व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सध्या देवाच्या इच्छेप्रमाणे होत आहे का?

सध्या देवाच्या इच्छेप्रमाणे होत आहे का?

सध्या देवाच्या इच्छेप्रमाणे होत आहे का?

“जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”मत्तय ६:१०.

हूल्यो आणि क्रिस्टीना फक्‍त बघत राहिले. त्यांच्याच डोळ्यांसमोर त्यांची चार मुले जळून राख झाली. त्यांच्या उभ्या गाडीला एका दारू प्यायलेल्या चालकाने टक्कर मारली आणि त्यांच्या गाडीचा विस्फोट झाला. त्यांचा पाचवा मुलगा, मार्कोस याला आगीतून वाचवण्यात आले पण तो इतका भाजला होता की, त्याचा चेहरा कायमचा विद्रुप झाला. तो नऊ वर्षांचा होता. त्याच्या वडिलांना अतीव दुःख झाले होते. पण, “ही देवाची इच्छा आहे; ती चांगली असो नाहीतर वाईट आपल्याला ती स्वीकारावी लागेल,” असे म्हणत त्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची समजूत घातली.

या प्रकारच्या दुर्घटनेच्या वेळी पुष्कळजण अशीच प्रतिक्रिया दाखवतात. ते असा तर्क करतात की, ‘देव सर्वशक्‍तिमान आहे आणि त्याला आपली काळजी आहे, तर जे काही होते ते आपल्या भल्यासाठीच असणार; मग ते समजून घेणे कठीण वाटत असले तरीही.’ तुम्हालाही असेच वाटते का?

जे काही होते—चांगले अगर वाईट—ते देवाच्या इच्छेप्रमाणे होते, असे वर उद्धृत केलेल्या प्रभूच्या प्रार्थनेतील येशूच्या शब्दांच्या आधारे सहसा म्हटले जाते. स्वर्गात देवाच्या इच्छेप्रमाणे होत आहे, नाही का? मग, ‘पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’ अशी प्रार्थना करताना, पृथ्वीवर जे काही होते ते देवाच्या इच्छेप्रमाणे होते असे आपण मान्य करतो, नाही का?

पण पुष्कळांना हे मत पटत नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर, मानवी निर्मितीच्या भावनांबद्दल असंवेदनशील असलेला देव उभा राहतो. त्यांना असा प्रश्‍न पडतो, की ‘एक प्रेमळ देव, निष्पाप लोकांबद्दल अशा भयंकर गोष्टींची इच्छा कशी बाळगू शकतो? यातून काही धडा शिकायचा असेल तर तो धडा काय असावा?’ कदाचित तुम्हालाही असेच वाटत असेल.

याविषयी, येशूचा सावत्र भाऊ, शिष्य याकोब याने लिहिले: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहांत घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” (याकोब १:१३) वाईट गोष्टी देवाकडून होत नाहीत. तेव्हा, आज पृथ्वीवर होत असलेल्या सर्व गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे नाहीत, हे स्पष्ट होते. शास्त्रवचनांमध्ये मनुष्यांची इच्छा, राष्ट्रांची इच्छा आणि सैतानाची इच्छा याचाही उल्लेख केला आहे. (योहान १:१३; २ तीमथ्य २:२६; १ पेत्र ४:३) हूल्यो आणि क्रिस्टीनाच्या कुटुंबासोबत जे घडले ते एका प्रेमळ स्वर्गीय पित्याची इच्छा असू शकत नाही याच्याशी तुम्ही सहमत आहात का?

तर मग, येशूने आपल्या शिष्यांना, “तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” अशी प्रार्थना करायला शिकवले तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होता? देवाने विशिष्ट वेळी हस्तक्षेप करावा म्हणून ही केवळ एक विनंती होती की येशू आणखी महत्त्वाच्या व उत्कृष्ट गोष्टीसाठी अर्थात सर्वजण आशा करू शकतील अशा बदलासाठी प्रार्थना करायला शिकवत होता? बायबल याविषयी काय म्हणते त्यावर आपण आणखी परीक्षण करूया.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

कार: Dominique Faget-STF/AFP/Getty Images; मूल: FAO photo/B. Imevbore