व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दीर्घ व आनंदी जीवनाची गुरूकिल्ली

दीर्घ व आनंदी जीवनाची गुरूकिल्ली

दीर्घ व आनंदी जीवनाची गुरूकिल्ली

काही लोक म्हणतात, की “सर्वांना मोठं व्हायला आवडतं, पण कोणी म्हातारे होऊ इच्छित नाही.” निवृत्त होणारे पुष्कळ लोक अशा काळाची अपेक्षा करतात जेव्हा त्यांच्याजवळ जास्त वेळ असेल आणि कमी जबाबदाऱ्‍या असतील. तरीपण, आपले जीवन उद्देशहीन, निरर्थक होऊ नये अशी त्यांना भीती असते. एकाकीपणा, निराशा, ढासळत जाणारे आरोग्य यांविषयी ते चिंता करू लागतात.

मग, आनंदी जीवनाचे रहस्य काय आहे? चांगले मित्र आणि प्रेमळ कुटुंब, तरुणांना व वृद्धांना आनंदी बनवतात. पण वृद्ध व्यक्‍तीचे जीवन आनंदी बनवण्यासाठी इतर जण जे काही करतात तेच केवळ महत्त्वाचे नाही. तर वृद्ध व्यक्‍ती इतरांसाठी काय करू शकते, हे अधिक महत्त्वाचे आहे.

चारशे तेवीस वृद्ध जोडप्यांच्या एका दीर्घकाळाच्या अभ्यासातून असे दिसून आले, की “इतर लोकांना त्यांच्या जीवनात मदत केल्याने आपले स्वतःचे जीवन वाढण्याची शक्यता असते.” हा अभ्यास चालवणाऱ्‍या स्टेफनी ब्राऊन यांनी असे म्हटले: “या शोधांवरून कळते, की इतरांबरोबर संपर्क ठेवल्यामुळे आपल्याला काय मिळते ही गोष्ट महत्त्वाची नव्हे तर आपण काय योगदान देतो ही गोष्ट महत्त्वाची आहे.” अशाप्रकारच्या देण्यात, घरकामात मदत करणे, मुलांची काळजी घेणे, बाजारहाट करणे, गाडीतून आणणे-सोडवणे किंवा ज्याला बोलावेसे वाटते त्याचे ऐकून घेणे, या गोष्टींचा समावेश होतो.

सुमारे २,००० वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) दीर्घ आणि आनंदी जीवन मिळवणे हे बँकेत मोठी रक्कम असण्यावर किंवा वृद्धापकाळ कमी करणारे औषधोपचार व पथ्य करण्यावर अवलंबून नाही. तर ते, सक्रिय असणे व इतरांचे जीवन सुधारण्याकरता आपला वेळ, आपली शक्‍ती खर्च करणे यांवर अवलंबून आहे.

परंतु, आपला वेळ, शक्‍ती, आवेश खर्च केल्याने वृद्धापकाळ, आजारपण आणि मृत्यू यांपासून आपले संरक्षण होणार नाही. केवळ देवाचे राज्यच या गोष्टी नाहीशा करेल. देवाच्या राज्यशासनात आजारपण नाहीसे होईल, ‘मरणही राहणार नाही.’ (प्रकटीकरण २१:३, ४; यशया ३३:२४) आज्ञाधारक मानव एका परादीस पृथ्वीवर कायमचे आनंदात जगतील. (लूक २३:४३) दीर्घ व आनंदी जीवनाच्या या बायबल आधारित गुरुकिल्लीविषयी अधिक माहिती द्यायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटतो.