व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“महान अभियांत्रिकी कामांपैकी एक”

“महान अभियांत्रिकी कामांपैकी एक”

“महान अभियांत्रिकी कामांपैकी एक”

सुमारे ३,००० वर्षांपूर्वी राजा शलमोनाच्या कारकीर्दीत यहोवाचे मंदिर जेरुसलेममध्ये बांधले जात होते तेव्हा तांब्याचे एक सुरेख घंगाळ बनवण्यात आले व ते मंदिराच्या बाहेर द्वारापाशी ठेवण्यात आले. याचे वजन ३० टनापेक्षा अधिक होते आणि त्यात सुमारे ४०,००० लीटर पाणी मावू शकत होते. याला घंगाळसागर [गंगाळसागर] म्हटले जायचे. (१ राजे ७:२३-२६) “इब्री राष्ट्राने हाती घेतलेल्या अभियांत्रिकी कामांपैकी हे सर्वात प्रचंड काम होते यात काही शंका नाही,” असे नॅशनल रिसर्च काऊन्सील ऑफ कॅनडा येथील भूतपूर्व यांत्रिक अधिकारी, अल्बर्ट झॉईडहॉफ यांनी बिब्लिकल आरक्यॉलॉजिस्ट या मासिकात म्हटले.

पण हे घंगाळसागर कसे बनवण्यात आले होते? बायबल म्हणते, की ‘राजाने ते यार्देन खोऱ्‍यात . . . [पितळाची भांडी] चिकणमातीत ओतविले होते.’ (१ राजे ७:४५, ४६) हे “ओतकाम, मोठमोठ्या कांस्य धातूच्या घंटा बनवण्यासाठी जी पद्धत वापरली जात असे त्यासारखे असावे,” असे झॉईडहॉफ म्हणतात. ते पुढे म्हणतात: “कारागिरांनी मेणाच्या नमुन्याचा एक उपडा साचा, घंगाळसागराच्या खडखडीत वाळलेल्या साच्यावर तयार केला असावा . . . त्यानंतर, ओतकामगारांनी मेणाच्या नमुन्यावर बाहेरचा साचा बांधून तो पूर्णपणे वाळू दिला असावा. शेवटल्या टप्प्यात, मेण वितळवून त्या पोकळ जागी कांस्यरस ओतण्यात आले असावे.”

अवाढव्य आकाराचे व वजनदार घंगाळसागर बनवण्यासाठी खूप कलाकुसरीची गरज होती. आतील आणि बाहेरील साचा भक्कम असावयाचा होता जेणेकरून त्याला जवळजवळ ३० टनाच्या कांस्यरसाचा दाब सहन करता येईल आणि त्याला भेगा किंवा छिद्रे पडू नयेत म्हणून हे ओतकाम न थांबता करावे लागले असावे. यासाठी कदाचित साच्यात धातूरस सतत ओतला जावा म्हणून अनेक भट्ट्या एकमेकांना जोडलेल्या असाव्यात. खरेच किती प्रचंड काम!

मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळी केलेल्या प्रार्थनेत राजा शलमोनाने मंदिराच्या बांधकामाचे श्रेय यहोवा देवाला देत म्हटले: “जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहे.”—१ राजे ८:२४.