व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज मुलांना शिस्त लावण्याचे आव्हान

आज मुलांना शिस्त लावण्याचे आव्हान

आज मुलांना शिस्त लावण्याचे आव्हान

रात्र झाल्यावर एक रेस्टॉरंट मालक आपले दुकान बंद करून घरी जायची तयार करत होता. तेवढ्यात दोन स्त्रिया एका लहान मुलाला घेऊन येतात आणि जेवणाची ऑर्डर देतात. मालक फार थकलेला असल्यामुळे रेस्टॉरंट बंद झाले आहे असे त्याला त्यांना सांगावेसे वाटते पण तो त्यांना जेवण द्यायचे ठरवतो. दोन्ही स्त्रिया आरामात गप्पा मारत जेवत असतात आणि ते लहान मूल बिस्किटांचे तुकडे सगळ्या रेस्टॉरंटमध्ये पाडत, त्यांना तुडवत इकडे-तिकडे पळत असते. मुलाला शांत बसवण्याऐवजी त्याची आई त्याला पाहून हसत असते. जेवण आटपून या स्त्रिया आणि ते मूल गेल्यावर थकलेल्या मालकाला सगळी घाण स्वच्छ करावी लागते.

ही वास्तविक घटना दाखवते त्याप्रमाणे अनेक कुटुंबांमध्ये मुलांना शिस्त लावली जात नाही हे तुम्हाला माहीतच असेल. याची अनेक कारणे आहेत. मुलांना स्वातंत्र्य दिले जावे असा विचार करून काही पालक आपल्या मुलांना मोकळीक देतात. किंवा ते आपल्या कामात इतके व्यापलेले असतात की, मुलांकडे लक्ष देण्यासाठी व त्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसतो. काही पालकांना वाटते की, मुलाच्या शाळेतले शिक्षण हेच सर्वात महत्त्वाचे आहे म्हणून मुलाला चांगले मार्क मिळाले व एखाद्या चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला की, त्याला वाटेल ते करण्याची मोकळीक दिली जाते.

तरीपण, काहींचे म्हणणे आहे की, सर्व पालकांची व संपूर्ण समाजाची मूल्ये बदलण्याची गरज आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मुले हरतऱ्‍हेच्या गुन्ह्यांत सामील होत आहेत आणि शाळेमधील हिंसात्मक प्रकार तर दररोज वाढतच आहेत. कोरिया प्रजासत्ताकाच्या सिओल येथील एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटले की, व्यक्‍तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. म्हणून ते म्हणाले: “उत्तम व्यक्‍तिमत्त्व निर्माण केल्यावरच ज्ञानाची भर घालता येते.”

आपल्या मुलाने चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवावा आणि जीवनात यशस्वी व्हावे असा विचार करणारे अनेक पालक इशाऱ्‍याकडे कानाडोळा करतात. तुम्ही पालक असल्यास, तुमच्या मुलाने मोठे होऊन कशाप्रकारची व्यक्‍ती बनावे असे तुम्हाला वाटते? नैतिकतेची व जबाबदारीची जाणीव असलेली प्रौढ व्यक्‍ती? इतरांबद्दल विचारशील असलेली, परिस्थितीशी जुळवून घेणारी आणि सकारात्मक विचार करणारी व्यक्‍ती? तर मग, पुढील लेख वाचा.