व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘येऊन आम्हाला साहाय्य करा’

‘येऊन आम्हाला साहाय्य करा’

राज्य घोषकांचा वृत्तान्त

‘येऊन आम्हाला साहाय्य करा’

जुलै २००० मध्ये, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वीत्झर्लंड येथील जर्मन भाषिक साक्षीदारांना बोलिव्हियामध्ये स्थलांतर करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. का? कारण बोलिव्हियातील सान्ता क्रूझच्या ३०० किलोमीटर व्यासाच्या क्षेत्रात दूरवर वसलेल्या शेतकरी वसाहतींमधील जर्मन बोलणारे मेननाईट्‌स बायबलबद्दल खूप आस्था दाखवत होते.

या आमंत्रणाला सुमारे १४० साक्षीदारांचा प्रतिसाद मिळाला. काहीजण काही आठवड्यांसाठी तर इतरजण एका वर्षासाठी किंवा त्याहून अधिक काळासाठी गेले. त्यांनी पहिल्या शतकातील मिशनऱ्‍यांसारखीच मनोवृत्ती दाखवली ज्यांनी पुढील आमंत्रणाला प्रतिसाद दिला होता: ‘मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य करा.’—प्रेषितांची कृत्ये १६:९, १०.

त्या क्षेत्रातले कार्य कसे होते? स्थानीय मंडळीतील एक वडील सांगतात: “मेननाईट लोकांच्या ४३ वसाहतींपैकी एका वसाहतीपर्यंत जाण्याकरता मोटार गाडीने जायचे म्हटले तर कच्च्या रस्त्यावरून जायला आठ तास लागू शकतात. अधिक दूरवरच्या ठिकाणी जायला चार दिवस लागतात आणि त्यासाठी रात्री तंबू ठोकून मुक्काम करावा लागतो. पण हे प्रयत्न निष्फळ ठरले नाहीत कारण बहुतेकांनी याआधी सुवार्ता कधीच ऐकलेली नव्हती.”

सुरवातीला पुष्कळशा मेननाईट लोकांनी फारसा आवेश दाखवला नाही. पण त्यांच्याकडे वारंवार गेल्यामुळे साक्षीदारांकडे असलेल्या संदेशाचे मोल त्यांना समजू लागले आहे. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्‍याने आपण एक वर्षापासून सावध राहा! मासिक वाचत असल्याचे सांगितले. पुढे त्याने म्हटले: “पुष्कळ लोक तुमचे ऐकत नाहीत हे मला ठाऊक आहे पण हेच सत्य आहे असे मला वाटते.” दुसऱ्‍या एका वसाहतीत एक मनुष्य म्हणाला: “माझे काही शेजारी म्हणतात की, तुम्ही खोटे संदेष्टे आहात, दुसरे जण म्हणतात की, तुमच्याकडे सत्य आहे. मला स्वतःला परीक्षण करून खरे काय आहे ते पाहायचे आहे.”

आता बोलिव्हियामध्ये एक जर्मन मंडळी आहे व त्यात ३५ प्रचारक आणि १४ पूर्ण वेळेचे सुवार्तिक आहेत. आतापर्यंत, १४ मेननाईट लोक राज्याचे उद्‌घोषक बनले आहेत आणि आणखी ९ जण सभांना नियमितपणे येतात. अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्या एका प्रौढ गृहस्थाने म्हटले: “आम्हाला यहोवाचे मार्गदर्शन असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्याने आमची मदत करण्यासाठी जर्मन बोलणाऱ्‍या अनुभवी बंधू-बहिणींना आमच्याकडे पाठवले आहे. आम्ही त्याचे खूप आभारी आहोत.” या गृहस्थाला १७ वर्षांची एक मुलगी आहे आणि तिचा देखील बाप्तिस्मा झालेला आहे. ती म्हणाली: “येथे आलेल्या तरुण बंधू-बहिणींचा आवेश पाहून इतरांनाही शांत बसवत नाही. बहुतेक जण पायनियर आहेत आणि ते आपला वेळ आणि पैसा इतरांना मदत करण्यात घालवतात. मलाही त्यांच्यासारखेच व्हावेसे वाटते.”

होय, जे साहाय्य करण्यासाठी ‘आले’ त्यांना पुष्कळ आनंद आणि समाधान लाभत आहे.