व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या प्रार्थनांमुळे काही फरक पडू शकतो का?

तुमच्या प्रार्थनांमुळे काही फरक पडू शकतो का?

तुमच्या प्रार्थनांमुळे काही फरक पडू शकतो का?

जीवनात अनेक वेळा आपल्याला असहाय वाटते. आपल्यापैकी कोण असा आहे ज्याला अशा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागलेला नाही? बायबल दाखवते की, अशा पेचप्रसंगी प्रार्थनेमुळे फरक पडू शकतो हे प्रेषित पौलाला ठाऊक होते.

पौलाला रोममध्ये अन्यायीपणे तुरुंगात डांबण्यात आले तेव्हा त्याने आपल्या सह उपासकांना त्यासाठी प्रार्थना करण्यास विनंती करून म्हटले: “तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.” (इब्री लोकांस १३:१८, १९) आणखी एका प्रसंगी, पौलाने स्वतःची लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना केली होती आणि देव त्याच्या प्रार्थनांचे उत्तर देईल अशी खात्री त्याने व्यक्‍त केली होती. (फिलेमोन २२) त्यानंतर पौलाची लगेच सुटका झाली आणि त्याने पुन्हा मिशनरी कार्य सुरू केले.

परंतु, प्रार्थनेचा तुमच्या समस्यांच्या परिणामांवर खरोखर काही फरक पडू शकतो का? कदाचित. परंतु हे लक्षात ठेवा की, प्रार्थना केवळ एक औपचारिक धार्मिक प्रथा नाही. तर स्वर्गातील आपल्या प्रेमळ आणि शक्‍तिशाली पित्यासोबतचा तो संवाद आहे. आपण मनमोकळेपणाने आपल्या प्रार्थनांमध्ये जे काही आहे ते स्पष्टपणे व्यक्‍त करावे आणि मग यहोवाचे उत्तर मिळण्याकरता थांबून राहावे.

देव प्रत्येक वेळी आपल्या प्रार्थनेचे थेट उत्तर देणार नाही, किंवा आपल्याला हवे तसे अथवा हवे त्या वेळी देखील आपल्याला उत्तर मिळणार नाही. उदाहरणार्थ, पौलाने वारंवार ‘शरीरातल्या एका काट्याविषयी’ प्रार्थना केली. पौलाची जी काही समस्या होती ती देवाने दूर केली नाही पण त्याने पौलाला पुढील शब्दांनी सांत्वन दिले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.”—२ करिंथकर १२:७-९.

आपण देखील अशी खात्री बाळगू शकतो की, देवाने एखादी विशिष्ट समस्या दूर केली नाही तरी परीक्षेतून ‘निभावण्याचा उपाय तो करील.’ (१ करिंथकर १०:१३) लवकरच एके दिवशी, देव मानवजातीचे सर्व दुःख नाहीसे करील. दरम्यान, ‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ विनंती केल्याने फरक पडू शकतो.—स्तोत्र ६५:२.