तरुणांनो, तुम्ही उत्तम भविष्याची उभारणी करत आहात का?
तरुणांनो, तुम्ही उत्तम भविष्याची उभारणी करत आहात का?
“तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.”—यिर्मया २९:११.
१, २. तारुण्याच्या काळाविषयी कोणत्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करता येईल?
बहुतेक वयस्क म्हणतात की तारुण्याचा काळ हा जीवनाचा सुवर्णकाळ असतो. त्यांना तारुण्यातला उत्साह व चैतन्य आठवते. जीवनात जेव्हा फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या, जेव्हा त्यांना मनसोक्त मौजमजा करता यायची आणि जेव्हा डोळ्यासमोर सबंध जीवन आणि अनेक सुसंधी होत्या असा तो तारुण्याचा काळ त्यांना राहून राहून आठवतो.
२ तुमच्यापैकी जे तरुण आहेत त्यांना मात्र आता असे वाटत नसेल. तारुण्यात होणाऱ्या भावनिक व शारीरिक बदलांमुळे तुम्हाला कदाचित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल. शाळेत कदाचित तुमचे साथीदार तुमच्यावर दबाव आणत असतील. ड्रग्स घेणे, मद्यपान करणे व अनैतिकतेत सामील होण्याचा मोह टाळण्याकरता कदाचित तुम्हाला खूप निर्धाराने प्रयत्न करावा लागत असेल. तसेच तटस्थ राहण्याविषयी व तुमच्या विश्वासासंबंधी इतर गोष्टींविषयीही तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल. होय, तारुण्याचा काळही अतिशय कठीण काळ असू शकतो. पण तरीसुद्धा हा सुवर्णसंधींचा काळ आहे याबद्दल वाद नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही या सुवर्णसंधींचा कसा उपयोग कराल?
आपल्या तारुण्याचा आनंद घ्या
३. शलमोनाने तरुणांना कोणता सल्ला व कोणती ताकीद दिली?
३ वृद्ध जनांना विचारल्यास ते तुम्हाला सांगतील की तारुण्य फार काळ टिकत नाही, आणि त्यांचे म्हणणे अगदी खरे आहे. काही वर्षांतच तुमचे तारुण्य सरून गेलेले असेल. तेव्हा, ते असेपर्यंत त्याचा आनंद लुटा! राजा शलमोनाने हाच सल्ला दिला. त्याने लिहिले: “हे तरुणा, आपल्या तारुण्यांत आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.” पण शलमोनाने तरुणांना एक ताकीद देखील दिली: “आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख.” व पुढे त्याने म्हटले की, “तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.”—उपदेशक ११:९, १०.
४, ५. तरुणांनी भावी जीवनाची तयारी करणे का सुज्ञतेचे आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.
४ शलमोनाने दिलेल्या सल्ल्याचे तात्पर्य तुम्हाला कळले का? एका उदाहरणावरून ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. समजा, एका तरुणाला बक्षीसात एक मोठी रक्कम मिळाली. असे समजू की त्याला वारसाहक्काने हे धन मिळाले. आता, या पैशाचे तो काय करेल? येशूच्या दाखल्यातील उधळ्या पुत्राप्रमाणे, वाटल्यास तो मौजमजेखातर हा सर्व पैसा खर्च करू शकतो. (लूक १५:११-२३) पण पैसा संपल्यावर काय होईल? नक्कीच त्याला आपल्या बेजबाबदारपणाबद्दल पस्तावा वाटेल! दुसरीकडे पाहता, तो ही रक्कम आपल्या भविष्यकाळाची उभारणी करण्याकरता वापरू शकतो; दुसऱ्या शब्दांत तो पैशाची विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतो. असे केल्यास, कालांतराने त्याच्या गुंतवणुकीमुळे त्याला फायदा मिळू लागेल; तेव्हा, आपण तारुण्यात हा पैसा मौजमजेकरता का उधळला नाही याचा त्याला पस्तावा होईल का? निश्चितच नाही!
