व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पीडित असलेल्यांकरता सांत्वन

पीडित असलेल्यांकरता सांत्वन

पीडित असलेल्यांकरता सांत्वन

गतकाळात, विश्‍वासू स्त्री-पुरुषांचा छळ होई तेव्हा ते मार्गदर्शनासाठी देवाकडे कळकळीने प्रार्थना करत. परंतु, ही पीडा दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःही पावले उचलली जसे की, ते चातुर्याने छळकर्त्यांना टाळायचे. उदाहरणार्थ, दावीद यहोवावर विसंबून राहिला, त्यासोबतच त्याने स्वतःही प्रयत्न केले आणि अशाप्रकारे तो छळाचा सामना करू शकला. आज आपल्याविषयी काय?

छळ सोसताना, तुम्ही कदाचित स्वतःची समस्या सोडवण्याकरता काही पाऊल उचलाल. जसे की, तुम्हाला नोकरी नसली तर तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी उचित नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही का? (१ तीमथ्य ५:८) किंवा तुम्हाला एखादी शारीरिक व्याधी असली तर तुम्ही वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही का? येशूला सर्वप्रकारचे आजार बरे करण्याची शक्‍ती देवाकडून मिळाली होती तरी त्याने कबूल केले की, ‘दुखणाइतांना वैद्याची गरज आहे.’ (मत्तय ९:१२) तरीही, तुमच्या अडीअडचणी नेहमीच नाहीशा होणार नाहीत; काही काळापर्यंत तुम्हाला कदाचित त्रास सहन करावा लागेल.

अशा वेळी, यहोवा देवाला प्रार्थना करता येईल. उदाहरणार्थ, नोकरी शोधताना, देवावर प्रार्थनेद्वारे विसंबून राहिल्याने बायबल तत्त्वांच्या विरोधात असलेले काम स्वीकारण्याच्या मोहाचा आपल्याला प्रतिकार करता येईल. लोभ किंवा पैशांची हाव यांमुळे ‘विश्‍वासापासून बहकण्याचेही’ आपल्याला टाळता येईल. (१ तीमथ्य ६:१०) होय, नोकरीविषयी किंवा कुटुंबाच्या संबंधाने अथवा आरोग्य समस्येसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेताना आपण दावीदाच्या सल्ल्याचे पालन करू शकतो: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.”—स्तोत्र ५५:२२.

मनःपूर्वक प्रार्थना आपल्याला मानसिक संतुलन राखायलाही मदत करेल ज्यामुळे आपण आपल्या पीडेमुळे भारावून जाणार नाही. खरा ख्रिस्ती असल्यामुळे प्रेषित पौलाने लिहिले: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” प्रामाणिक प्रार्थना आपल्याला कोणते सांत्वन देऊ शकते? “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) देवाने दिलेली शांती “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे” जाते. त्यामुळे, आपण अस्वस्थ होतो तेव्हा ती आपल्याला स्थिर करू शकते. ती आपले ‘अंतःकरण व आपले विचार’ यांवर नियंत्रण राखील आणि अविचारीपणे व मूर्खपणे कार्य करून आपल्या पीडेत अधिक भर न पाडण्यास मदत करील.

प्रार्थनेमुळे परिस्थितीत महत्त्वाचा बदलही घडू शकतो. प्रेषित पौल रोममध्ये कैदी होता तेव्हा त्याने सह-ख्रिश्‍चनांना त्याच्या वतीने प्रार्थना करण्याची विनंती केली. पौलाने अशी विनंती का केली? “तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे,” असे त्याने त्यांना लिहिले. (इब्री लोकांस १३:१९) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, पौलाला हे ठाऊक होते की, त्याच्या सह-अनुयायांची निरंतर प्रार्थना यहोवाने ऐकली तर कदाचित त्याची सुटका होण्याच्या वेळेत फरक पडेल.—फिलेमोन २२.

प्रार्थनेमुळे आपल्या पीडेच्या परिणामात फरक पडू शकतो का? पडू शकतो. परंतु, आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला हवे त्या पद्धतीने कदाचित यहोवा देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर देणार नाही. पौलाने अनेक वेळा, त्याच्या ‘शरीरातील काट्याविषयी’ प्रार्थना केली; कदाचित ती एखादी शारीरिक समस्या असावी. परंतु ती पीडा दूर करण्याऐवजी, देवाने पौलाला म्हटले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.”—२ करिंथकर १२:७-९.

याचा अर्थ, आपल्याला पीडा देणारी समस्या एकदम गायब होणार नाही. पण, स्वर्गीय पित्यावर आपण विसंबून आहोत हे आपल्याला सिद्ध करण्याची संधी मिळेल. (याकोब १:२-४) ही खात्री बाळगा की, यहोवा देवाने पीडा पूर्णपणे काढून टाकली नाही तरी तो ‘तिच्यातून निभावण्याचा उपाय करील ह्‍यासाठी की, आपण ती सहन करावयास समर्थ व्हावे.’ (१ करिंथकर १०:१३) यहोवाला ‘सर्व सांत्वनदाता देव, जो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो’ असे म्हटले आहे हे लक्षवेधक आहे. (२ करिंथकर १:३, ४) निभावण्यासाठी आवश्‍यक असलेले सामर्थ्य देव आपल्याला देऊ शकतो; शिवाय, आपल्याजवळ सार्वकालिक जीवनाची आशा देखील आहे.

देवाचे वचन, अर्थात बायबल असे वचन देते की, यहोवा “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:३, ४) पीडारहित जगाची कल्पना करणे कठीण वाटते का? तुमचे जीवन पिडांनी ग्रस्त असेल तर कदाचित तुम्हाला हे कठीणच वाटेल. परंतु, देवाने भीती आणि विपत्तीपासून मुक्‍ती देण्याचे वचन दिले आहे आणि त्याचा उद्देश निश्‍चितपणे यशस्वी होईल.—यशया ५५:१०, ११.

[९ पानांवरील चित्रे]

निराशेपासून सुटकेपर्यंत