निर्दयी जगात दयाळूपणे वागण्याकरता झटणे
निर्दयी जगात दयाळूपणे वागण्याकरता झटणे
“मनुष्याचा दयाळूपणा त्याला लोकांस प्रिय करतो.”—नीतिसूत्रे १९:२२.
१. दयाळूपणा दाखवणे इतके कठीण का असू शकते?
तुम्ही स्वतःला एक दयाळू व्यक्ती समजता का? असल्यास, आजच्या जगात राहणे तुम्हाला सोपे जाणार नाही. दयाळूपणा हा बायबलमध्ये ‘आत्म्याद्वारे निष्पन्न होणाऱ्या फळात’ सामील असल्याचे सांगितले आहे, पण मग ख्रिस्ती म्हणवल्या जाणाऱ्या देशांतही दयाळूपणाने वागणे इतके कठीण का आहे? (गलतीकर ५:२२) या आधीच्या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात प्रेषित योहानाने लिहिलेल्या शब्दांतून मिळते—सबंध जग एका निर्दयी आत्मिक व्यक्तीला, अर्थात दियाबल सैतानाला वश झाले आहे. (१ योहान ५:१९) येशू ख्रिस्ताने सैतानाला या “जगाचा अधिकारी” म्हटले. (योहान १४:३०) साहजिकच हे जग आपल्या विद्रोही अधिकाऱ्याच्याच मनोवृत्तीचे अनुकरण करते, जी त्याच्या क्रूर वर्तनातून व्यक्त होते.—इफिसकर २:२.
२. कोणत्या आव्हानांमुळे दयाळूपणा दाखवणे जड जाते?
२ इतरजण आपल्याशी निर्दयीपणे वागतात तेव्हा आपल्या जीवनावर याचा विपरीत परिणाम होतो. आकसखोर शेजारी, मैत्रिभाव नसणाऱ्या अनोळखी व्यक्ती, इतकेच काय तर प्रसंगी आपले स्वतःचे मित्र व कुटुंबीय देखील अविचारीपणे वागून आपल्या प्रती निर्दयी भावना व्यक्त करू शकतात. उद्धटपणे बोलणाऱ्या, एकमेकांवर ओरडणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवणे आपल्याला कठीण जाते; कित्येक वेळा आपल्याला मनःस्ताप होतो. इतरजणांच्या वागणुकीत दयाळूपणाचा अभाव पाहून आपल्या मनातही आकसखोर वृत्ती निर्माण होऊ शकते व आपण जशास तसे न्याय देण्यास प्रवृत्त होऊ शकतो. यामुळे कालांतराने आध्यात्मिक किंवा शारीरिक आरोग्यालाही नुकसान होण्याची शक्यता आहे.—रोमकर १२:१७.
३. कोणत्या गंभीर समस्यांमुळे लोकांच्या दयाळूपणे वागण्याच्या इच्छेची परीक्षा होते?
३ जगातल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळेही आपल्याला दयाळूपणा दाखवणे जड जाऊ शकते. उदाहरणार्थ, दहशतवादाच्या धमक्या व कारवाया, तसेच निरनिराळ्या राष्ट्रांकरवी जैविक किंवा आण्विक शस्त्रांचा वापर होण्याच्या भीतीमुळे सर्वसामान्य लोकांना तणाव जाणवतो. यासोबतच कोट्यवधी लोक दारिद्र्यात जगतात; धड दोन वेळचे जेवण नाही, डोक्यावर छत नाही, कपडालत्ता उपदेशक ७:७.
व वैद्यकीय सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत ते कसेबसे दिवस काढत आहेत. ही परिस्थिती सुधारण्यापलीकडे आहे असे भासते तेव्हा दयाळूपणे वागणे आणखीनच जड जाते.—४. इतरांना दया दाखवण्याविषयी विचार करताना काहीजण कोणत्या अयोग्य निष्कर्षावर येऊ शकतात?
