व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसचा निभाव लागेल का?

चर्चेसचा निभाव लागेल का?

चर्चेसचा निभाव लागेल का?

“ब्रिटनमधील लोक अजूनही देवावर विश्‍वास करतात, पण ख्रिस्ताशी त्यांना बाध्यता नको,” असे स्टीफन टरवोम्वे हे युगांडन पाळक म्हणतात. सुमारे २० वर्षांआधी, युगांडातील आपल्या चर्चच्या हिंसक शुद्धीकरणातून ते बचावले होते. आज, इंग्लंडच्या लीड्‌स येथील पुरुषांच्या क्लबमध्ये ते उपदेश देतात; बिंगो खेळण्यात लोक गुंतून जाण्याआधी ते दहा मिनिटांचे भाषण देतात.

ॲटलांटिकच्या पलीकडे, अमेरिकेत अलीकडेच स्थापित झालेले अँग्लीकन मिशन देखील आध्यात्मिकरित्या अशाच दशेत आहे. “संयुक्‍त संस्थाने आज जगातील असे राष्ट्र आहे जिथे, चर्चचे सदस्यत्व नसलेल्या व आध्यात्माशी कसला संबंध नसलेले बहुतांश इंग्रजी बोलणारे लोक आहेत,” असे मिशनच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे. “संयुक्‍त संस्थानांत खरे तर मिशनऱ्‍यांची गरज आहे.” आपल्या चर्चमध्ये बदल घडवून आणण्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झालेल्या नवीन मिशनने परंपरेचे अनुकरण करणे सोडून दिले आणि ते “संयुक्‍त संस्थानांना धार्मिक सेवा” देण्याकरता आशिया व आफ्रिकातील नेत्यांना जाऊन मिळाले.

पण, आफ्रिकन, आशियाई व लॅटिन अमेरिकन मिशनरी, युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या देशांमध्ये ‘प्रचार’ का करत आहेत?

कोण कोणाला वाचवत आहे?

चारशेपेक्षा अधिक वर्षांपासून, श्रद्धाळू युरोपियन मिशनरी, युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती जेथे वाढत गेल्या तेथे म्हणजे आफ्रिका, आशिया, प्रशांत महासागरातील बेटे आणि दक्षिण अमेरिका यांसारख्या देशांत जात राहिले. या देशांतील गैर-ख्रिस्ती लोकांपर्यंत आपला धर्म नेण्याचा त्यांचा हेतू होता. कालांतराने, ख्रिस्ती तत्त्वांवर आधारित असल्याचा दावा करणाऱ्‍या अमेरिकन वसाहती सामील झाल्या आणि संपूर्ण जगभरात स्वतःचे सुवार्तिक मिशन स्थापन करण्यात त्यांनी युरोपियन मिशनऱ्‍यांना मागे पाडले. आता मात्र प्रवाह उलट दिशेने वाहू लागला आहे.

“[नाममात्र ख्रिस्ती धर्माचे] केंद्र बदलले आहे,” असे गैरपश्‍चिमी जगातील ख्रिस्ती धर्माच्या अभ्यास केंद्राचे संस्थापक आणि व्यवस्थापक असलेले ॲन्ड्रू वॉल्स म्हणतात. १९०० साली, ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे ८० टक्के लोक एकतर युरोपियन होते किंवा उत्तर अमेरिकन. पण आज, ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे सर्व ६० टक्के लोक आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका इथे राहतात. एका अलीकडील प्रेस रिपोर्टमध्ये असे म्हटले होते: “युरोपमधील कॅथलिक चर्चेस, फिलिपाईन्स व भारत इथून आलेल्या पाळकांवर अवलंबून आहेत, आणि अमेरिकन कॅथलिक चर्चेसमध्ये सेवा करणाऱ्‍या सहा पाळकांपैकी एक जण बाहेरच्या देशांतला आहे.” बहुतांश घानायन असलेले नेदरलँड्‌समधील आफ्रिकन सुवार्तिक स्वतःला, “धर्मनिरपेक्ष प्रदेशात मिशनरी चर्च” असे समजतात. आणि ब्राझीलहून आलेले सुवार्तिक ब्रिटनच्या विविध भागांत मोहिमा करत आहेत. एका लेखकाने लिहिले: “ख्रिस्ती मिशनरी वाहतूक मागे चालली आहे.”

वादळाची चाहूल

युरोपियन आणि उत्तर अमेरिकेच्या वाढत्या धर्मनिरपेक्ष खंडांमध्ये मिशनऱ्‍यांची गरज नक्कीच आहे. एका बातमीपत्रात म्हटले आहे की, “स्कॉटलंडमध्ये १० टक्क्यांहून कमी ख्रिस्ती नियमितरित्या चर्चला जातात.” फ्रान्स आणि जर्मनीतील प्रमाण तर याहून कमी आहे. दुसऱ्‍या एका बातमीपत्रातील अहवालानुसार, सर्वेक्षणानंतर कळाले की, “४० टक्के अमेरिकन आणि २० टक्के कॅनेडियन लोकांनी आपण नियमितरित्या चर्चला जात असल्याचे सांगितले.” याच्या उलट, फिलिपाईन्समधील उपस्थिती जवळजवळ ७० टक्के आहे आणि इतर विकसनशील देशांमध्येही असेच आहे.

आणखी उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, दक्षिण गोलार्धातील चर्चला जाणारे लोक उत्तर गोलार्धातील लोकांपेक्षा परंपरेला अधिक जपणारे आहेत. उदाहरणार्थ, अमेरिका आणि युरोपमधील कॅथलिक लोकांचे मत विचारले जाते तेव्हा ते सतत पाळकांच्या अधिकारावर त्यांचा भरवसा राहिला नसल्याचे सांगतात आणि सामान्य लोकांना चर्चच्या व्यवहारात अधिक सहभाग घेता यावा व स्त्रियांना समान हक्क मिळावा म्हणून लढतात. दुसऱ्‍या बाजूला, दक्षिण गोलार्धातील कॅथलिकांनी मोठ्या संख्येने या वादविषयांवर चर्चची पारंपरिक भूमिका स्वीकारली आहे. दक्षिणेकडून चर्चला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे भावी संघर्षाला आतापासूनच कारण मिळू लागले आहे. इतिहास आणि धर्म या विषयांतील विद्वान, फिलिप्प जेन्कन्स असे भाकीत करतात: “एक-दोन दशकात, जागतिक ख्रिस्ती धर्मजगतातील कोणताही भाग दुसऱ्‍या भागाला पूर्णपणे किंवा खरे ख्रिस्ती असल्याचे ओळखणार नाही याची शक्यता अधिक आहे.”

या स्थितीमुळे, वॉल्स असा महत्त्वाचा प्रश्‍न उभा करतात की, “आफ्रिकन, आशियाई, लॅटिन अमेरिकन, उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ख्रिस्ती एकाच चर्चमध्ये राहून खरेपणाने एकच विश्‍वास कसा व्यक्‍त करू शकतात.” तुम्हाला काय वाटते? विभागलेल्या जगात चर्चेस निभावतील का? खऱ्‍या ख्रिस्ती ऐक्याला कोणता आधार आहे? पुढील लेखात, शास्त्रवचनीय उत्तरे आणि त्यासोबत स्पष्ट पुरावा देऊन दाखवण्यात आले आहे की, एका संघटित ख्रिस्ती समाजाची जगभरात भरभराट होत आहे.

[४ पानांवरील चित्र]

पूर्वीचे हे चर्च आता म्युझिक कॅफे बनले आहे

[चित्राचे श्रेय]

AP Photo/Nancy Palmieri