५ तारुण्याची वर्षे तुम्हाला देवाकडून मिळालेले बक्षीस आहे असे समजा, आणि ते खरोखरच आहे. या वर्षांचा तुम्ही कसा उपयोग करणार? भविष्याचा जराही विचार न करता, तारुण्यातला सर्व उत्साह व जोम तुम्ही स्वार्थी कार्यांकरता, दररोज नवनव्या प्रकारची मौजमजा करण्यात वाया घालवू शकता. मात्र असे केल्यास तुमचे “तारुण्य व भरज्वानी” खरोखरच “व्यर्थ” ठरेल. पण तेच, जर तुम्ही भावी जीवनाची
तयारी करण्याकरता तारुण्याचा उत्तम फायदा करून घेतला तर तुमचे भले होईल!६. (अ) शलमोनाचा कोणता सल्ला तरुणांकरता मार्गदर्शक आहे? (ब) यहोवा तरुणांकरता काय करू इच्छितो आणि एक तरुण व्यक्ती याचा कशाप्रकारे फायदा करून घेऊ शकते?
६ शलमोनाने एक तत्त्व मांडले होते, जे तुम्हाला आपल्या तारुण्याचा उत्तमप्रकारे उपयोग करण्यास सहायक ठरू शकेल. त्याने म्हटले: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उपदेशक १२:१) हीच यशाची गुरूकिल्ली आहे—यहोवाचे ऐकणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करणे. यहोवाने प्राचीन इस्राएलांना सांगितले की तो त्यांच्याकरता काय करू इच्छित होता: “तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.” (यिर्मया २९:११) तुम्हालाही “तुमच्या भावी सुस्थितीची आशा” यहोवा देऊ इच्छितो. जर तुम्ही सर्व कृतींत, विचारांत व निर्णयांत यहोवाला आठवणीत ठेवले तर तुमचे भविष्य व तुमची आशा उज्ज्वल असेल.—प्रकटीकरण ७:१६, १७; २१:३, ४.
“देवाजवळ या”
७, ८. एक तरुण व्यक्ती कशाप्रकारे देवाच्या जवळ येऊ शकते?
७ याकोबाने आपल्याला यहोवाला स्मरण्याचे प्रोत्साहन दिले; त्याने आग्रहपूर्वक म्हटले: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याकोब ४:८) यहोवा हा निर्माणकर्ता, स्वर्गीय सार्वभौम प्रभू आणि सर्वांच्या उपासनेस व गौरवास पात्र आहे. (प्रकटीकरण ४:११) आणि तरीसुद्धा, जर आपण त्याच्याजवळ आलो तर तो आपल्याजवळ येईल असे आश्वासन तो देतो. देवाची ही प्रेमळ उत्सुकता पाहून तुमचे मन भरून येत नाही का?—मत्तय २२:३७.
८ यहोवाच्या जवळ येण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ प्रेषित पौलाने म्हटले: “प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुति करीत जागृत राहा.” (कलस्सैकर ४:२) दुसऱ्या शब्दांत, प्रार्थना करण्याची सवय लावा. घरात तुमचे वडील प्रार्थना करतात किंवा मंडळीत एखादा सह ख्रिस्ती बांधव प्रार्थना करतो तेव्हा केवळ शेवटी आमेन म्हणण्यात समाधान मानू नका. तुम्ही स्वतः कधी यहोवाजवळ आपले मन मोकळे केले आहे का, तुम्हाला काय वाटते, कशाविषयी भीती वाटते, तुमच्यासमोर कोणती आव्हाने आहेत हे त्याला कधी सांगितले आहे का? कोणत्याही मानवासोबत ज्याविषयी चर्चा करण्यास तुम्हाला संकोच वाटेल अशा गोष्टींविषयी तुम्ही यहोवाशी हितगुज केले आहे का? प्रामाणिक, मनःपूर्वक प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला शांती अनुभवता येईल. (फिलिप्पैकर ४:६, ७) या प्रार्थना आपल्याला यहोवाच्या जवळ येण्यास मदत करतील आणि हळूहळू आपल्याला जाणवेल की तोही आपल्या जवळ येत आहे.
९. तरुण व्यक्ती कशाप्रकारे यहोवाचे ऐकू शकते?
९ यहोवाच्या जवळ येण्याचा आणखी एक मार्ग आपल्याला पुढील देवप्रेरित शब्दांतून समजतो: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यांत तू सुज्ञपणे वागशील.” (नीतिसूत्रे १९:२०) होय, जर तुम्ही यहोवाचे ऐकले आणि त्याच्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही तुमच्या भविष्याची उभारणी करत आहात. आपण यहोवाचे ऐकतो हे कसे दाखवता येईल? अर्थातच तुम्ही ख्रिस्ती सभांना जात असाल आणि तेथे होणारे कार्यक्रम लक्ष देऊन ऐकत असाल. तसेच तुम्ही कौटुंबिक बायबल अभ्यासाला उपस्थित राहण्याद्वारे आपल्या ‘आईबापांचा मान राखत’ असाल. (इफिसकर ६:१, २; इब्री लोकांस १०:२४, २५) हे तुम्ही करता ते उत्तम आहे. पण यासोबतच तुम्ही सभांची तयारी करण्याकरता, बायबलचे नियमित वाचन करण्याकरता आणि संशोधन करण्याकरता ‘वेळेचा सदुपयोग’ करता का? तुम्ही जे वाचता त्याच्या व्यावहारिक उपयोगासंबंधी मनन करता का, जेणेकरून तुम्हाला ‘ज्ञान्यासारखे’ चालता येईल? (इफिसकर ५:१५-१७; स्तोत्र १:१-३) असे केल्यास, तुम्ही यहोवाच्या जवळ येत आहात.
१०, ११. तरुण लोक यहोवाचे ऐकतात तेव्हा त्यांना कोणते विलक्षण लाभ प्राप्त होतात?
१० बायबलमधील नीतिसूत्रांच्या पुस्तकातील प्रस्तावनेत प्रेरित लेखक या पुस्तकाच्या उद्देशाचे वर्णन करतो. तो म्हणतो: “ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे; सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म नीति व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी. भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे.” (नीतिसूत्रे १:१-४) तेव्हा नीतिसूत्रांतील, तसेच उर्वरीत बायबलमधील शब्द तुम्ही वाचता व त्यांचे पालन करता तसतसे तुम्ही धार्मिकता व नीतिमत्त्व विकसित कराल आणि तुम्हाला आपल्या जवळ येऊ देण्यास यहोवाला संतोष वाटेल. (स्तोत्र १५:१-५) तुम्ही चातुर्य, ज्ञान, चाणाक्षपण आणि विचारक्षमता संपादन करता तसतसे तुम्हाला अधिकाधिक उत्तम निर्णय घेण्यास मदत होईल.
१ तीमथ्य ४:१२) साहजिकच त्यांच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान वाटतो आणि ते माझे मन आनंदित करतात असे यहोवा त्यांच्याविषयी म्हणतो. (नीतिसूत्रे २७:११) वय कमी असले तरीसुद्धा पुढील देवप्रेरित शब्द आपल्याला लागू होतात याची खात्री ते बाळगू शकतात: “सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.”—स्तोत्र ३७:३७.
११ तरुण वयात एका व्यक्तीकडून अशाप्रकारे सुज्ञतेने वागण्याची अपेक्षा करणे अव्यावहारिक आहे का? नाही, कारण अनेक तरुण ख्रिस्ती असे करत आहेत. परिणामस्वरूप, इतरजण त्यांचा आदर करतात आणि कोणीही त्यांच्या ‘तारुण्याला तुच्छ मानत नाहीत.’ (उत्तम निर्णय घ्या
१२. तरुणांना कोणत्या एका महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दूरगामी परिणाम का होतात?
