व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्राचीन इस्राएलमधील लेवीयांना वतन नव्हते, मग यिर्मया ३२:७ मध्ये म्हटल्याप्रमाणे हानामेल नावाचा लेवी, आपला चुलत भाऊ यिर्मया जो स्वतःही लेवी होता त्याला आपले शेत कसे काय विकू शकला?

लेव्यांविषयी यहोवाने अहरोनाला सांगितले: “तुला काहीहि वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये [इस्राएलांमध्ये] तुला काही वाटाहि मिळावयाचा नाही.” (गणना १८:२०) तरीपण लेवीयांना, वचनयुक्‍त देशांतील विविध ठिकाणी असलेल्या शिवारांसहित ४८ शहरे देण्यात आली होती. यिर्मया ज्या शहरातला होता ते अनाथोथ शहर, “अहरोन याजकाच्या वंशजांना,” नेमलेल्या शहरांपैकी एक होते.—यहोशवा २१:१३-१९; गणना ३५:१-८; १ इतिहास ६:५४, ६०.

लेवी २५:३२-३४ मध्ये आपल्याला पाहायला मिळते, की लेवीयांच्या मालकीची जमीन ‘सोडविण्याचा हक्क’ याविषयी यहोवाने स्पष्ट सूचना दिल्या. प्रत्येक लेवी कुटुंबाला, मालमत्ता, वापर आणि विशिष्ट भाग विकण्यासंबंधी वारसा हक्क मिळणार होता, हे स्पष्ट आहे. तेव्हा यातच जमिनीची विक्री किंवा ती सोडवणे समाविष्ट होते. * पुष्कळ बाबतीत, लेवीयांच्या मालकीच्या जमिनी होत्या व इतर वंशाच्या इस्राएली लोकांप्रमाणे तेही त्यांचा वापर करत असत.

कदाचित, अशा लेवींच्या मालकींच्या जमिनी वारशाने मिळत असाव्यात. परंतु, ‘सोडवण्याच्या हक्काच्याबाबतीत’ केवळ लेवीयांच्या आपसांतच व्यवहारास अनुमती होती. तसेच, केवळ शहरांत असलेल्या जमिनींची खरेदी आणि सोडवणे चालत असे, असे दिसते कारण “नगराच्या शिवारातली समाईक जमीन” विकता येत नव्हती कारण ती “त्यांचे कायमचे वतन” होती.—लेवीय २५:३२, ३४.

त्यामुळे यिर्मयाने हानामेलकडून सोडवून आणलेली जमीन स्पष्टरीत्या अशीच होती जी केवळ सोडवणुकीद्वारेच वारशाने मिळालेली असावी. ती कदाचित शहरातच कुठेतरी असावी. स्वतः यहोवाने अशी मान्यता दिली, की ज्या ‘शेताविषयी’ चर्चा चालली होती ती हानामेलची होती व यिर्मयाला ती “सोडवून घेण्याचा हक्क” होता. (यिर्मया ३२:६, ७) बॅबिलोनच्या दास्यत्वातून सुटून आल्यावर इस्राएली लोकांना आपापल्या वारशाच्या जमिनीचा हक्क पुन्हा मिळेल हे यहोवाने दिलेले अभिवचन पूर्ण होईल त्याची खात्री देण्याकरता यहोवाने या व्यवहाराचा लाक्षणिकरीत्या उपयोग केला.—यिर्मया ३२:१३-१५.

हानामेलची अनाथोथमधील जमीन ही गैरव्यवहाराने मिळवलेली होती असे कोठेही सूचित होत नाही. अनाथोथ मधील आपले शेत विकत घेण्याकरता यिर्मयाला त्याने बोलावून यहोवाच्या नियमाचे उल्लंघन केले होते किंवा यिर्मयाने ते शेत विकत घेताना सोडवून आणण्याच्या आपल्या हक्काचा गैरवापर केला होता हे कोठेही सूचित होत नाही.—यिर्मया ३२:८-१५.

[तळटीप]

^ परि. 4 सा.यु. पहिल्या शतकात, बर्णबा या लेव्याने आपल्या मालकीची जमीन विकली आणि आलेले पैसे जेरुसलेममधील ख्रिस्ताचे अनुयायी असलेल्या गरजूंना मदत करण्याकरता दान केले. त्याची जमीन कदाचित पॅलेस्टाईनमध्ये किंवा सायप्रसमध्ये असावी. किंवा, ती जमीन कदाचित स्मशानभूमी असावी जी बर्णबाला जेरुसलेमच्या क्षेत्रात मिळाली असावी.—प्रेषितांची कृत्ये ४:३४-३७.