४ अशा परिस्थितीत एक व्यक्ती सहज असा निष्कर्ष काढू शकते, की दयाळूपणा दाखवणे तितके महत्त्वाचे नाही आणि तो दाखवणे म्हणजे दुर्बलतेचे लक्षण आहे. आपल्यावर अन्याय होत आहे असे त्याला वाटू शकते, खासकरून इतरजण त्याला पायाखाली तुडवतात तेव्हा. (स्तोत्र ७३:२-९) पण बायबल आपल्याकरता योग्य मार्गदर्शन पुरवते. ते म्हणते: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतिसूत्रे १५:१) आत्म्याच्या फळापैकी सौम्यता व दयाळूपणा हे दोन गुण एकमेकांशी निगडीत आहेत आणि कठीण व आव्हानात्मक परिस्थितींना तोंड देत असताना ते अतिशय परिणामकारक ठरू शकतात.
५. जीवनातील काही क्षेत्रे कोणती आहेत की ज्यांत दयाळूपणे वागणे गरजेचे आहे?
५ देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ प्रदर्शित करणे, ख्रिस्ती या नात्याने आपल्याकरता अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे त्यापैकी एक गुण अर्थात दयाळूपणा आपण कसा दाखवू शकतो याचा विचार करणे लाभदायक ठरेल. या निर्दयी जगात दयाळूपणाने वागणे शक्य आहे का? जर आहे तर मग कोणती काही क्षेत्रे आहेत, की ज्यांत आपण, खासकरून तणावपूर्ण परिस्थितीत, सैतानाच्या कुप्रभावाला आपल्या दयाळूपणावर विजय मिळवू देत नाही हे दाखवू शकतो? कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, शाळेत, आपल्या शेजाऱ्यांशी व्यवहार करताना, आपल्या सेवाकार्यात आणि सहविश्वासू बांधवांसोबत आपण कशाप्रकारे दयाळूपणाने वागू शकतो हे विचारात घेऊ या.
कुटुंबात दयाळूपणे वागणे
६. कुटुंबात दयाळूपणाने वागणे इतके महत्त्वाचे का आहे आणि हा दयाळूपणा कसा दाखवता येतो?
६ यहोवाचा आशीर्वाद व मार्गदर्शन मिळण्याकरता आत्म्याचे फळ अत्यावश्यक असून ते पूर्णतः उत्पन्न करणे महत्त्वाचे आहे. (इफिसकर ४:३२) कुटुंबियांना एकमेकांशी दयाळूपणे वागणे गरजेचे का आहे याकडे लक्ष देऊ या. दैनंदिन व्यवहारांत, पती व पत्नीने आपसांत व मुलांशी वागताना दयाळू व काळजीवाहू वृत्ती दाखवावी. (इफिसकर ५:२८-३३; ६:१, २) कुटुंबातील सदस्य एकमेकांशी ज्या प्रकारे बोलतात त्यावरून हा दयाळूपणा दिसून आला पाहिजे; मुलांनी आपल्या आईवडिलांचा मान राखावा, त्यांना आदर द्यावा आणि आईवडिलांनीही मुलांशी योग्यप्रकारे वागावे. प्रशंसा करण्यास तत्पर असा पण दोष देण्याची घाई करू नका.
७, ८. (अ) कुटुंबात मनःपूर्वक दयाळूपणा दाखवायचा असल्यास आपण कशाप्रकारची वागणूक टाळावी? (ब) उत्तम संभाषणामुळे कुटुंबीयांमधले बंधन कशाप्रकारे मजबूत बनते? (क) तुम्हाला तुमच्या कुटुंबात दयाळूपणा कसा दाखवता येईल?
७ आपल्या कुटुंबातील सदस्यांशी दयाळूपणाने वागण्यात प्रेषित पौलाचा पुढील सल्ला पाळणे महत्त्वाचे आहे: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.” दररोज ख्रिस्ती कुटुंबांनी एकमेकांशी आदरपूर्वक संभाषण केले पाहिजे. कलस्सैकर ३:८, १२-१४.
