‘जा आणि शिष्य करा’
‘जा आणि शिष्य करा’
“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.”—मत्तय २८:१८, १९.
१, २. (अ) येशूने आपल्या शिष्यांना कोणती नेमणूक दिली? (ब) येशूने दिलेल्या आज्ञांविषयी कोणते प्रश्न विचारात घेतले जातील?
वर्ष होते सा.यु. ३३. इस्राएलमध्ये वसंतऋतू होता आणि येशूचे शिष्य गालीलमधील एका डोंगरावर जमा झाले होते. त्यांचा पुनरुत्थित प्रभू थोड्याच वेळात वरती स्वर्गात जाणार होता पण त्याआधी त्याला त्यांच्याशी काहीतरी महत्त्वपूर्ण बोलायचे होते. येशूला त्यांना एक नेमणूक द्यायची होती. कोणती नेमणूक? त्याच्या शिष्यांची काय प्रतिक्रिया होती? आणि आज आपल्याकरता या नेमणुकीचे काय महत्त्व आहे?
२ येशू तेव्हा जे बोलला ते मत्तय २८:१८-२० मध्ये नमूद आहे: “स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” येशूने “सर्व अधिकार,” ‘सर्व राष्ट्र,” “जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व” आणि “सर्व दिवस” यांचा उल्लेख केला. या चार सर्व-समावेशक अभिव्यक्तींशी संबंधित असलेल्या त्याच्या आज्ञांमुळे काही महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सारांशात मांडायचे झाल्यास, का? कोठे?, काय? आणि केव्हा? असे मांडता येतील. या प्रश्नांचा आपण एक-एक करून विचार करू या. *
“सर्व अधिकार मला दिलेला आहे”
३. शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे आपण पालन का केले पाहिजे?
३ सर्वप्रथम, शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे पालन आपण का केले पाहिजे? येशूने म्हटले: “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन . . . शिष्य करा.” या आज्ञेचे पालन का केले पाहिजे याचे मुख्य कारण “तेव्हा” या शब्दावरून दिसून येते. याचे कारण असे की, ज्याने ही आज्ञा दिली त्या येशूला “सर्व अधिकार” आहे. पण येशूचा अधिकार किती व्यापक आहे?
४. (अ) येशूजवळ केवढा अधिकार आहे? (ब) येशूचा अधिकार समजून घेतल्यावर शिष्य बनवण्याच्या आज्ञेबद्दल आपला दृष्टिकोन कसा असावा?
४ येशूला त्याच्या मंडळीवर अधिकार आहे आणि १९१४ पासून त्याला देवाच्या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचाही अधिकार प्राप्त झाला आहे. (कलस्सैकर १:१३; प्रकटीकरण ११:१५) तो आद्यदेवदूत आहे आणि म्हणून त्याला कोट्यवधी देवदूतांच्या स्वर्गातील सैन्यावर अधिकार आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१६; १ पेत्र ३:२२; प्रकटीकरण १९:१४-१६) त्याला आपल्या पित्याकडून धार्मिक तत्त्वांचा विरोध करणारे “सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यहि” नाहीसे करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. (१ करिंथकर १५:२४-२६; इफिसकर १:२०-२३) येशूचा अधिकार केवळ जिवंत असलेल्यांवरच नाही. तर तो “जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्यायाधीश” आहे आणि मेलेल्यांना पुनरुत्थित करण्याचा देवाने दिलेला अधिकार देखील त्याच्याजवळ आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:४२; योहान ५:२६-२८) तर मग, इतका अधिकार ज्याच्याजवळ आहे तर त्याने दिलेली आज्ञा सर्वात महत्त्वाची समजली जावी यात शंका नाही. यास्तव, ‘जा आणि शिष्य करा’ या ख्रिस्ताच्या आज्ञेचा आपण मान राखतो आणि तिचे स्वेच्छेने पालन करतो.
५. (अ) पेत्राने येशूच्या शब्दांचे पालन कसे केले? (ब) पेत्राने येशूच्या सांगण्याप्रमाणे केल्याने काय आशीर्वाद प्राप्त झाला?
