व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आम्हाला ‘होय!’ म्हणायचं आहे

आम्हाला ‘होय!’ म्हणायचं आहे

आम्हाला ‘होय!’ म्हणायचं आहे

नायजेरीयातील यहोवाच्या शाखा दफ्तराला अलीकडे एक पत्र मिळाले; त्या पत्राचा काही भाग पुढीलप्रमाणे आहे:

“आमचा मुलगा अँडरसन १४ वर्षांचा होता तेव्हा मरण पावला. तो जिवंत होता तेव्हा त्यानं दोन कोंबडीची पिलं पाळली होती. ही पिलं विकून त्यांचे पैसे जागतिक प्रचार कार्यासाठी देणगी म्हणून शाखा दफ्तराला पाठवण्याची त्याची इच्छा होती. पण ती विकण्याआधीच तो वारला.

“त्याची ही इच्छा होती म्हणून आम्ही अर्थात त्याच्या पालकांनी ही पिलं वाढवली आणि नंतर विकली. त्याचे पैसे आम्ही अँडरसनच्यावतीनं देणगी म्हणून पाठवत आहोत. यहोवाच्या वचनामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही लवकर—फारच लवकर—अँडरसनला पुन्हा पाहू. माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली का असं त्यानं विचारल्यावर आम्हाला ‘होय!’ म्हणायचं आहे. आम्ही फक्‍त अँडरसनलाच नव्हे तर पुनरुत्थानात उठणाऱ्‍या ‘मोठ्या साक्षीरूपी मेघाला’ पाहायलाही आतुर आहोत.”—इब्री लोकांस १२:१; योहान ५:२८, २९.

वरील पत्रातून स्पष्ट दिसून येते त्याप्रमाणे, पुनरुत्थानावरील विश्‍वास खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी बळकटी देणारी एक आशा आहे. अँडरसनच्या कुटुंबाप्रमाणे, मृत्यू या शत्रूने गिळंकृत केलेल्या इतरही कोट्यवधी कुटुंबांच्या प्रिय जनांचे स्वागत करताना कुटुंबांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.—१ करिंथकर १५:२४-२६.

देवाचे वचन पुनरुत्थानाची सांत्वनदायी आशा देते; देवाच्या राज्याधीन असलेल्या नीतिमान नवीन जगामध्ये लवकरच घडणाऱ्‍या अद्‌भुत गोष्टींपैकी ती एक आहे. (२ पेत्र ३:१३) त्या वेळी देव लोकांकरता काय करील याविषयी बायबल म्हणते: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.