व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कामाच्या ठिकाणी लोकांना भेटणे

कामाच्या ठिकाणी लोकांना भेटणे

राज्य घोषकांचा वृत्तान्त

कामाच्या ठिकाणी लोकांना भेटणे

मत्तय, पेत्र, अंद्रिया, याकोब आणि योहान यांच्यात कोणती एक समानता होती? त्या सर्वांना येशूने त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली होती. पेत्र, अंद्रिया, याकोब आणि योहान मच्छीमारीच्या व्यापारात व्यस्त असताना येशूने त्यांना आमंत्रण देऊन म्हटले: “माझ्यामागे चला.” मत्तयला येशूचा शिष्य होण्याचे आमंत्रण देण्यात आले तेव्हा तो जकात नाक्यावर होता.—मत्तय ४:१८-२१; ९:९.

कामाच्या ठिकाणी जाऊन लोकांना साक्ष देणे अत्यंत प्रतिफलदायी असू शकते. हे ओळखून, जपानमधील यहोवाच्या साक्षीदारांनी अलीकडेच सेवाकार्याच्या या पैलूत भाग घेण्याचा संघटित प्रयत्न केला. याचा परिणाम काय होता? काही महिन्यांतच, हजारो पुनर्भेटी देण्यात आल्या आणि सुमारे २५० बायबल अभ्यास सुरू करण्यात आले. पुढील अनुभवांचा विचार करा.

टोकियोतील एका पूर्ण-वेळेच्या सेवकाला एका रेस्टॉरंटचा मॅनेजर भेटला जो सुमारे ३० वर्षांआधी शाळकरी मुलगा असताना एका साक्षीदाराशी बोलला होता. त्या वेळी त्या मॅनेजरला फारसे काही कळले नाही परंतु बायबलबद्दल त्याची आस्था मात्र वाढली. सध्या त्याला आस्था असल्यामुळे त्याने लागलीच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान * या पुस्तकातून बायबलचा अभ्यास करण्यास स्वीकारले. शिवाय, दररोज रात्री झोपण्याआधी बायबल वाचण्याचा वैयक्‍तिक नित्यक्रम त्याने सुरू केला.

एक खास पायनियर बहीण एका ऑफिसात गेली. मॅनेजर तेथे नव्हता परंतु फोन उचलणाऱ्‍या तरुण स्त्रीने विचारले: “माझ्याशी बोललं तर चालेल का?” फोनवर थोडक्यात बोलणे झाल्यावर ती स्त्री बाहेर आली आणि म्हणाली की मला बायबल वाचायची फार आवड आहे. खास पायनियरने बायबल घेऊन येण्याची व्यवस्था केली आणि तिच्यासोबत जवळ असलेल्या एका बागेत अगदी सकाळी म्हणजे कामावर जाण्याआधी बायबल अभ्यास सुरू केला.

दुसऱ्‍या एका ऑफिसमध्ये, एका मनुष्याने आपल्यासोबत काम करणाऱ्‍या एका स्त्रीला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके स्वीकारताना पाहिले पण साक्षीदार गेल्यावर तिने ती मासिके लगेच फेकून दिली. घरी परतल्यावर या मनुष्याने आपल्या साक्षीदार पत्नीला या घटनेविषयी सांगितले आणि म्हणाला की, तो तिच्या जागी असता तर त्याने निदान थोडे ऐकून घेतले असते. त्याचे हे बोलणे त्याच्या मुलीने ऐकले आणि तिने याविषयी एका साक्षीदाराला सांगितले जो त्या व्यापार क्षेत्रात कार्य करतो. या साक्षीदाराने लगेच त्या पतीला ऑफिसमध्ये जाऊन भेट दिली आणि त्याच्यासोबत एक बायबल अभ्यास सुरू केला. लवकरच तो मनुष्य रविवारच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहू लागला.

कामाच्या ठिकाणी लोकांना साक्ष दिल्याने इतरही फायदे मिळाले आहेत. जपानमधील अनेक प्रचारक दुकाने असलेल्या क्षेत्रात, कंपन्यांमध्ये आणि ऑफिसमध्ये पुनर्भेटी देण्यात तरबेज झाले आहेत. शिवाय, साक्षकार्याच्या या माध्यमाद्वारे अनेक निष्क्रिय जणांची भेट घेऊन त्यांच्यासोबत अभ्यास सुरू करण्यात आले आहेत. याचे उल्लेखनीय परिणाम दिसून आले आहेत. मध्य टोकियोतील एका मंडळीने अलीकडेच १०८ गृह बायबल अभ्यासांचा अहवाल दिला; एका वर्षाआधीच्या अहवालातील संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट होती.

[तळटीप]

^ परि. 5 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.