५ आपल्या पार्थिव सेवाकार्याच्या सुरवातीला, येशूने आपल्या शिष्यांना एका उल्लेखनीय मार्गाने शिकवले की, त्याचा अधिकार मान्य करून त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील. एकदा त्याने, मच्छीमार असलेल्या पेत्राला म्हटले: “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” त्या ठिकाणी मासे नाहीत हे पेत्राला पक्के माहीत होते म्हणून तो येशूला म्हणाला: गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही.” तरीपण पेत्र नम्रपणे पुढे म्हणाला: “तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” पेत्राने ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे जाळी सोडल्यावर “माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला.” हे पाहून पेत्र इतका भारावून गेला की तो “येशूच्या पाया पडून म्हणाला, ‘प्रभुजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.’” पण येशूने उत्तर दिले: “भिऊ नको; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” (लूक ५:१-१०; मत्तय ४:१८) या अहवालातून आपण काय शिकू शकतो?
६. (अ) चमत्काराने मासे पकडण्याच्या अहवालावरून येशूला आपल्याकडून कशाप्रकारची आज्ञाधारकता अपेक्षित असल्याचे दिसून येते? (ब) आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो?
६ येशूने, चमत्काराने मासे पकडण्याच्या या घटनेआधी नव्हे तर त्या नंतरच पेत्र, अंद्रिया आणि इतर प्रेषितांना “माणसे धरणारे” होण्याची नेमणूक दिली. (मार्क १:१६, १७) स्पष्टतः, लोकांनी आंधळेपणाने आज्ञा पाळावी अशी येशूची अपेक्षा नव्हती. तर त्याने त्या लोकांना आज्ञा पाळण्यासाठी ठोस कारण दिले. जाळे टाकण्याची आज्ञा पाळल्यावर त्यांना ज्याप्रमाणे भरघोस आशीर्वाद प्राप्त झाला त्याचप्रमाणे ‘माणसे धरण्याची’ येशूची आज्ञा पाळल्यावरही महान आशीर्वाद प्राप्त होणार होते. प्रेषितांनी मग पूर्ण भरवसा ठेवून सांगितल्याप्रमाणे केले. तो अहवाल शेवटी म्हणतो: “मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.” (लूक ५:११) आज, शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घेण्यास आपण इतरांना उत्तेजन देतो तेव्हा आपण येशूचे अनुकरण करत असतो. लोकांनी केवळ आपल्या सांगण्याप्रमाणे करावे अशी आपण अपेक्षा करत नाही तर ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यास आपण त्यांना ठोस कारणे देतो.
ठोस कारणे आणि योग्य हेतू
७, ८. (अ) राज्याचा प्रचार आणि शिष्य बनवण्याचे कार्य करण्यासाठी काही शास्त्रवचनीय कारणे कोणती आहेत? (ब) कोणते शास्त्रवचन तुम्हाला विशेषतः प्रचार कार्यात टिकून राहण्याची प्रेरणा देते? (तळटीप पाहा.)
७ आपण ख्रिस्ताचा अधिकार ओळखत असल्यामुळे राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आपला भाग आहे. चांगले कार्य करण्यास आपण ज्यांना उत्तेजन देऊ इच्छितो त्यांना या कार्याविषयी आणखी कोणती शास्त्रवचनीय कारणे देता येऊ शकतात? विविध देशांतील अनेक विश्वासू साक्षीदारांची पुढील निरीक्षणे पाहा आणि त्यासोबत दिलेली शास्त्रवचने त्यांच्या निरीक्षणाला कसा आधार देतात त्याकडे लक्ष द्या.
८ रॉयचा, १९५१ साली बाप्तिस्मा झाला: “मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं तेव्हा त्याची सदासर्वदा सेवा करायचं वचन दिलं. हे वचन मला पाळायचं आहे.” (स्तोत्र ५०:१४; मत्तय ५:३७) हेदरचा, १९६२ साली बाप्तिस्मा झाला: “यहोवानं माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर त्याची विश्वासूपणे सेवा करून मला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे.” (स्तोत्र ९:१, ९-११; कलस्सैकर ३:१५) हॉनलोरचा, १९५४ साली बाप्तिस्मा झाला: “आपण सेवाकार्याला जातो तेव्हा दरवेळी आपल्याला देवदूतांचे साहाय्य मिळते—किती मोठा बहुमान!” (प्रेषितांची कृत्ये १०:३०-३३; प्रकटीकरण १४:६, ७) ऑनरचा, १९६९ साली बाप्तिस्मा झाला: “यहोवाच्या न्यायाची वेळ येईल तेव्हा, माझ्या शेजारपाजारातील कोणीही यहोवावर आणि त्याच्या साक्षीदारांवर बेपर्वा असल्याचा आरोप करून ‘मला इशारा मिळालाच नाही!’ असे म्हणू नये असे मला वाटते.” (यहेज्केल २:५; ३:१७-१९; रोमकर १०:१६, १८) क्लॉडियोचा, १९७४ साली बाप्तिस्मा झाला: “जरा कल्पना करा! प्रचार करताना आपण ‘देवासमक्ष’ आणि ‘ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे’ असतो. म्हणजेच, सेवाकार्यात असताना आपल्याला आपल्या सर्वात जिगरी मित्रांचा सहवास लाभतो.”—२ करिंथकर २:१७. *
९. (अ) पेत्र आणि इतर प्रेषितांच्या मासे धरण्याच्या अहवालावरून ख्रिस्ताला अधीनता दाखवण्यामागे योग्य हेतू असण्याविषयी काय प्रकट झाले? (ब) आज देवाला आणि ख्रिस्ताला अधीनता दाखवण्यामागे कोणता योग्य हेतू आहे आणि का?
