व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

निर्गम ४:२४-२६ मध्ये सांगितलेल्या प्रसंगी काय घडले होते आणि कोणाचा जीव धोक्यात होता?

मोशे आपली पत्नी सिप्पोरा आणि आपली मुले गेर्षोम आणि एलियेजर यांच्याबरोबर ईजिप्तला चालला होता तेव्हा पुढील घटना घडली: “प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्‍वराने त्याला गाठून जिवे मारावयास पाहिले. तो सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापिली आणि ती मोशेच्या पायांपाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्‍ताने मिळविलेला माझा नवरा आहेस. तेव्हा परमेश्‍वराने मोशेला पीडण्याचे सोडिले. रक्‍ताने मिळविलेला नवरा असे तिने सुंतेला अनुलक्षून म्हटले.” (निर्गम ४:२४-२६) हा उतारा आपल्याला चटकन कळत नसला व त्याचा नेमका काय अर्थ होतो याविषयी आपल्याला खात्री नसली तरी, शास्त्रवचने या वचनांचा थोडातरी उलगडा करतात.

मूळ इब्री लिखाणानुसार, कोणाचा जीव धोक्यात होता, सिप्पोराने कोणाच्या पायांना स्पर्श केला व तिने “रक्‍ताने मिळविलेला नवरा” असे कोणाला संबोधून म्हटले हे अहवालात स्पष्टपणे सांगितलेले नाही. अर्थातच, मोशेचा जीव धोक्यात नव्हता, हे आपण तर्कशुद्धपणे समजू शकतो कारण, मोशेला इस्राएली लोकांना ईजिप्तमधून बाहेर आणण्यास देवाने नुकतेच नेमले होते. (निर्गम ३:१०) ही नेमणूक पूर्ण करायला जात असताना देवाचा दूत मोशेचा जीव घेईल हे असंभवनीय आहे. तेव्हा, मोशेच्या मुलांपैकी कोणा एकाचा जीव धोक्यात असण्याची शक्यता आहे. सुंतेविषयी अब्राहामाला दिलेल्या नियमात असे म्हटले होते: “कोणाची सुंता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा; त्याने माझा करार मोडिला असे होईल.” (उत्पत्ति १७:१४) मोशेने आपल्या मुलाची सुंता करण्याकडे लक्ष दिले नव्हते आणि त्यामुळे यहोवाचा दूत मोशेच्या मुलाला ठार मारणार होता.

सिप्पोराने आपल्या मुलाची अग्रत्वचा कापल्यानंतर, मामला सोडवण्यासाठी तिने कोणाच्या पायांना स्पर्श केला? तिने यहोवाच्या दूताच्या पायांना स्पर्श केला. कारण त्याला सुंता न झालेल्या मुलाला ठार मारण्याची शक्‍ती होती. तर्कशुद्धपणे मग, सिप्पोराने अग्रत्वचा घेऊन दूताच्या पायांना स्पर्श करून याचा पुरावा दिला, की तिने कराराचे पालन केले होते.

“रक्‍ताने मिळविलेला माझा नवरा आहेस” हे सिप्पोराचे उद्‌गार असामान्य वाटतात. यावरून तिच्याविषयी काय सूचित होते? सुंतेचा करार पाळण्याद्वारे सिप्पोराने यहोवाबरोबर कराराचा नातेसंबंध कबूल केला. इस्राएली लोकांबरोबर नंतर केलेल्या नियमशास्त्र करारात हे दाखवण्यात आले, की कराराच्या नातेसंबंधात यहोवा पती होऊ शकतो आणि दुसरी पार्टी पत्नी होऊ शकते. (यिर्मया ३१:३२) यास्तव, यहोवाला (त्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या देवदूताद्वारे) “रक्‍ताने मिळविलेला नवरा” असे संबोधण्याद्वारे, सिप्पोरा त्या कराराच्या नियमांना अधीन असल्याचे दर्शवत होती, हे दिसते. जणू काय तिने सुंतेच्या करारात पत्नीची जागा स्वीकारली होती आणि यहोवा देवाला पती म्हणून स्वीकारले होते. पण एवढे मात्र खरे की, देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या संबंधाने आज्ञाधारकता दाखवण्याच्या तिच्या निर्णायक कृत्यामुळे तिच्या मुलाचा जीव वाचला.