१२ तारुण्य हा निर्णय घेण्याचा काळ आहे आणि तारुण्यात घेतलेल्या काही निर्णयांचा परिणाम सबंध जीवनावर होतो. आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्ही तुमच्या भावी जीवनाला आकार देत आहात. उत्तम निर्णय घेतल्यास तुमचे जीवन आनंदी व यशस्वी ठरेल. पण अविचारीपणे अयोग्य मार्ग निवडल्यास सबंध जीवनभर तुम्हाला पस्तावावे लागेल. दोन उदाहरणे घेऊन या तत्त्वाची सत्यता पडताळून पाहू या. पहिले: तुम्ही कोणासोबत संगती करण्याचे निवडता? हे विचारात घेणे महत्त्वाचे का आहे? प्रेरित नीतिसूत्राप्रमाणे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) दुसऱ्या शब्दांत, कालांतराने आपण ज्यांच्यासोबत उठतोबसतो त्यांच्यासारखेच बनतो—एकतर सुज्ञ नाहीतर मूर्ख. तुम्हाला कशाप्रकारची व्यक्ती होण्यास आवडेल?
१३, १४. (अ) आपण संगती म्हणतो तेव्हा त्यात लोकांव्यतिरिक्त आणखी कशाचा समावेश होतो? (ब) तरुणांनी कोणती चूक करण्याचे टाळावे?
१३ संगती म्हणताच, कदाचित तुम्ही लोकांबद्दल विचार केला असेल. हे खरे आहे पण संगती म्हणजे केवळ व्यक्तींची सोबत नव्हे. तुम्ही टीव्हीवर एखादा कार्यक्रम पाहता, संगीत ऐकता, कादंबरी वाचता, सिनेमा पाहता किंवा इंटरनेटवर विशिष्ट साधनांचा उपयोग करता तेव्हा तुम्ही संगतीच करत असता. ही संगती जर हिंसक किंवा अनैतिक प्रवृत्ती जागृत करत असेल अथवा ड्रग्सचे व्यसन, मद्यपान किंवा बायबलच्या विरोधात असलेल्या कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देत असेल तर तुम्ही जणू एका “मूढ” व्यक्तीची संगत धरल्यासारखे होईल; एक अशी व्यक्ती जी आपल्या वागणुकीवरून दाखवते की तिला यहोवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही.—स्तोत्र १४:१.
१४ कदाचित तुम्हाला असे वाटत असेल, की आपण १ करिंथकर १५:३३) दुःखाने म्हणावे लागते, पण कित्येक होतकरू ख्रिस्ती तरुणांनी कुसंगतीमुळे आपल्या चांगल्या सवयींचा नाश करून घेतला आहे. तेव्हा, अशा कुसंगतीचा धिक्कार करण्याचा निर्धाराने प्रयत्न करा. तुम्ही असे केल्यास, पौलाच्या या सल्ल्याचे तुम्ही पालन कराल: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:२.
तर ख्रिस्ती सभांना जातो आणि मंडळीतही सक्रिय आहोत; त्यामुळे एखादा हिंसक चित्रपट पाहिला किंवा वावगे बोल असलेला एखादा म्युझिक ॲल्बम, केवळ त्यातील गीतांची चाल उत्तम असल्यामुळे ऐकला तर आपल्यावर काही विशेष परिणाम होणार नाही. इंटरनेटवर एखाद्या अश्लील वेबसाईटमधील चित्रांवर ओझरती नजर टाकल्यास काही दुष्परिणाम होणार नाही असे तुम्हाला वाटत असेल. पण सावधान, प्रेषित पौल म्हणतो की तुम्ही चुकत आहात! तो म्हणतो: “कुसंगतीने नीति बिघडते.” (१५. तरुणांना आणखी कोणत्या बाबतीत निर्णय घ्यावा लागतो आणि या संदर्भात त्यांना कोणत्या दबावांना तोंड द्यावे लागते?
१५ तुम्हाला घ्यावयाच्या निर्णयांसंबंधी आणखी एक उदाहरण पाहू. शालेय शिक्षण संपल्यावर पुढे काय करायचे याविषयी निर्णय घेण्याची आज ना उद्या तुमच्यावर वेळ येईल. जर तुमच्या देशात नोकऱ्या मिळणे कठीण असेल, तर अर्थातच, एखादी चांगली नोकरी मिळताच ती धरण्याचा दबाव तुमच्यावर असेल. जर तुम्ही श्रीमंत देशात राहात असाल, तर तुमच्यापुढे अनेक पर्याय असू शकतील आणि यांपैकी काही अतिशय आकर्षक असतील. तुमचे शिक्षक किंवा आईवडील तुमच्या हिताचा विचार करून आर्थिक सुरक्षा, तितकेच नव्हे, तर कदाचित विपुल संपत्ती मिळवून देणारा व्यवसाय निवडण्याची गळ घालतील. पण अशा व्यवसायाकरता प्रशिक्षण घेताना मात्र यहोवाच्या सेवेकरता तुम्हाला वेळ मिळणे कठीण होईल.
१६, १७. व्यवसायाविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यासाठी एका तरुण व्यक्तीला कोणती वेगवेगळी शास्त्रवचने मदत करू शकतात हे स्पष्ट करा.
१६ निर्णय घेण्याआधी बायबलचा सल्ला घेण्यास विसरू नका. बायबल आपल्याला उदरनिर्वाहाकरता काम करण्याचे प्रोत्साहन देते; आपण स्वावलंबी असावे असे ते आपल्याला सांगते. (२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२) तरीसुद्धा, इतर गोष्टीही यात गोवलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला पुढील वचने वाचून, व्यवसाय निवडण्याच्या बाबतीत तरुणांना योग्य मनोवृत्ती ठेवण्यात ही वचने कशी मदत करतात याविषयी विचार करण्याचे प्रोत्साहन देत आहोत: नीतिसूत्रे ३०:८, ९; उपदेशक ७:११, १२; मत्तय ६:३३; १ करिंथकर ७:३१; १ तीमथ्य ६:९, १०. ही वचने वाचल्यावर तुम्हाला याबाबतीत यहोवाचा दृष्टिकोन काय आहे हे समजले का?
१७ आपल्या पेशाला किंवा नोकरीला आपण कधीही इतके महत्त्व देऊ नये, की ज्यामुळे यहोवाच्या सेवेला दुय्यम स्थान मिळेल. उच्च माध्यमिक शिक्षण (बारावी) घेऊन जर एखादी वाजवी नोकरी मिळणे शक्य असेल तर उत्तम. जर त्यापेक्षा जास्त शिक्षण घेण्याची गरज असेल तर याविषयी तुम्ही आपल्या पालकांशी चर्चा केली पाहिजे. परंतु, जे “श्रेष्ठ” आहे त्याकडे, म्हणजेच आध्यात्मिक गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष होता कामा नये. (फिलिप्पैकर १:९, १०) यिर्मयाचा चिटणीस बारूख याने जी चूक केली ती करू नका. त्याला त्याच्या सेवेच्या विशेषाधिकाराविषयी कदर वाटेनाशी झाली आणि तो “आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा” करू लागला. (यिर्मया ४५:५) जगातली कोणतीही ‘मोठी गोष्ट’ त्याला यहोवाच्या जवळ आणू शकत नाही किंवा जेरूसलेमच्या नाशापासून त्याचा बचाव करू शकत नाही हे निदान काही काळापुरते का होईना, पण तो विसरला होता. आज आपल्याविषयी हेच म्हणता येईल.