९ मोठ्या प्रमाणात मासे पकडल्याच्या या अहवालावरून ख्रिस्ताच्या अधीन राहण्यामागे योग्य हेतू असणे—प्रेम—किती महत्त्वाचे आहे हे देखील दाखवले आहे. “माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे” असे पेत्राने म्हटले तेव्हा येशू त्याला सोडून गेला नाही व त्याने पेत्राला कोणत्याही पापासाठी दोषी देखील ठरवले नाही. (लूक ५:८) पेत्राने येशूला जा अशी विनंती केली तरी येशूने त्याची टीका केली नाही. उलट, येशूने प्रेमळपणे असे उत्तर दिले: “भिऊ नको.” भिऊन ख्रिस्ताला अधीनता दाखवणे हा उचित हेतू ठरला नसता. उलट, येशूने पेत्राला सांगितले की, तो व त्याचे साथीदार माणसे धरणारे होऊ शकतील. आज आपणही लोकांच्या मनात अयोग्य प्रकारची भीती निर्माण करून किंवा दोष अथवा लज्जेसारखी नकारात्मक भावना निर्माण करून त्यांना ख्रिस्ताच्या अधीन होण्यास जबरदस्ती करत नाही. देवाबद्दल आणि ख्रिस्ताबद्दल प्रेम असल्याने पूर्ण मनाने दाखवलेल्या अधीनतेनेच यहोवाचे मन आनंदित होते.—मत्तय २२:३७.
“सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
१०. (अ) शिष्य बनवण्याच्या येशूच्या आज्ञेचा कोणता भाग त्याच्या शिष्यांकरता आव्हानात्मक असणार होता? (ब) शिष्यांनी येशूच्या आज्ञेला कसा प्रतिसाद दिला?
१० ख्रिस्ताच्या आज्ञेशी संबंधित दुसरा प्रश्न असा आहे की, शिष्य बनवण्याचे हे कार्य कोठे केले जावे? येशूने १ राजे ८:४१-४३) स्वतः येशूने प्रामुख्याने नैसर्गिक यहुद्यांना प्रचार केला, पण आता त्याने आपल्या अनुयायांना राष्ट्रांतील लोकांकडे जाण्यास सांगितले. आधी, मासे धरण्याचे क्षेत्र किंवा प्रचाराचे क्षेत्र एका लहानशा तलावापर्यंत—नैसर्गिक यहुद्यांपर्यंतच—सीमित होते पण लवकरच त्यात मानवजातीचा संपूर्ण “सागर” सामील होणार होता. हा बदल शिष्यांकरता एक आव्हान ठरणार होते तरीसुद्धा त्यांनी येशूच्या सूचनेचे पालन करण्याची तयारी दाखवली. येशूच्या मृत्यूनंतर ३० वर्षांच्या आतच, प्रेषित पौल असे लिहू शकला की, सुवार्तेचा प्रचार केवळ यहुद्यांनाच नव्हे तर “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” झाला होता.—कलस्सैकर १:२३.
आपल्या अनुयायांना म्हटले: “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” येशूचे सेवाकार्य सुरू होण्याच्या काळाआधी, इस्राएलमध्ये कोणी परराष्ट्रीय यहोवाची सेवा करायला आले तर त्यांचे स्वागत केले जाई. (११. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून ‘मासे धरण्याच्या क्षेत्राचा’ कसा विस्तार झाला आहे?
