व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलच्या मदतीमुळे त्याने मोहाचा प्रतिकार केला

बायबलच्या मदतीमुळे त्याने मोहाचा प्रतिकार केला

बायबलच्या मदतीमुळे त्याने मोहाचा प्रतिकार केला

आज जगात अनेक मोह आहेत. बायबल तत्त्वांनुसार जगणे सोपे नाही. उदाहरणार्थ, “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करणे कठीण असू शकते.—१ करिंथकर ६:१८.

सबास्टीन नावाचा एक यहोवाचा साक्षीदार, पोलंडमधील एका स्कॅन्डिनेव्हियन कंपनीत कामाला होता. एकनिष्ठ राहण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.

सबास्टीन यहोवाचा एक साक्षीदार आहे, हे सर्वांना कळाले. त्याच्या सुपरवायजर्सनी त्याच्या कष्टाळुपणाचे आणि उत्तम आचरणाचे कौतुक केले आणि त्याला विविध सुसंधी दिल्या. परंतु, नंतर असे कळून आले, की या सुसंधी म्हणजे, अशा व्यापार सभा जेथे शंकास्पद मनोरंजन चालत असे.

सबास्टीनला शंका येऊ लागली. “माझ्या बॉसना माहीत आहे, की मी यहोवाचा साक्षीदार आहे. त्यामुळे ते माझ्यावर विश्‍वास ठेवतात आणि माझ्यावर अवलंबून राहतात. मी जर यात भाग घ्यायला नकार दिला तर ही नोकरी हातची गमावून बसेन; आधीच नोकरी मिळणे मुश्‍कील आहे. पण मी कशात भाग न घेता फक्‍त बघत राहीन, काय हरकत आहे?”

यानंतर सबास्टीनला आणखी काहीतरी समजले. त्याला, विदेशी ग्राहकांची “काळजी” घ्यावी लागणार होती; संध्याकाळच्या वेळी अनैतिक कामासाठी त्यांना “मुली” पुरवाव्या लागणार होत्या. आता तो काय करणार?

सबास्टीनने आपल्या सुपरवायजरला ही आठवण करून देण्याचे ठरवले, की अनैतिकतेविषयी त्याचा बायबलप्रमाणे दृष्टिकोन होता. लगेच हे स्पष्ट झाले, की सबास्टीन ही नोकरी करू शकत नाही व आज नाहीतर उद्या त्याला ही नोकरी सोडावी लागेल. त्याला नवीन नोकरी मिळाली; तिथे पगार कमी होता परंतु असे मोह नव्हते. आता त्याचा विवेक शुद्ध आहे.

अनैतिक कामात भाग घेण्यास किंवा त्याच्याकडे कानाडोळा करण्यास तुमच्यावर कोणी दबाव आणल्यास तुम्ही काय कराल? तुम्ही देखील मोठा बदल करण्यास तयार व्हाल का? प्राचीन काळच्या योसेफाने हेच केले; त्याबद्दलचा अहवाल उत्पत्ति ३९:७-१२ मध्ये दिला आहे.