व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिकता आणि तुमचे कल्याण

आध्यात्मिकता आणि तुमचे कल्याण

आध्यात्मिकता आणि तुमचे कल्याण

स्वतःच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यात तुम्ही कदाचित तुमचा बहुतांश वेळ घालवता. दररोज आठ तासांची झोप घेता, स्वयंपाक करण्यात, मग खाण्यात कितीतरी तास खर्च करता आणि अन्‍न व निवाऱ्‍याचा खर्च भागवण्यासाठी कदाचित आठ तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करता. आजारी पडल्यावर, वेळ काढून आणि पैसा खर्च करून डॉक्टरांकडे जाता किंवा घरगुती उपाय करता. सुदृढ राहण्याकरता साफ-सफाई करता, आंघोळ करता आणि कदाचित नियमित व्यायामही करता.

पण चांगले आरोग्य राखण्यासाठी केवळ शारीरिक गरजा पूर्ण करणे पुरेसे नाही. तुमचे कल्याण आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून आहे. वैद्यकीय संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, शारीरिक आरोग्याचा जवळचा संबंध एका व्यक्‍तीच्या आध्यात्मिक आरोग्याशी—तिची आध्यात्मिक प्रवृत्ती असण्याशी किंवा नसण्याशी—आहे.

निश्‍चित संबंध

“या विषयावरील खास संशोधनाच्या बहुतांश लेखांमध्ये, अधिक आध्यात्मिकता आणि उत्तम आरोग्य यांच्यात निश्‍चित संबंध असल्याचे आढळले आहे,” असे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक हेडली जी. पीच म्हणतात. या संशोधनाविषयी, द मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया (एमजेए) म्हणते: “धार्मिकतेचा संबंध . . . कमी रक्‍तदाब, कमी कोलेस्टरॉल . . . आणि कोलोन कॅन्सरचा कमी धोका यांसोबतही जोडण्यात आला आहे.”

त्याचप्रमाणे, बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाने घेतलेल्या ६,५४५ लोकांच्या २००२ अभ्यासात असे आढळले की, “आठवड्यातून एकदा धार्मिक सभेला जाणाऱ्‍या लोकांना कधी तरी एकदा किंवा कधीच न जाणाऱ्‍या लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका फार कमी होता.” या अभ्यासातील प्रमुख व्यक्‍ती आणि यूसी बर्कलीज स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील शिक्षक, डग ओमान म्हणाले: “सामाजिक संबंध आणि आरोग्य सवयी, त्याचप्रमाणे धूम्रपान आणि व्यायाम यांसारख्या गोष्टींचा विचार केल्यावरही हा फरक आम्हाला आढळला.”

जीवनाबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणाऱ्‍यांना मिळणाऱ्‍या इतर फायद्यांविषयी, एमजेए म्हणते: “ऑस्ट्रेलियात घेतलेल्या अभ्यासात, धार्मिक वृत्तीच्या लोकांमध्ये अधिक वैवाहिक स्थिरता, मद्याचा आणि अंमली पदार्थांचा कमी वापर, आत्महत्येचे कमी प्रमाण आणि अधिक निःस्वार्थ वृत्ती दिसली आहे.” याशिवाय, बीएमजे (द ब्रिटिश मेडिकल जर्नल या नावाने पूर्वी ओळखले जाणारे) म्हणते: “पक्के आध्यात्मिक विश्‍वास असलेले लोक, एखाद्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यामुळे होणाऱ्‍या दुःखातून, आध्यात्मिक विश्‍वास न बाळगणाऱ्‍या लोकांपेक्षा लवकर आणि पूर्णपणे सावरतात.”

खरी आध्यात्मिकता नेमकी काय आहे याविषयी विभिन्‍न लोकांचे विभिन्‍न विचार आहेत. तरीही, आपल्या आध्यात्मिक स्थितीचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम पडत असतो. ही गोष्ट, येशू ख्रिस्ताने सुमारे २,००० वर्षांआधी म्हटलेल्या विधानाच्या सुसंगतेत आहे. तो म्हणाला: “आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे धन्य.” (मत्तय ५:३, NW) तुमचे आरोग्य आणि आनंद तुमच्या आध्यात्मिक स्थितीवर अवलंबून असल्यामुळे, पुढील प्रश्‍न विचारणे शहाणपणाचे ठरेल: ‘मला भरवशालायक आध्यात्मिक मार्गदर्शन कोठे मिळेल? आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यात काय सामील आहे?’