११ अलीकडील काळांत, प्रचाराच्या क्षेत्राची तुलनात्मक वाढ दिसून आली आहे. २० व्या शतकाच्या सुरवातीला, ‘मासे धरण्याचे क्षेत्र’ काही देशांपुरतेच सीमित होते. तरीही, ख्रिस्ताच्या त्या वेळेच्या अनुयायांनी पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या उदाहरणाचे अनुकरण केले आणि त्यांच्या प्रचाराचे क्षेत्र उत्सुकतेने विस्तारले. (रोमकर १५:२०) १९३० च्या दशकाच्या सुरवातीला, ते सुमारे शंभर देशांमध्ये शिष्य बनवत होते. आज, आपले ‘मासे धरण्याचे क्षेत्र’ २३५ देशांमध्ये विस्तारलेले आहे.—मार्क १३:१०.
“सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी”
१२. जखऱ्या ८:२३ मधील भविष्यवाणीत कोणते एक आव्हान ठळक दिसते?
१२ सर्व राष्ट्रांमध्ये शिष्य बनवणे हे भौगोलिकरित्याही कठीण आहे आणि भाषेच्या दृष्टीनेही कठीणच आहे. जखऱ्या संदेष्ट्याद्वारे यहोवाने असे भाकीत केले: “त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (तिरपे वळण आमचे.) (जखऱ्या ८:२३) या भविष्यवाणीच्या मोठ्या पूर्णतेत, ‘यहूदी माणूस’ अभिषिक्त ख्रिश्चनांच्या शेष जणांना चित्रित करतो तर “दहा जण” ‘मोठ्या लोकसमुदायाला’ चित्रित करतात. * (प्रकटीकरण ७:९, १०; गलतीकर ६:१६) ख्रिस्ताच्या शिष्यांचा हा मोठा लोकसमुदाय अनेक राष्ट्रांमध्ये आढळणार होता आणि जखऱ्याने म्हटल्याप्रमाणे त्यातील लोक अनेक भाषा बोलणार होते. देवाच्या लोकांच्या आधुनिक काळातील इतिहासात शिष्य बनवण्यातील या पैलूचा समावेश असल्याचे दिसते का? हो, नक्कीच दिसते.
१३. (अ) देवाच्या आधुनिक काळातील लोकांमध्ये भाषेसंबंधी कोणती प्रगती झाली आहे? (ब) विश्वासू दास वर्गाने विविध भाषांमध्ये आध्यात्मिक अन्नाच्या वाढत्या गरजेला कसा प्रतिसाद दिला आहे? (“अंधांकरता प्रकाशने” या पेटीचा समावेश करा.)
१३ सन १९५० मध्ये, जगभरातील प्रत्येक ५ यहोवाच्या साक्षीदारांमधील ३ जणांची मातृभाषा इंग्रजी होती. १९८० पर्यंत हे प्रमाण ५ जणांमधील २ जण असे झाले आणि आज मत्तय २४:४५) उदाहरणार्थ, १९५० मध्ये, आपले साहित्य ९० भाषांमध्ये प्रकाशित होत होते, पण आज ती संख्या चारशेच्या घरात गेली आहे. विविध भाषेच्या समूहांतील लोकांकडे अशाप्रकारे अधिक लक्ष दिल्याने काही परिणाम मिळाले आहेत का? होय! वर्षाच्या प्रत्येक आठवडी “सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी” सरासरी ५,००० लोक ख्रिस्ताचे शिष्य बनतात! (प्रकटीकरण ७:९) आणि वाढ सातत्याने होतच आहे. काही देशांमध्ये तर “जाळ्यात” मोठा घोळका सापडतो!—लूक ५:६; योहान २१:६.
तर प्रत्येक ५ साक्षीदारांमधील केवळ एकाच साक्षीदाराची मातृभाषा इंग्रजी आहे. भाषेतील या बदलाप्रती विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाने कसा प्रतिसाद दिला? अधिकाधिक भाषांमध्ये आध्यात्मिक अन्न पुरवून. (प्रतिफळ देणारी सेवा—तुम्ही सामील होऊ शकता का?
१४. आपल्या क्षेत्रातील परदेशी भाषा बोलणाऱ्या लोकांना आपण कशी मदत करू शकतो? (“मुकबधिरांची भाषा आणि शिष्य बनवणे” या पेटीचा समावेश करा.)