का? कारण हा सुसंवादच मजबूत, व सुदृढ कुटुंबांचा प्राण आहे. मतभेद उद्भवतो तेव्हा तो सोडवण्याकरता, वादविवाद जिंकण्याचा नव्हे तर समस्या तडीस नेण्याचा प्रयत्न करा. आनंदी कुटुंबांचे सदस्य एकमेकांशी वागताना दयाळूपणाला व विचारशीलतेला चालना देतात.—८ दयाळूपणा हा सकारात्मक असून तो इतरांचे भले करण्यास आपल्याला उद्युक्त करतो. दयाळूपणाने प्रवृत्त होऊन आपण स्वखुषीने आपल्या कुटुंबीयांना मदत करण्याचा व त्यांच्या भावनांची कदर करण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारचा दयाळूपणा ज्या कुटुंबात दाखवला जातो ते सर्वांच्या आदरास पात्र ठरते; पण असे घडण्याकरता कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने व सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिणामस्वरूप आपल्याला केवळ देवाचा आशीर्वादच मिळणार नाही तर मंडळीत व ज्या समाजात आपण राहतो त्यातही दयाळू देव यहोवा याच्या नावाचे गौरव होईल.—१ पेत्र २:१२.
कामाच्या ठिकाणी दयाळूपणा
९, १०. कामाच्या ठिकाणी उद्भवू शकणाऱ्या काही समस्यांची उदाहरणे द्या आणि या समस्या दयाळू पद्धतीने कशा सोडवता येतील हे सांगा.
९ एका ख्रिस्ती व्यक्तीकरता दररोज त्याच्या नोकरीच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्यांना दयाळूपणा दाखवणे आव्हानाप्रमाणे असू शकते. कर्मचाऱ्यांमध्ये सहसा स्पर्धेची भावना असते. असे समजा की एखादा सहकर्मचारी कपटीपणे राजकारण खेळतो व मालकाच्या नजरेत तुमची प्रतिमा डागाळतो. तुमची नोकरी जाण्यापर्यंत वेळ येते. (उपदेशक ४:४) अशा वेळी दयाळूपणा दाखवणे अर्थातच सोपे नाही. पण नेहमी आठवणीत असू द्या, की दयाळूपणे वागणे हाच योग्य मार्ग आहे; यहोवाच्या सेवकाने वाईट प्रवृत्तीच्या माणसालाही शक्यतो आपल्या चांगल्या वागणुकीने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे करण्याकरता विचारशील मनोवृत्ती मदत करेल. तो सहकर्मचारी आजारी पडल्यास, किंवा कदाचित त्याच्या कुटुंबात कोणी आजारी असल्यास तुम्ही काळजी व्यक्त करू शकता. केवळ विचारपूस केल्यानेही दुसऱ्या व्यक्तीवर चांगला परिणाम होऊ शकतो. होय, ख्रिश्चनांनी शांती व सलोखा कायम राखण्याचा आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. कधीकधी काळजी व्यक्त करण्यासाठी दयाळूपणे बोललेले शब्द समस्या सोडवण्यास हातभार लावू शकतात.
१० कधीकधी, मालक आपली मते आपल्या कर्मचाऱ्यांवर लादतात. असा एखादा मालक कदाचित सर्व कर्मचाऱ्यांना एखाद्या राष्ट्रदिनानिमित्त बायबलनुसार उचित नसलेल्या कार्यक्रमात किंवा उत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा करू शकतो. ख्रिस्ती व्यक्तीचा विवेक तिला अशा गोष्टींत सहभागी होण्याची परवानगी देत नसल्यामुळे मालकासोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्या क्षणी मालकाच्या इच्छेनुसार वागणे किती चुकीचे ठरेल हे सविस्तर समजावून सांगणे कदाचित शहाणपणाचे ठरणार नाही. कारण ज्यांचे ख्रिस्ती विश्वास नाहीत त्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होण्यात काहीही गैर वाटणार नाही, उलट तेच योग्य आहे असे त्यांना वाटेल. (१ पेत्र २:२१-२३) अशा वेळी कदाचित तुम्ही या कार्यक्रमात सहभागी न होण्याची वैयक्तिक कारणे दयाळूपणे स्पष्ट करू शकता. त्यांनी टोमणे मारल्यास आपण त्याच सुरात बोलू नये. रोमकर १२:१८ यातील उत्तम सल्ला ख्रिस्ती व्यक्तीने पाळावा: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”
शाळेत दयाळूपणे वागणे
११. शाळासोबत्यांशी दयाळूपणे वागण्यात तरुणांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते?
