमुळे सर्वात उदात्त योजना देखील बारगळू शकतात.—उपदेशक ९:११.

कारण काहीही असो, सत्य हे आहे की, अनेकांना कोणाच्याही वचनांवर भरवसा ठेवायला कठीण जाते. म्हणून प्रश्‍न येतो: भरवशालायक काही वचने आहेत का? होय आहेत. आपण देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये आढळणाऱ्‍या वचनांवर भरवसा ठेवू शकतो. या विषयावर पुढील लेख काय म्हणतो याचे परीक्षण करायला तुम्हाला आवडेल का? मग, इतर लाखो लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा म्हणाल की, देवाच्या वचनांवर खरोखर भरवसा ठेवता येऊ शकतो.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

AP Photo/Amel Emric