व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

येशूला भाऊ व बहिणी होत्या हे कशावरून सूचित होते?

बायबलमध्ये मत्तय १३:५५, ५६ आणि मार्क ६:३ या वचनात तसे सांगितले आहे. या वचनांत वापरलेला ग्रीक शब्द (अडेल्फोस) [भाऊ] याचा उपयोग “शारीरिक किंवा कायदेशीर नातेसंबंध दर्शवण्यास केला जातो [आणि] त्याचा अर्थ सख्खा किंवा सावत्र भाऊ असा होतो.” (द कॅथलिक बिब्लिकल क्वाटर्ली, जानेवारी १९९२)—१२/१५, पृष्ठ ३.

युद्धाचे कोणते नवीन रूप स्पष्ट दिसून येते आणि युद्धांची मुख्य कारणे कोणती आहेत?

अलीकडील वर्षांमध्ये, मानवजातीला पीडित करणारी युद्धे मुख्यतः मुलकी युद्धे आहेत—एकाच देशांतील विरोधी नागरिकांच्या गटांमधील युद्धे. वांशिक आणि जातीय द्वेषभाव, धार्मिक भेदभाव, अन्याय आणि राजकीय अस्थिरता ही सर्व मुलकी युद्धाची कारणे आहेत. आणखी एक मूळ कारण आहे—सत्तेची आणि पैशाची हाव.—१/१, पृष्ठे ३-४.

येशूने नमुन्यादाखल दिलेल्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द, आहे तसा म्हणावा या उद्देशाने हा नमुना दिला नव्हता हे आपल्याला कसे माहीत होते?

येशूने आपल्या डोंगरावरील प्रवचनात प्रार्थनेचा हा नमुना दिला. यानंतर १८ महिन्यांनंतर त्याने प्रार्थनेविषयी पूर्वी दिलेल्या सूचनांचे तात्पर्य पुन्हा सांगितले. (मत्तय ६:९-१३; लूक ११:१-४) लक्ष देण्याजोगी गोष्ट अशी की त्याने आदर्श प्रार्थना जशीच्या तशी म्हणून दाखवली नाही. यावरून सूचित होते, की सार्वजनिक उपासनेत तोंडपाठ करून पुनरुच्चार करण्यासाठी येशूने ही प्रार्थना दिली नव्हती.—२/१, पृष्ठ ८.

जलप्रलयानंतर, एका कबुतराला जहाजातून बाहेर पाठवल्यानंतर त्याने येताना जैतुनाच्या झाडाचे पान कोठून आणले?

जलप्रलयाच्या पाण्याची क्षारता व तापमान यांविषयी आपल्याला माहिती नाही. परंतु जैतुनाच्या झाडांना छाटल्यावरही त्यांना पुन्हा नवीन पालवी फुटत असते. यास्तव, काही झाडे जलप्रलयातही तग धरून राहिली असावीत आणि त्यांना नवीन पालवी फुटली असावी.—२/१५, पृष्ठ ३१.

नायजेरियन मुलकी युद्धाच्या वेळी, बायफ्रात नाकेबंदी असतानाही त्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांना आध्यात्मिक अन्‍न कसे मिळत राहिले?

एका सिव्हिल सर्व्हंटला युरोपमध्ये काम देण्यात आले होते तर दुसरा बायफ्रन विमान धावपट्टीवर काम करत होता. दोघेही साक्षीदार होते. या दोघा बांधवांनी धोका पत्करून बायफ्रामध्ये आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याची स्वेच्छा दाखवली; यामुळे १९७० मध्ये युद्ध संपेपर्यंत अनेक बांधवांना आध्यात्मिक अन्‍नाचा लाभ झाला.—३/१ पृष्ठ २७.

वेस्टफेलियातील शांती तहाद्वारे काय साध्य करण्यात आले आणि यात धर्माचा समावेश कसा होता?

धर्मसुधारणेमुळे पवित्र रोमन साम्राज्याचे तीन पंथ झाले—कॅथलिक, ल्यूथरन आणि कॅल्व्हिनीस्ट. १७ व्या शतकाच्या सुरवातीला प्रॉटेस्टंट युनियनची आणि कॅथलिक लीगची स्थापना झाली. यानंतर, बोहेमियात एका धार्मिक युद्धाचा उद्रेक झाला आणि त्याची परिणती आंतरराष्ट्रीय प्रदेशव्याप्तीत झाली. कॅथलिक व प्रॉटेस्टंट शासकांनी, राजकीय श्रेष्ठत्व आणि व्यापारी लाभ मिळवण्यासाठी खूप धडपड केली. सरतेशेवटी, वेस्टफेलियाच्या जर्मन प्रांतात शांतीसाठी चर्चा झाल्या. जवळजवळ पाच वर्षांनंतर १६४८ साली वेस्टफेलियाच्या शांती तहावर सह्‍या करण्यात आल्या; यामुळे तीस वर्षांचे युद्ध समाप्त झाले आणि सार्वभौम राज्यांचा खंड म्हणून आधुनिक युरोपचा जन्म झाला.—३/१५, पृष्ठे २०-३.

६६६—या ‘श्‍वापदाच्या’ चिन्हाचा किंवा नावाचा काय अर्थ होतो?

प्रकटीकरण १३:१६-१८ मध्ये या चिन्हाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे श्‍वापद मानवी शासनाला सूचित करते आणि त्याच्यावरील ‘माणसाची संख्या’ पतित मानवी स्थितीचे प्रतिबिंब करणाऱ्‍या सरकारांना सूचित करते. ६०० अधिक ६० अधिक ६ किंवा ६६६ ही संख्या यहोवाच्या नजरेत ते पूर्णपणे दोषी व अपयशी असण्याला सूचित करते. हे चिन्ह धारण करणारे, राष्ट्राला आराधनेच्या बरोबरीचा आदर देतात किंवा त्याच्याकडून तारण मिळण्याची अपेक्षा करतात.—४/१, पृष्ठे ४-७.