व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही धार्मिक संघटनेचे सदस्य असणे आवश्‍यक आहे का?

तुम्ही धार्मिक संघटनेचे सदस्य असणे आवश्‍यक आहे का?

तुम्ही धार्मिक संघटनेचे सदस्य असणे आवश्‍यक आहे का?

‘देवावर माझा विश्‍वास आहे म्हणून मला चर्चचा सदस्य असण्याची किंवा नियमितपणे चर्चला जाण्याची गरज नाही!’ चर्चचा किंवा कोणत्याही धार्मिक संघटनेचा सदस्य असण्याविषयी पुष्कळांना असेच वाटते. काही तर असेही म्हणतात की, ते चर्चमधील धार्मिक सेवेला उपस्थित राहण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात निसर्गाचा आनंद लुटतात तेव्हा त्यांना देवाजवळ असल्यासारखे अधिक वाटते. आज, सर्वसामान्य लोकांना असे वाटते की, देवावर विश्‍वास बाळगण्यासाठी कोणत्याही धार्मिक गटाचा किंवा संघटनेचा भाग असण्याची गरज नाही.

परंतु, काही जणांना प्रामाणिकपणे याउलट वाटते. त्यांच्या मते, देवाची संमती कोणाला हवी असल्यास त्याने चर्चचा सदस्य असणे व तेथे उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. म्हणजे धार्मिक संघटनेशी संबंध हा केवळ आकडेवारीच्या किंवा शिक्षणाच्या दृष्टीने रुची बाळगणाऱ्‍यांकरता महत्त्वाचा नाही. काहीही असले तरी हा देवासोबतच्या नातेसंबंधाचा प्रश्‍न असल्याने देवाला याविषयी काय वाटते हे पाहणे तर्कशुद्ध नाही का? मग, त्याच्या वचनातून अर्थात बायबलमधून या विषयाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते?

गतकाळात देवाचा लोकांशी व्यवहार

सुमारे ४,४०० वर्षांआधी, संपूर्ण पृथ्वीवर प्रलयाच्या रूपात एक महासंकट आले होते. अशी घटना सहसा विसरली जात नाही; जगभरामध्ये लोकांच्या प्राचीन इतिहासात या घटनेविषयीच्या कथा आहेत. या कथांमधील तपशील वेगळे असले तरी त्यांच्यात बरीच साम्यता आढळते. या प्रलयात मोजके मानव आणि प्राणी बचावले ही अशीच एक समान गोष्ट आहे.

जलप्रलयातून वाचलेले लोक योगायोगाने या नाशातून बचावले का? नाही, हे बायबलमधील अहवालात दाखवले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देवाने प्रत्येक व्यक्‍तीला या येणाऱ्‍या प्रलयाविषयी सांगितले नाही. तर, त्याने नोहाला ही गोष्ट सांगितली आणि नोहाने येणाऱ्‍या या जलप्रलयाविषयी त्याच्या समकालीन लोकांना इशारा दिला.—उत्पत्ति ६:१३-१६; २ पेत्र २:५.

या लहानशा गटाचा भाग असण्यावर आणि देवाने नोहाला दिलेले मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी दाखवण्यावर बचाव निर्भर होता. तारवातले प्राणी देखील या गटासोबत होते म्हणूनच ते प्रलयातून वाचू शकले. प्राण्यांचे रक्षण करण्याकरता योग्य व्यवस्था करण्यासाठी नोहाला निश्‍चित सूचना देण्यात आल्या होत्या.—उत्पत्ति ६:१७-७:८.

अनेक शतकांनंतर, नोहाचा पुत्र शेम याचे वंशज ईजिप्तमध्ये बंदिवासात आले. तरीपण, त्यांना मुक्‍त करून त्यांचा पूर्वज अब्राहाम याला वचन दिलेल्या देशात त्यांना आणावे हा देवाचा उद्देश होता. पुन्हा एकदा, ही गोष्ट प्रत्येक व्यक्‍तीला नव्हे तर त्या लोकांचे नेतृत्व करणाऱ्‍यांना अर्थात मोशे आणि त्याचा भाऊ अहरोन यांना सांगण्यात आली. (निर्गम ३:७-१०; ४:२७-३१) गुलामीत असलेल्या या लोकांना ईजिप्तमधून वाचवण्यात आल्यावर सिनाय पर्वतापाशी त्यांना देवाचे नियमशास्त्र देण्यात आले व त्यांचे इस्राएल राष्ट्र तयार करण्यात आले.—निर्गम १९:१-६.

देवाने स्थापन केलेल्या गटासोबत राहिल्याने आणि या गटाचे नेतृत्व करणाऱ्‍या नियुक्‍त पुरुषांच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यानेच केवळ वैयक्‍तिक इस्राएलीयांचा बचाव होणे शक्य होते. काही ईजिप्शियन व्यक्‍तींनाही या गटामध्ये सामील होण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि याला अर्थातच देवाची संमती होती. इस्राएली लोक ईजिप्त सोडून गेले तेव्हा हे लोक देखील त्यांच्यासोबत गेले आणि अशाप्रकारे देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यास त्यांनी स्वतःला लायक बनवले.—निर्गम १२:३७, ३८.

मग, पहिल्या शतकात, येशूने आपल्या प्रचाराचे कार्य अर्थात लोकांना आपले शिष्य बनवून गोळा करण्याचे काम सुरू केले. त्याने लोकांच्या गरजेनुसार काही व्यक्‍तींबद्दल काळजी दाखवली असली तरी मुख्यतः त्याने त्यांच्याशी गटाच्या रूपात व्यवहार केला. ११ विश्‍वासू प्रेषितांना येशू म्हणाला: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो.” (लूक २२:२८, २९) नंतर, हे शिष्य एकत्र जमलेले असताना देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला.—प्रेषितांची कृत्ये २:१-४.

या उदाहरणांवरून स्पष्टपणे हे दिसते की, गतकाळात देवाने नेहमी आपल्या लोकांसोबत संघटित समूहाच्या रूपात व्यवहार केला आहे. नोहा, मोशे, येशू आणि इतर मोजक्याच व्यक्‍तींसोबत देवाने व्यक्‍तिगतपणे व्यवहार केले पण देवाने त्यांचा उपयोग संघटित समूहाला आपले विचार कळवण्यासाठी केला. त्यामुळे आज देव वेगळ्या पद्धतीने त्याच्या सेवकांशी व्यवहार करतो असा विचार करण्यास काहीच कारण नाही. अर्थात, यामुळे आणखी एक प्रश्‍न उद्‌भवतो: मग कोणत्याही धार्मिक गटात सामील झाले तर चालेल का? या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

[४ पानांवरील चित्र]

देवाने आपल्या लोकांसोबत फार आधीपासून संघटित समूहाच्या रूपात व्यवहार केला आहे