१४ अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये परदेशी लोकांच्या स्थलांतरामुळे, ‘निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्यांना’ शिष्य बनवण्याच्या आव्हानाला स्वतःच्याच देशात तोंड द्यावे लागते. (प्रकटीकरण १४:६) आपल्या क्षेत्रातील वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांना आपण कशी मदत करू शकतो? (१ तीमथ्य २:४) आपण ‘मच्छीमारीच्या योग्य साधनाचा’ उपयोग करू शकतो. अशा लोकांना त्यांच्या भाषेतील साहित्य द्या. शक्य असल्यास, त्यांची भाषा बोलणाऱ्या साक्षीदाराने त्यांना भेट द्यावी म्हणून व्यवस्था करा. (प्रेषितांची कृत्ये २२:२) अशी व्यवस्था करणे आता सोपे झाले आहे कारण परदेशींना ख्रिस्ताचे शिष्य बनवण्यासाठी अनेक साक्षीदारांनी नवीन भाषा शिकली आहे. अहवालांवरून दिसून येते की, अशाप्रकारे मदत करणे एक समाधानकारक अनुभव आहे.
१५, १६. (अ) परदेशी भाषा बोलणाऱ्यांना मदत करणे प्रतिफळदायी आहे हे कोणत्या उदाहरणांवरून स्पष्ट होते? (ब) परदेशी भाषेतील क्षेत्रात सेवा करण्याविषयी आपण कोणते प्रश्न विचारात घेऊ शकतो?
१५ नेदरलंडमधील दोन उदाहरणे पाहा; येथे राज्य प्रचाराचे संघटित कार्य ३४ भाषांमध्ये चालवले जाते. एका साक्षीदार जोडप्याने पोलिश भाषेच्या लोकांमध्ये जाऊन शिष्य बनवण्याचे कार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या प्रयत्नांना इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की, आस्थेवाईक लोकांसोबत बायबलचा अभ्यास करायला आठवड्यातून आणखी एक दिवस मिळावा म्हणून
पतीने आपल्या नोकरीचे दिवस कमी करवून घेतले. बघता बघता, हे जोडपे दर आठवडी २० हून अधिक बायबल अभ्यास चालवत होते. ते म्हणाले: “आमच्या सेवाकार्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो.” लोकांना स्वतःच्या भाषेत बायबलची सत्ये ऐकायला मिळाल्यावर ते कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा शिष्य बनवणाऱ्यांना विशेष आनंद होतो. उदाहरणार्थ, विएतनामीझ भाषेत एक सभा चालू असताना एक वृद्ध गृहस्थ उभे राहिले आणि आपल्याला दोन शब्द बोलण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली. मग अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी साक्षीदारांना सांगितले: “माझी ही कठीण भाषा शिकायचा तुम्ही प्रयत्न करत आहात म्हणून मी तुमचे उपकार मानतो. माझ्या वृद्धापकाळात मला बायबलमधून इतक्या अद्भुत गोष्टी शिकायला मिळताहेत म्हणून मी आभारी आहे.”१६ परदेशी भाषेच्या मंडळ्यांमध्ये सेवा करणाऱ्यांना फार आशीर्वादित वाटते यात नवल नाही. ब्रिटनमधील एका जोडप्याने म्हटले: “आमच्या ४० वर्षांच्या राज्य सेवेत, परदेशी भाषेच्या क्षेत्रात सेवा करण्याचा अनुभव सर्वात आनंदविणारा राहिला आहे.” या उत्तेजनदायक सेवाकार्यात सहभाग घेता येण्यासाठी तुम्ही आपल्या परिस्थितीत थोडा फेरफार करू शकता का? तुम्ही अद्याप शाळेत शिकत असल्यास, एखादी परदेशी भाषा शिकून तुम्ही या प्रकारच्या सेवाकार्यासाठी आतापासूनच तयारी करू शकता का? असे केल्याने, आशीर्वादाने ओसंडून वाहणाऱ्या प्रतिफळदायी जीवनाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होऊ शकेल. (नीतिसूत्रे १०:२२) याविषयी तुम्ही आपल्या पालकांसोबत चर्चा करू शकता का?
पद्धत बदलून पाहणे
१७. आपल्या मंडळीच्या क्षेत्रात आपण अधिक लोकांना कसे गाठू शकतो?
