व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव आपल्या समस्यांसाठी जबाबदार आहे का?

देव आपल्या समस्यांसाठी जबाबदार आहे का?

देव आपल्या समस्यांसाठी जबाबदार आहे का?

मेरीअनच्या मोठ्या मुलीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली, तेव्हा मेरीअनने आपल्यापैकी बहुतेकजण करतील तेच केले. * तिने देवाला प्रार्थना करून मदत मागितली. “मला या आधी इतके असहाय आणि एकटे कधीच जाणवले नव्हते,” असे मेरीअन म्हणते. नंतर तिच्या मुलीची स्थिती अधिक गंभीर झाली, आणि मेरीअनला देवाबद्दल शंका वाटू लागली. “हे काय घडतंय?” असा प्रश्‍न तिच्या मनात आला. एक प्रेमळ आणि काळजी वाहणारा देव आपल्याला असे वाऱ्‍यावर कसा टाकून देऊ शकतो हेच तिला कळत नव्हते.

मेरीअनचा अनुभव काही निराळा नाही. जगभरात असंख्य लोकांना वाटते की, देव त्यांना अडचणीत साथ देत नाही. आपल्या नातवाचा खून झाल्यानंतर लिझा म्हणतात: “‘देव अशा गोष्टी का घडू देतो’ या प्रश्‍नांची उत्तरे मला अजून मिळालेली नाहीत. देवावर माझा अजूनही विश्‍वास आहे पण तो पूर्वी इतका मजबूत राहिलेला नाही.” त्याचप्रमाणे, एका स्त्रीच्या तान्ह्या बाळाला दुर्घटनेत दुखापत झाल्यावर ती म्हणाली: “देवानं मला सांत्वन दिलं नाही. त्याला काळजी आहे किंवा कळवळा वाटतो असं कोणतंच चिन्ह मला त्यानं दिलेलं नाही.” ती पुढे म्हणते: “मी देवाला कधीच माफ करणार नाही.”

इतरजणांना अवतीभोवतीची परिस्थिती पाहून देवावर राग येतो. राष्ट्रांमधील दारिद्र्‌य, उपासमार, युद्धाचे असहाय निर्वासित, एड्‌समुळे अनाथ झालेली अगणित मुले आणि इतर रोगांनी पीडित असलेले कोट्यवधी लोक त्यांना दिसतात. अशाप्रकारच्या दुर्घटना पाहून देव शांत बसला आहे, असा पुष्कळजण देवाला दोष देतात.

वास्तविक पाहता, मानवजातीला ग्रासून टाकणाऱ्‍या या समस्यांकरता देव जबाबदार नाही. उलट, या समस्या ठोस कारण देतात की, देव लवकरच मानवजातीला पोहंचलेली ही हानी भरून काढेल. तुम्ही पुढील लेख वाचावा आणि देव खरोखर आपली काळजी वाहतो याचा पुरावा पाहावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.

[तळटीप]

^ परि. 2 नावे बदलण्यात आली आहेत.