व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांचे भले करावे की फक्‍त त्यांचे वाईट करण्यापासून दूर राहावे?

इतरांचे भले करावे की फक्‍त त्यांचे वाईट करण्यापासून दूर राहावे?

इतरांचे भले करावे की फक्‍त त्यांचे वाईट करण्यापासून दूर राहावे?

“जेतुम्हाला होऊ नये असे वाटते, ते इतरांना करू नका.” या सुविचाराचे श्रेय सुविख्यात चिनी शिक्षक आणि तत्त्ववेत्ता कन्फ्यूशस यांना दिले जाते. आज, सुमारे २,५०० वर्षांनंतरही पुष्कळ लोक असा विश्‍वास करतात, की एखादी व्यक्‍ती जर कोणाचे वाईट करत नसेल, तर तिची नैतिक जबाबदारी तिने पार पाडली आहे.

या कन्फ्यूशियन तत्त्वात काही चांगलं आहे, हे कबूल करावे लागेल. परंतु बायबल, मानवी वर्तन व व्यवहाराची आणखी एक बाजू प्रकट करते. दुसऱ्‍यांचे वाईट करणे हे पाप आहेच परंतु बायबल असेही म्हणते, की दुसऱ्‍यांचे बरे करण्याचे मुद्दामहून किंवा चुकून टाळणे देखील पाप आहे. ख्रिस्ती शिष्य याकोब याने असे लिहिले: “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे.” (याकोब ४:१७) इतरांचे वाईट करू नका, केवळ अशी ख्रिश्‍चनांना शिकवण देण्याऐवजी, येशू ख्रिस्ताने हा सल्ला दिला: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्तय ७:१२.

देवाचा मूळ उद्देश होता, की सर्व मानवजातीने एकमेकांना, इतरांनी आपल्याला जसे वागवावे अशी त्यांची इच्छा आहे तसे त्यांनीही इतरांशी वागले पाहिजे. देवाने मानवांची ज्याप्रकारे निर्मिती केली आहे त्याद्वारे, इतरांच्या कल्याणाची काळजी घेण्यात त्याने उत्तम उदाहरण मांडले: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्पत्ति १:२७) याचा अर्थ, देवाने प्रेमळपणे मानवांना एक विवेक दिला जो, योग्यप्रकारे प्रशिक्षित केल्यावर इतरांनी जसे आपल्याशी वागावे म्हणून आपली इच्छा आहे तसेच आपल्याला त्यांच्याशी वागण्यास मार्गदर्शित करेल.

आज, पुष्कळ लोकांना अविचारी व स्वार्थी लोकांच्या हातून इतकी गैरवागणूक दिली जाते, की आपल्याला कसलीच आशा नाही, आपण असाहाय्य आहोत असे वाटू लागते. तेव्हा, जे वाईट आहे ते न करणे पुरेसे नाही तर जे चांगले व फायदेकारक आहे ते करणे आवश्‍यक आहे. म्हणूनच, यहोवाचे साक्षीदार, देवाच्या वचनातील अद्‌भुत आशेविषयी शिकून घेण्यास लोकांना मदत करण्याकरता सकारात्मक कार्य करतात. ते प्रेमापोटी आपल्या शेजाऱ्‍यांना बायबलमधील सुवार्ता सांगतात; इतरांनी आपल्याला ज्याप्रकारे वागवले पाहिजे त्याप्रकारे आधी आपण त्यांच्याशी वागले पाहिजे, अशी त्यांची इच्छा असते.