१७ वैयक्तिक परिस्थितीमुळे, आपल्यापैकी बहुतेकजण परदेशी भाषेच्या क्षेत्रांमध्ये “जाळे” फेकण्याच्या स्थितीत नाहीत हे समजण्याजोगे आहे. परंतु, आपल्याला सध्या आपल्या स्वतःच्या मंडळीच्या क्षेत्रात भेटतात त्यापेक्षा कदाचित अधिक लोकांना भेटता येईल. कसे? आपला संदेश बदलून नव्हे तर पद्धत बदलून. अनेक ठिकाणी अधिकाधिक लोक उच्च सुरक्षा असलेल्या इमारतींमध्ये राहतात. शिवाय, आपण घरोघरच्या सेवाकार्यात जातो तेव्हा पुष्कळजण घरी नसतात. अशा वेळी आपल्याला वेगळ्या समयी आणि वेगळ्या ठिकाणी आपले “जाळे” फेकावे लागेल. अशाप्रकारे आपण येशूचे अनुकरण करू. लोकांशी वेगवेगळ्या ठिकाणी बोलण्याचे मार्ग त्याने शोधून काढले.—मत्तय ९:९; लूक १९:१-१०; योहान ४:६-१५.
१८. विविध ठिकाणी केलेले साक्षकार्य कशाप्रकारे परिणामकारक ठरले आहे? (“व्यापारी लोकांना शिष्य बनवणे” या पेटीचा समावेश करा.)
१८ जगाच्या काही भागांमध्ये, लोक जेथे सापडतील तेथे साक्षकार्य करणे ही शिष्य बनवण्याची एक महत्त्वपूर्ण पद्धत आहे. शिष्य बनवण्याच्या कामात अनुभव असलेल्यांनी विविध ठिकाणी साक्षकार्य करण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. घरोघरच्या सेवाकार्यात भाग घेण्याव्यतिरिक्त, प्रचारक आता विमानतळे, दफ्तरे, पार्किंग स्थळे, बस स्थानके, रस्ते, बागा, किनारपट्टी वगैरे ठिकाणी साक्ष देतात. हवाईमध्ये अलीकडे बाप्तिस्मा घेतलेल्यांपैकी बहुतेक जण अशाच ठिकाणी पहिल्यांदा भेटले होते. आपल्या पद्धती बदल्याने शिष्य बनवण्याची येशूची आज्ञा पूर्ण करण्यास आपल्याला मदत मिळते.—१ करिंथकर ९:२२, २३.
१९. पुढील लेखात येशूने आपल्याला दिलेल्या कामगिरीच्या कोणत्या पैलूंवर चर्चा केली जाईल?
१९ शिष्य बनवण्याच्या येशूने दिलेल्या कामगिरीत हे कार्य का व केव्हा करावे याचाच तपशील नव्हे तर काय प्रचार करावा आणि केव्हापर्यंत तो चालू ठेवावा याविषयीही माहिती आहे. येशूने दिलेल्या कामगिरीचे हे दोन पैलू पुढील लेखात पाहिले जातील.
[तळटीपा]
^ परि. 2 या लेखात आपण पहिल्या दोन प्रश्नांचा विचार करणार आहोत. शेवटल्या दोन प्रश्नांची चर्चा पुढील लेखात केली आहे.
^ परि. 8 नीतिसूत्रे १०:५; आमोस ३:८; मत्तय २४:४२; मार्क १२:१७; रोमकर १:१४, १५ येथे प्रचार करण्यासाठी अतिरिक्त कारणे सापडतात.
^ परि. 12 या भविष्यवाणीच्या पूर्णतेविषयी अधिक माहिती हवी असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले टेहळणी बुरूज, मे १५, २००१, पृष्ठ १२ आणि यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश (इंग्रजी), खंड दुसरा, पृष्ठ ४०८ पाहा.
तुम्हाला आठवते का?
• राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण कोणत्या कारणांसाठी आणि कोणत्या हेतूने सहभाग घेतो?
• यहोवाच्या सेवकांनी आज, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवण्याची येशूने दिलेली कामगिरी किती प्रमाणात पूर्ण केली आहे?