आध्यात्मिक गोष्टींविषयी कदर बाळगा
१८, १९. (अ) तुमच्या आसपासचे बहुतेक लोक कशाने पीडित आहेत आणि त्यांच्याप्रती तुमच्या भावना कशा असाव्यात? (ब) आध्यात्मिक दृष्टीने आपण उपाशी आहोत असे बऱ्याच जणांना का वाटत नाही?
१८ दुष्काळग्रस्त परिसरांतील मुलांची चित्रे कधी वृत्तपत्रात किंवा इतर प्रसिद्धी माध्यमांत तुम्ही पाहिली आहेत का? ती पाहून नक्कीच तुमचे अंतःकरण पिळवटले असेल. तुमच्या आसपास राहणाऱ्या लोकांना पाहिल्यावरही तुमचे अंतःकरण असेच पिळवटते का? त्यांची तुम्हाला का कीव यावी? कारण त्यांच्यापैकीही बहुतेकजण दुष्काळग्रस्त आहेत? आमोस संदेष्ट्याने भाकीत केलेल्या दुष्काळाने आमोस ८:११.
ते पीडित आहेत: “प्रभु परमेश्वर म्हणतो, पाहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल.”—१९ या आध्यात्मिक उपासमारीने पीडित असणाऱ्या बहुतेकांना ‘आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव नाही.’ (मत्तय ५:३, NW) आपण आध्यात्मिकरित्या उपाशी आहोत असे त्यांना वाटत नाही. किंबहुना काहींना तर वाटते की आपण अगदी सुस्थितीत आहोत. पण ज्यांना असे वाटते ते खरे तर व्यर्थ ‘जगिक ज्ञान’ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यात भौतिकवाद, वैज्ञानिक तर्क, नैतिकतेविषयी वाद आणि अशाच इतर गोष्टींचा समावेश आहे. काहींना हे आधुनिक “ज्ञान” मिळवल्यावर बायबलच्या शिकवणुकी पुरोगामी वाटू लागतात. पण “[जगाला] आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही.” जगाचे ज्ञान तुम्हाला देवाच्या जवळ येण्यास मदत करणार नाही. हे ज्ञान देवाच्या दृष्टीने निव्वळ “मूर्खपण आहे.”—१ करिंथकर १:२०, २१; ३:१९.
२०. जे लोक यहोवाची उपासना करत नाहीत त्यांचे अनुकरण करण्यास उत्सुक असणे का योग्य नाही?
२० त्या उपाशी, दुष्काळग्रस्त मुलांची चित्रे पाहिल्यावर तुम्हाला त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते का? निश्चितच कोणालाही असे वाटत नाही! पण ख्रिस्ती कुटुंबांतील काही तरुणांनी आपल्या आसपासच्या आध्यात्मिकरित्या दुष्काळग्रस्त लोकांसारखे बनण्याची इच्छा असल्याचे दाखवले आहे. कदाचित या तरुणांना वाटत असेल की जगातील तरुण किती स्वच्छंद, मौजमजेने भरपूर जीवन जगतात. पण ते विसरतात की हे तरुण देवापासून दुरावलेले आहेत. (इफिसकर ४:१७, १८) तसेच आध्यात्मिक उपासमारीचे दुष्परिणाम काय आहेत हेही ते विसरतात. किशोरवयीन गर्भारपण, तसेच अनैतिकता, धूम्रपान, मद्यपान आणि ड्रग्सच्या व्यसनामुळे होणारे निरनिराळे शारीरिक व भावनिक परिणाम यात सामील आहेत. आध्यात्मिक उपासमारीमुळे विद्रोही प्रवृत्ती, जीवनात रिक्तपणाची व दिशाहीनतेची भावना निपजते.
२१. यहोवाची उपासना न करणाऱ्यांच्या प्रवृत्ती आत्मसात करण्यापासून आपण स्वतःचे कशाप्रकारे संरक्षण करू शकतो?
