व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘देव हातांनी बांधलेल्या मंदिरांत राहत नाही’

‘देव हातांनी बांधलेल्या मंदिरांत राहत नाही’

‘देव हातांनी बांधलेल्या मंदिरांत राहत नाही’

पौलाला अथीनाच्या मंदिरांविषयी माहिती होती हे निश्‍चित आहे कारण, आपल्या मिशनरी प्रवासादरम्यान तो ज्या ज्या शहरांतून गेला होता त्या त्या शहरांत त्याला अशी मंदिरे पाहावयास मिळाली होती. दि एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिकानुसार, अथीना ही केवळ युद्धाची आणि विद्येची देवता म्हणून नावाजलेली नव्हती तर “हस्तकलेची आणि सामान्यपणे शांतीसमय टिकवून ठेवणारी” म्हणूनही ज्ञात होती.

अथीनाचे सर्वात लोकप्रिय मंदिर पार्थेनॉन हे, या देवतेच्या नावावरून पडलेल्या शहरात अर्थात अथेन्स येथे होते. प्राचीन जगातील सर्वात महान मंदिरांपैकी एक समजल्या जाणाऱ्‍या पार्थेनॉनमध्ये ४० फूट उंचीची सोने व हस्तीदंतांनी बनवलेली अथीनाची मूर्ती होती. पौल अथेन्सला गेला तेव्हा, हे संगमरवराचे पांढरे शुभ्र मंदिर सुमारे ५०० वर्षांपासून शहरातील प्रमुख आकर्षण होते.

पार्थेनॉनकडे पाहत पौलाने अथेनैकरी लोकांच्या एका गटाला, ‘हातांनी बनवलेल्या मंदिरात न राहणाऱ्‍या देवाविषयी’ प्रचार केला. (प्रेषितांची कृत्ये १७:२३, २४) पौलाचे भाषण ऐकणारे लोक, ते ज्याला ओळखत नव्हते अशा अदृश्‍य देवापेक्षा अथीनाच्या मंदिरांच्या किंवा तिच्या मूर्तींच्या भव्यतेमुळे भारावून गेले होते. परंतु पौलाने म्हटल्याप्रमाणे, मानवजातीचा सृष्टीकर्ता ‘सोन्या, रुप्याचा किंवा पाषाणाचा . . . मनुष्याच्या कल्पनेने कोरलेल्या आकृतीसारखा’ आहे अशी आपण कल्पना देखील करता कामा नये.—प्रेषितांची कृत्ये १७:२९.

अथीनासारखे कित्येक देव आणि देवता—ज्यांना केवळ त्यांच्या मंदिरांमुळे व मूर्तींमुळे वैभव मिळते—आले आणि गेलेसुद्धा. सा.यु. पाचव्या शतकात अथीनाची मूर्ती पार्थेनॉनमधून गायब झाली व आज तिच्या मंदिरांचे केवळ काही अवशेष उरले आहेत. बुद्धी आणि मार्गदर्शनासाठी आज अथीनाकडे कोणी पाहतो का?

परंतु ज्याला मनुष्याने कधीच पाहिले नाही तो ‘सनातन देव’ यहोवा किती वेगळा आहे! (रोमकर १६:२५; १ योहान ४:१२) कोरहाच्या पुत्रांनी लिहिले: “हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.” (स्तोत्र ४८:१४) देवाचे मार्गदर्शन प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे, त्याचे वचन बायबल याचा अभ्यास करणे आणि त्यातील सल्ल्याचे आपल्या जीवनात पालन करणे.