• ‘मासेमारीची पद्धत’ आपण कशी बदलू शकतो आणि असे का केले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चौकट/चित्रे]
अंधांकरता प्रकाशने
अल्बर्ट अमेरिकेत राहतात. ते एक ख्रिस्ती वडील आणि पूर्ण-वेळेचे सेवक आहेत. ते अंध आहेत. ब्रेलमधील बायबल साहित्यामुळे त्यांना सेवाकार्यात त्याचप्रमाणे सेवा पर्यवेक्षक या नात्याने आपली जबाबदारी अधिक परिणामकारकरित्या पार पाडण्यास मदत होते. ते मंडळीतील आपली नेमणूक कशी सांभाळतात?
त्या मंडळीचे अध्यक्षीय पर्यवेक्षक, जेम्स म्हणतात: “अल्बर्ट इतके परिणामकारक सेवा पर्यवेक्षक आतापर्यंत आमच्या मंडळीत कोणीच नव्हते.” अल्बर्ट हे अमेरिकेत असलेल्या सुमारे ५,००० अंध लोकांपैकी एक आहेत ज्यांना कित्येक वर्षांपासून इंग्रजी आणि स्पॅनिश ब्रेल लिपीत बायबलची प्रकाशने मिळत आहेत. १९१२ सालापासून, विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाने ब्रेलमध्ये शंभरहून अधिक विविध प्रकाशने पुरवली आहेत. अत्याधुनिक तंत्राचा वापर करून, यहोवाच्या साक्षीदारांच्या छापखान्यांतून सध्या दरवर्षी दहाहून अधिक भाषांमध्ये लाखो पाने छापून ७० हून अधिक देशांमध्ये पाठवली जातात. अंध लोकांकरता असलेल्या बायबल प्रकाशनांमुळे फायदा होईल असे कोणी तुमच्या ओळखीत आहे का?
[११ पानांवरील चौकट/चित्र]
मुकबधिरांची भाषा आणि शिष्य बनवणे
जगभरात, हजारो साक्षीदारांनी त्याचप्रमाणे अनेक आवेशी तरुणांनी मुकबधिरांची भाषा शिकून मुकबधिरांना ख्रिस्ताचे शिष्य होण्यास मदत केली आहे. यामुळे, एकट्या ब्राझीलमध्ये अलीकडच्या एका वर्षात ६३ मुकबधिरांचा बाप्तिस्मा झाला आणि तेथे सध्या ३५ मुकबधीर पूर्ण-वेळेचे सुवार्तिक आहेत. जगभरात, मुकबधिरांच्या १,२०० हून अधिक मंडळ्या आणि गट आहेत. रशियातला मुकबधीरांचा एकमेव विभाग (सर्किट) हा भौगोलिकदृष्ट्या जगातील सर्वात मोठा विभाग आहे ज्यात संपूर्ण रशियाचा समावेश होतो!
[१२ पानांवरील चौकट]
व्यापारी लोकांना शिष्य बनवणे
व्यापाऱ्यांना त्यांच्या दफ्तरात जाऊन भेटताना, हवाईमधील एका साक्षीदार बहिणीला एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक एक्झेकिटीव्ह भेटला. या गृहस्थाला वेळ नसतानाही त्याने आपल्या दफ्तरातच आठवड्यातून एकदा ३० मिनिटे बायबलचा अभ्यास करायला तयारी दाखवली. दर बुधवारी सकाळी, त्याने आपल्या कामगारांना त्याला फोन करण्यास मनाई केली आहे आणि अशाप्रकारे तो पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करतो. हवाईमधील आणखी एक साक्षीदार बहीण बुटे दुरुस्त करणारे दुकान चालवणाऱ्या एका स्त्रीशी आठवड्यातून एकदा बायबलचा अभ्यास करते. हा अभ्यास दुकानातच केला जातो. कोणी गिऱ्हाईक येते तेव्हा साक्षीदार बहीण बाजूला होते. गिऱ्हाईक निघून गेल्यावर त्या पुन्हा अभ्यास सुरू करतात.
साक्षीदारांनी वेगळ्या ठिकाणी आपले “जाळे” फेकण्याचे पाऊल उचलल्यामुळेच त्या एक्झेकिटीव्ह आणि दुकानाच्या मालकीणीची भेट झाली. तुम्ही आपल्या मंडळीच्या क्षेत्रात अशा काही ठिकाणांचा विचार करू शकता का, जेथे घरी सहसा न भेटणाऱ्या लोकांची गाठ पडू शकेल?
[१२ पानांवरील चित्र]
परदेशी भाषेच्या क्षेत्रात तुम्ही सेवा करू शकता का?