व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

६६६ केवळ कोडे नाही

६६६ केवळ कोडे नाही

६६६ केवळ कोडे नाही

“ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्‍वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीहि विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्‍वापद करिते. येथे अकलेचे काम आहे; ज्याला बुद्धि आहे त्याने श्‍वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे; त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो; ती त्याची संख्या सहाशे सहासष्ट होय.”—प्रकटीकरण १३:१७, १८.

“श्‍वापदाचे” रहस्यमय चिन्ह किंवा नाव अर्थात ६६६ या संख्येविषयीच्या भविष्यवाणीने इतर कोणत्याही बायबलमधील विषयांपेक्षा सर्वाधिक उत्सुकता आणि जिज्ञासा निर्माण केली आहे. टीव्ही असो नाहीतर इंटरनेट, त्याचप्रमाणे चित्रपट, पुस्तके आणि पत्रिकांमध्येही श्‍वापदाच्या चिन्हावर अंतहीन तर्कवितर्क करण्यात आले आहेत.

काहींचा असा विश्‍वास आहे की, ६६६ हे बायबलमधील ख्रिस्तविरोधकाचे चिन्ह आहे. इतरजण म्हणतात की, ते एखाद्या गोंदणाप्रमाणे किंवा डिजिटल कोडचे मायक्रोचिप बसवल्याप्रमाणे श्‍वापदाच्या सेवकाची ओळख पटवणारे आवश्‍यक ओळखचिन्ह आहे. आणखी काही म्हणतात की, ६६६ हे कॅथलिक चर्चच्या अधिकाराचे चिन्ह आहे. विकारियस फिली दे (देवाच्या पुत्राचा पाद्री) या पोपच्या एका अधिकृत उपाधीतील अक्षरांच्या बदल्यात रोमन अंक घालून आणि त्यात थोडा फेरबदल करून त्यांना ६६६ ही संख्या मिळते. रोमन सम्राट डायोक्लेशियनच्या लॅटिन नावातून आणि निरो सिझरच्या हिब्रू नावातून हीच संख्या मिळते असाही दावा केला जातो. *

श्‍वापदाच्या चिन्हाविषयी बायबलमध्ये काय म्हटले आहे त्यापेक्षा कल्पनेच्या आधारे योजलेली ही स्पष्टीकरणे किती वेगळी आहेत ते आपण पुढील लेखात पाहू या. बायबल हे जरूर प्रकट करते की, देव या सद्य व्यवस्थीकरणाचा अंत करील तेव्हा हे चिन्ह बाळगणाऱ्‍यांवर त्याचा क्रोध भडकेल. (प्रकटीकरण १४:९-११; १९:२०) यास्तव, ६६६ या संख्येचा अर्थ समजणे म्हणजे केवळ जिज्ञासा उत्पन्‍न करणारे कोडे सोडवणे एवढेच नव्हे. आनंदाची गोष्ट म्हणजे, प्रेमाचे साक्षात रूप आणि आध्यात्मिक प्रकाशाचा उगम, यहोवा देव याने या महत्त्वाच्या विषयाबाबत आपल्या सेवकांना अंधारात ठेवलेले नाही.—२ तीमथ्य ३:१६; १ योहान १:५; ४:८.

[तळटीप]

^ परि. 4 संख्याशास्त्रावरील चर्चेकरता, पाहा सावध राहा!, (इंग्रजी) सप्टेंबर ८, २००२.