व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला प्रसन्‍न करण्यासाठी मानवाची धडपड

देवाला प्रसन्‍न करण्यासाठी मानवाची धडपड

देवाला प्रसन्‍न करण्यासाठी मानवाची धडपड

“देवावर विश्‍वास नसलेला अर्थात तो सर्वकाही सांभाळतो आणि निर्माण करतो असा विश्‍वास नसलेला कोणताही मानव समाज नाही. आपणहून धर्मनिरपेक्ष बनलेल्या समाजांच्या बाबतीतही हे खरे आहे.” हे शब्द जॉन बोकर यांनी गॉड—अ ब्रीफ हिस्टरी या आपल्या पुस्तकात उद्‌गारले. देवाचा शोध आणि त्याची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न हा मानवी वर्तनात कोणत्या न कोणत्या प्रकारे गोवलेलाच आहे. जगभरात, अनेकांना देवाला प्रसन्‍न करण्याची मनापासून इच्छा आहे. अर्थात, ते आपापल्या विश्‍वासांनुसार हे करण्याचा प्रयत्न करतात.

काहींचे म्हणणे आहे की, देवाची मर्जी संपादन करण्यासाठी माणसाने फक्‍त सात्विक असावे, बस्स. इतरांना वाटते की, गरिबांना मदत करून देवाची मर्जी मिळवता येते. शिवाय, पुष्कळ लोक धार्मिक उत्सव आणि विधी यांना महत्त्व देतात.

दुसऱ्‍या बाजूला असेही लोक आहेत ज्यांना वाटते की, देव त्यांना प्राप्त होऊ शकतच नाही—तो मानवांपासून फार दूर आहे किंवा सामान्य लोकांकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. असे म्हणतात की, प्राचीन ग्रीसचा तत्त्ववेत्ता एपिक्यूरस याचा असा विश्‍वास होता की, ‘देव तुमच्यापासून फार दूर आहेत, ते तुमची हानी करू शकत नाहीत आणि भलेही करू शकत नाहीत.’ गंमत म्हणजे, अशा धारणा बाळगणारे बहुतेक लोक धार्मिक असतात. काहीजण तर, आपल्या मृत पूर्वजांना प्रसन्‍न करण्याच्या आशेने अर्पणे वाहतात आणि विशिष्ट विधी पार पाडतात.

तुमचे काय मत आहे? आपण देवाला प्रसन्‍न करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव खरोखर त्याची दखल घेतो का? देवाच्या अंतःकरणाला भिडेल असे काही करणे आणि त्याला प्रसन्‍न करणे खरेच शक्य आहे का?