११ शाळेत जाणाऱ्या मुलांनाही आपल्या शाळासोबत्यांशी दयाळूपणे वागणे जड जाण्याची शक्यता आहे. तरुण वयातील मुलामुलींना सहसा आपल्या वर्गसोबत्यांची मर्जी राखायची असते. इतर विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यासाठी काही मुले आपली मर्दानगी दाखवण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी तर ते इतर मुलांवर दादागिरी देखील करतात. (मत्तय २०:२५) काही तरुणांना अभ्यासात, खेळक्रिडा किंवा इतर गोष्टींत आपण किती प्रवीण आहोत याचा दिखावा करण्यास आवडते. आपल्या कौशल्यांचा तोरा मिरवताना ते सहसा इतर वर्गसोबत्यांशी अविचारीपणे वागतात; केवळ काही कौशल्ये असल्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा चुकीचा विचार ते करतात. ख्रिस्ती तरुणांनी अशा प्रकारच्या व्यक्तीचे अनुकरण न करण्याविषयी सावध असावे. (मत्तय २०:२६, २७) प्रेषित पौलाने म्हटले की “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे” तसेच त्याने म्हटले की, “प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही.” त्याअर्थी, शाळासोबत्यांशी व्यवहार करताना, अविचारीपणे वागणाऱ्यांच्या वाईट उदाहरणाचे अनुकरण न करता बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याची ख्रिश्चनांवर जबाबदारी आहे.—१ करिंथकर १३:४.
१२. (अ) तरुणांना आपल्या शिक्षकांशी दयाळूपणे वागणे का जड जाऊ शकते? (ब) अविचारीपणे वागण्याचा दबाव येतो तेव्हा तरुण कोणाकडे मदतीची अपेक्षा करू शकतात?
१२ तरुणांनी आपल्या शिक्षकांशीही दयाळूपणे वागले पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना खिजवायला आवडते. शाळेचे नियम तोडून शिक्षकांप्रती अनादर दाखवणारी ही मुले स्वतःला फारच शहाणी समजतात. इतर मुलांना धमकावून त्यांनाही आपल्यात सामील करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. जेव्हा एक ख्रिस्ती तरुण त्यांच्यासोबत सहभागी होण्यास नकार देतो तेव्हा त्याची थट्टा केली जाते, व कधीकधी त्याच्याशी दुर्व्यवहारही केला जातो. शाळेच्या सबंध वर्षभर अनेकदा अशा प्रसंगांना तोंड देताना एका ख्रिस्ती तरुणाच्या दयाळूपणाची परीक्षा होऊ शकते. पण, यहोवाचा एकनिष्ठ सेवक असणे किती महत्त्वाचे आहे हे कधीही विसरू नका. तो तुम्हाला आपल्या आत्म्याच्या माध्यमाने जीवनातल्या अशा कठीण प्रसंगांना तोंड देण्यास अवश्य साहाय्य करेल याची खात्री बाळगा.—स्तोत्र ३७:२८.
शेजाऱ्यांशी दयाळूपणा
१३-१५. आपल्या शेजाऱ्यांना दयाळूपणा दाखवण्याच्या मार्गात कोणते अडथळे येऊ शकतात आणि त्यांच्यावर कशाप्रकारे मात केली जाऊ शकते?
१३ तुम्ही घरात, अपार्टमेंटमध्ये, ट्रेलरपार्कमध्ये किंवा आणखी कोठे राहात असाल. कोठेही राहात असला तरीही, आपल्या शेजाऱ्यांशी दयाळूपणे वागण्याचे व त्यांच्याप्रती काळजी व्यक्त करण्याचे मार्ग तुम्ही शोधू शकता. हे देखील सोपे नाही.
१४ तुमच्या शेजाऱ्यांना कदाचित तुमच्या जातीधर्मामुळे किंवा तुम्ही ज्या देशाचे आहात यामुळे तुमच्याविषयी पूर्वग्रह असतील. अशा वेळी काय करावे? कधीकधी ते तुमच्याशी अपमानास्पद रितीने बोलत असतील किंवा तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतील तर काय करावे? यहोवाचा सेवक या नात्याने आपल्या परीने शक्य तोवर दयाळूपणाने वागणेच हितकारक ठरेल. तुमची वागणूक मैत्रीपूर्ण व जगावेगळी असेल आणि यामुळे दयाळूपणाचा सर्वोच्च आदर्श यहोवा देव याचे गौरव होईल. तुमच्या दयाळूपणामुळे कोण जाणे, कदाचित आज न उद्या तुमच्या या शेजाऱ्याच्या मनोवृत्तीत बदल घडून येईल. तो यहोवाचा सेवक बनण्याचीही शक्यता आहे.—१ पेत्र २:१२.
१५ दयाळूपणा कसा दाखवता येईल? एक तर, तुमच्या कुटुंबात सर्वजण आत्म्याचे फळ प्रदर्शित करत असल्यास, तुमच्या आदर्श वागणुकीद्वारे तुम्ही दयाळूपणा दाखवू शकता. तुमचे शेजारी कदाचित हे पाहतील. कधी तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकरता एखादे दयाळू कृत्य करू शकता. लक्षात ठेवा, दया दाखवणे म्हणजेच इतरांचे भले होण्याकरता उत्सुकतेने प्रयत्न करणे.—१ पेत्र ३:८-१२.
आपल्या सेवाकार्यात दयाळूपणा
१६, १७. (अ) आपल्या सार्वजनिक सेवाकार्यात दयाळूपणा दाखवण्याची गरज का आहे? (ब) क्षेत्र सेवाकार्याच्या विविध प्रकारात सहभागी होताना आपण दयाळूपणा कसा दाखवू शकतो?
१६ लोकांना त्यांच्या घरी, व्यापाराच्या ठिकाणी व सार्वजनिक स्थळांवर भेटण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करत असताना आपल्या ख्रिस्ती सेवाकार्याच्या सर्व पैलूंत दयाळूपणा दिसून आला पाहिजे. आपण नेहमी आठवणीत ठेवले निर्गम ३४:६.
पाहिजे की आपण यहोवाचे प्रतिनिधीत्व करतो, जो नेहमी दयाळूपणाने व्यवहार करतो.—१७ तुमच्या सेवाकार्यात दयाळूपणा दाखवण्याचा तुम्ही कोणकोणत्या प्रकारे प्रयत्न करू शकता? उदाहरणार्थ, रस्त्यावरील साक्षकार्य करतेवेळी तुम्ही लोकांना थांबवून त्यांच्याशी बोलता तेव्हा, थोडक्यात बोलण्याद्वारे तुम्ही विचारशीलता दाखवू शकता. फूटपाथवर सहसा बरीच रहदारी असल्यामुळे लोकांच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. तसेच बिझनेस क्षेत्रात साक्षकार्य करताना, दुकानदारांना ग्राहकांकडे लक्ष द्यायचे असते हे लक्षात ठेवून थोडक्यात बोलण्याद्वारे दयाळूपणा दाखवा.
१८. आपल्या सेवाकार्यात दयाळूपणा दाखवण्यात विचारशीलतेची कोणती भूमिका आहे?
१८ घरोघरच्या सेवाकार्यात सहभागी होताना विचारशीलता दाखवा. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ कोणत्याही घरात थांबू नका, खासकरून बाहेर हवामान चांगले नसते तेव्हा. एखाद्याला तुमचे ऐकून कंटाळा आलाय किंवा तुम्ही लवकर जावे असे त्याला वाटतेय हे तुम्हाला ओळखता येते का? कदाचित तुम्ही राहता त्या क्षेत्रात यहोवाचे साक्षीदार वारंवार लोकांच्या घरी भेटी देत असतील. असे असल्यास विचारशीलता दाखवण्याचा खास प्रयत्न करा, नेहमी प्रेमळपणे व विनयशीलतेने वागा. (नीतिसूत्रे १७:१४) एखाद्या विशिष्ट दिवशी घरमालकाला ऐकण्याची इच्छा नसेल तर त्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज न उद्या तुमच्या ख्रिस्ती भाऊबहिणींपैकी कोणीतरी या व्यक्तीला भेट देईल हे विसरू नका. एखादी व्यक्ती उद्धटपणे बोलल्यास, दयाळूपणे वागण्याचा खास प्रयत्न करा. तुमचा आवाज वाढवू नका किंवा कपाळाला आठ्या पाडून त्यांच्याशी बोलू नका तर शांतपणे बोला. दयाळू ख्रिस्ती मुद्दामहून घरमालकाला चिडवून भांडण सुरू करणार नाही. (मत्तय १०:११-१४) एखाद्या दिवशी कदाचित ही व्यक्तीही सुवार्ता ऐकून घेण्यास तयार होईल.
