व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘पर्वतांपेक्षा तू प्रतापी आहेस’

‘पर्वतांपेक्षा तू प्रतापी आहेस’

यहोवाच्या निर्मितीतील शोभा

‘पर्वतांपेक्षा तू प्रतापी आहेस’

फुजी पर्वतावरून सूर्योदयाचे दर्शन एक अविस्मरणीय अनुभव आहे. लाल भडक सूर्य क्षितिजावर उदय पावतो तेव्हा पांढरा बर्फ आणि ज्वालामुखीचा करडा खडक उजळून निघतो. दुसऱ्‍या दिवसाची सुरवात होताना पर्वताची स्पष्ट छाया कित्येक किलोमीटरपर्यंत डोंगरदऱ्‍यांवर पसरते.

फुजी पर्वतासारखे (“अतुलनीय” या अर्थाच्या शब्दांत एकदा लिहिलेल्या) प्रतापी पर्वत अचंबित करून सोडल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचा केवळ आकारच आपल्याला आपल्या क्षुद्रतेची जाणीव करून देतो! पर्वतांचा प्रताप असा आहे की, धुके आणि ढगांनी झाकलेल्या सर्वोच्च शिखरांवर देवतांची वस्ती होती असे अनेक लोक विश्‍वास करायचे.

पर्वतांची शिखरे त्यांचा कुशल निर्माणकर्ता, यहोवा या एकमेव देवाचे खरोखर गौरव करतात. तोच केवळ “पर्वत निर्माण करतो.” (आमोस ४:१३) पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग डोंगराळ प्रदेश आहे आणि देवाने आपल्या ग्रहाची निर्मिती केली तेव्हा त्याने अशा शक्‍ती प्रस्थापित केल्या ज्यांच्याद्वारे दिमाखदार शिखरे आणि पर्वत राशींचा जन्म झाला. (स्तोत्र ९५:४) उदाहरणार्थ, असे मानले जाते की, हिमालय आणि अँडीज पर्वत राशी पृथ्वीच्या पोटात झालेल्या प्रचंड उत्क्षेपांमुळे व पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या हालचालींमुळे तयार झाल्या.

पर्वत नेमके कसे आणि कशाला निर्माण झाले याची पूर्ण समज आम्हा मानवांना नाही. नीतिमान ईयोबाला विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास आपण खरोखर असमर्थ आहोत: “मी [यहोवा] पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? . . . तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला?”—ईयोब ३८:४-६.

पण आपल्याला एवढे मात्र ठाऊक आहे की, पर्वतांवर आपले जीवन आधारलेले आहे. त्यांना निसर्गाच्या पाण्याचे स्रोत म्हटले जाते कारण सर्व महानद्यांना पर्वतातील स्रोतांमधून पाणी मिळते आणि पृथ्वीवरील निम्मे लोक पाण्यासाठी पर्वतांवर अवलंबून आहेत. (स्तोत्र १०४:१३) न्यू सायंटिस्ट या पत्रिकेनुसार, “जगातील सर्वाधिक धान्य पुरवणाऱ्‍या २० वनस्पतींपैकी सहा पर्वतांमध्ये असतात.” देवाच्या वाग्दत्त नवीन जगातील संतुलित परिस्थितीकीत, ‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’—स्तोत्र ७२:१६; २ पेत्र ३:१३.

अनेकांना, पर्वत म्हणताच युरोपातील ॲल्प्स आठवतात. येथे दाखवलेल्या चिवेटा पर्वतासोबत इतर शिखरे निर्माणकर्त्याची नेत्रसुखद ग्वाही देतात. (स्तोत्र ९८:८) “आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर” ठेवणाऱ्‍या यहोवाची ते स्तुती करतात.—स्तोत्र ६५:६. *

शोभायमान ॲल्प्स—त्यांची बर्फाच्छादित शिखरे, कडे आणि उतार, त्यांच्या दऱ्‍या आणि सरोवरे आणि कुरणे—खरोखर विस्मयकारक आहे. राजा दावीदाने यहोवाविषयी म्हटले की, तो “डोंगरांवर गवत रुजवितो.”—स्तोत्र १४७:८.

कुइलिन, चीन येथील ही पर्वतरांग कदाचित ॲल्प्स इतकी दिमाखदार नसेल तरीही तिचे सौंदर्य निराळेच आहे. ली नदीच्या कडेने असलेले चुनखडीचे सुळके आपल्या सौंदर्याने पर्यटकांना थक्क करून सोडतात. धुक्याने आच्छादलेल्या या पर्वतांमधील नितळ पाणी पाहून स्तोत्रकर्त्याने उद्‌गारलेले शब्द लक्षात येतात: “तो [यहोवा] खोऱ्‍यातून झरे काढितो; ते डोंगरांमधून वाहतात.”—स्तोत्र १०४:१०.

पर्वतांनी आपण अचंबित होतो हे उचित आहे कारण मानवजातीच्या कल्याणाकरता व त्यांना आनंद देण्याकरता निर्माणकर्त्याने केलेल्या प्रेमळ तरतुदीचा ते वैभवशाली भाग आहेत हे आपण ओळखतो. परंतु पर्वत कितीही विस्मयकारक असले तरी यहोवाच्या वैभवापुढे ते ठेंगणे ठरतात. तो निश्‍चितच ‘पर्वतांपेक्षा प्रतापी आहे.’—स्तोत्र ७६:४.

[तळटीप]

^ परि. 8 २००४ यहोवाच्या साक्षीदारांची दिनदर्शिका, मार्च/एप्रिल पाहा.

[९ पानांवरील चौकट/चित्र]

जगाच्या लोकसंख्येतील दहा टक्के लोक डोंगराळ भागांत राहतात. परंतु देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणाऱ्‍यांसाठी हा फार अवघड अथडळा नाही. हे ख्रिस्ती सेवक अनेक डोंगरांवरील प्रदेशांमध्ये व्यस्त आहेत. “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात!”—यशया ५२:७.

“उंच पर्वत रानबकऱ्‍यांसाठी आहेत,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले. (स्तोत्र १०४:१८) देखणी शिंगे असलेल्या न्युबियन आयबेक्ससारख्या डोंगरांतील बकऱ्‍या डोंगरांवर राहणाऱ्‍यांपैकी सर्वात स्थिर आहेत. अगदी अशक्य वाटणाऱ्‍या बारीक कडांवरूनही त्या सहजासहजी चालत जातात. पोंहचण्यास कठीण असलेल्या ठिकाणी राहण्यास आयबेक्स सज्ज असतात. कारण त्यांची खुरे त्याकरता योग्य असतात. बकरीच्या वजनाने खुरांमधील भेग पसरते व यामुळे या प्राण्याला अरूंद कडांवर उभे राहायला किंवा चालायला घट्ट पकड मिळते. खरोखर, आयबेक्स प्राणी रचनेचा उत्कृष्ट नमुना आहे!

[९ पानांवरील चित्र]

फुजी पर्वत, हॉन्शू, जपान