२१ तेव्हा, यहोवाची उपासना न करणाऱ्या मुलामुलींसोबत शाळेत उठताबसताना त्यांच्या वृत्तींचे आपल्यावर नियंत्रण होण्यापासून सांभाळा. (२ करिंथकर ४:१८) काहीजण आध्यात्मिक गोष्टींविषयी तिरस्काराने बोलतील. शिवाय, अनैतिक कृत्ये करण्यात, नशा करण्यात किंवा असभ्य भाषा वापरण्यात काही गैर नाही असे प्रसारमाध्यमातून अगदी बेमालूमपणे सुचवले जात असते. या कुप्रभावाचा प्रतिकार करा. जे लोक ‘विश्वास व चांगला विवेक भाव धरून’ आहेत अशा लोकांसोबत नियमित सहवास राखा. “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” (१ तीमथ्य १:१९; १ करिंथकर १५:५८) राज्य सभागृहातील कार्यांत व क्षेत्र सेवेत स्वतःला व्यस्त ठेवा. शालेय वर्षांत वेळोवेळी सहायक पायनियर सेवा करण्याचा प्रयत्न करा. हे सर्व करण्याद्वारे आपला आध्यात्मिक दृष्टिकोन सदोदित ताजा ठेवा म्हणजे तुम्ही कधीही संतुलन गमावणार नाही.—२ तीमथ्य ४:५.
२२, २३. (अ) ख्रिस्ती तरुणांनी घेतलेले निर्णय सहसा इतरांना योग्य का वाटणार नाहीत? (ब) तरुणांना काय करण्याचे प्रोत्साहन देण्यात येते?
२२ आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगून तुम्ही जे निर्णय घ्याल ते कदाचित इतरांना योग्य वाटणार नाहीत. उदाहरणार्थ, एक ख्रिस्ती तरुण संगीतकलेत प्रवीण आणि शाळेतल्या प्रत्येक विषयात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी होता. शिक्षण संपताच, पूर्ण वेळेचा सुवार्तिक अर्थात पायनियर होण्याचे आपण निवडलेले ध्येय गाठता यावे म्हणून, त्याने खिडक्या स्वच्छ करण्याच्या आपल्या वडिलांच्या व्यवसायात साथ देण्यास सुरवात केली. त्याचे शिक्षक त्याच्या या निर्णयामागची कारणे कधीही समजू शकले नाहीत पण तुम्ही यहोवाच्या जवळ आला असाल तर तुम्ही ती नक्कीच समजू शकाल अशी आम्हाला खात्री आहे.
२३ आपल्या तारुण्याची ही मोलवान ठेव कशी खर्च करायची याचा विचार करत असताना तुम्ही, “खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.” (१ तीमथ्य ६:१९) आपल्या तारुण्यात—आणि सबंध जीवनभर ‘आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याचा’ दृढ निश्चय करा. यशस्वी भवितव्याची उभारणी करण्याचा हाच एक मार्ग आहे; एक असे भवितव्य ज्याचा कधीही अंत होणार नाही.
तुम्ही कोणत्या निष्कर्षावर आलात?
• भविष्याकरता योजना आखताना कोणता देवप्रेरित सल्ला तरुणांना सहायक ठरेल?
• एक तरुण व्यक्ती कोणकोणत्या मार्गांनी ‘देवाजवळ येऊ शकते?’
• एक तरुण व्यक्ती कोणते निर्णय घेते की ज्यांचा तिच्या भविष्यावरही परिणाम होतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्रे]
तुम्ही आपल्या तारुण्यातला सर्व उत्साह व जोम स्वार्थी कार्यांकरता खर्च होऊ देणार का?
[१६, १७ पानांवरील चित्र]
सुज्ञ ख्रिस्ती तरुण आपली आध्यात्मिक दृष्टी धूसर होऊ देत नाहीत