मंडळीच्या सभांदरम्यान दयाळूपणा
१९, २०. मंडळीत दयाळूपणा दाखवणे का गरजेचे आहे आणि तो कसा दाखवता येईल?
१९ आपल्या सहविश्वासू बांधवांशी दयाळूपणे वागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (इब्री लोकांस १३:१) आपण एका जागतिक बंधूसमाजाचा भाग असल्यामुळे एकमेकांशी व्यवहार करताना दयाळूपणा दाखवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
२० जर एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त मंडळ्या सभा भरवण्याकरता एकाच राज्य सभागृहाचा वापर करत असतील तर आपल्या मंडळीसोबतच इतर मंडळ्यांच्या बांधवांशीही दयाळूपणे वागणे, व त्यांनाही आदर देणे महत्त्वाचे आहे. सभांच्या वेळा ठरवताना किंवा स्वच्छता, दुरुस्तीची कामे इत्यादी व्यवस्था करताना स्पर्धात्मक भावना राखल्यास सहकार्य करणे कठीण होईल. आपसांत काही मतभेद असले तरीसुद्धा दयाळू व विचारशील असण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास दयाळूपणाचा विजय होईल आणि तुम्ही इतरांच्या हिताची चिंता करत असता, यहोवा तुम्हाला खरोखर आशीर्वादित करील.
दयाळूपणा दाखवत राहा
२१, २२. कलस्सैकर ३:१२ या वचनानुसार आपला निर्धार काय असावा?
२१ दयाळूपणाचा अवाका इतका मोठा आहे की हा गुण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करतो. म्हणूनच आपण त्याला आपल्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वात सामावून घेतले पाहिजे. दयाळूपणा दाखवण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे.
२२ आपण सर्वजण दररोज इतरांना दयाळूपणा दाखवण्याचा प्रयत्न करू या आणि अशारितीने प्रेषित पौलाच्या या शब्दांचे वैयक्तिकरित्या पालन करू या: “देवाचे निवडलेले, पवित्र आणि प्रिय यांच्याप्रमाणे तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या.”—कलस्सैकर ३:१२.
तुम्हाला आठवते का?
• ख्रिस्ती व्यक्तीला दयाळूपणा दाखवणे कशामुळे कठीण जाते?
• आपल्या कुटुंबात दयाळूपणा दाखवणे का महत्त्वाचे आहे?
• शाळेत, कामाच्या ठिकाणी व शेजाऱ्यांना दयाळूपणा दाखवण्याच्या मार्गात कोणते अडथळे येऊ शकतात?
• ख्रिस्ती आपल्या सार्वजनिक सेवाकार्यात कशाप्रकारे दयाळूपणा दाखवू शकतात हे स्पष्ट करा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
कुटुंबात सर्वांनी दयाळूपणा दाखवल्यास एकता व सहकार्याला पोषक असे वातावरण निर्माण होईल
[१९ पानांवरील चित्र]
एखादा सहकर्मी किंवा त्याच्या कुटुंबातले कोणी आजारी पडते तेव्हा तुम्ही दयाळूपणाने वागू शकता
[२० पानांवरील चित्र]
इतरजण थट्टा करतात तरीसुद्धा जे एकनिष्ठपणे दयाळूपणा दाखवतात त्यांना यहोवा साहाय्य करतो
[२१ पानांवरील चित्र]
गरजवंत शेजाऱ्याला मदत करणे हे दयाळूपणाचे कृत्य आहे