व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाला खरा अर्थ कसा मिळतो?

जीवनाला खरा अर्थ कसा मिळतो?

जीवनाला खरा अर्थ कसा मिळतो?

जेसी या १७ वर्षांच्या उच्च शालेय विद्यार्थ्याला जीवनाचा काय अर्थ आहे असे विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले: “जिवंत आहात तोपर्यंत होता होईल तितकी मजा करा.” सूझीचा वेगळा दृष्टिकोन होता. ती म्हणाली: “तुमच्या जीवनाला तुम्ही ज्याप्रकारे घडवण्याचा प्रयत्न करता तो तुमच्या जीवनाचा अर्थ बनतो, असं मला मनापासून वाटतं.”

तुमच्या मनात कधी, जीवनाचा काय अर्थ आहे असा प्रश्‍न आला आहे का? सर्व मानवजातीसाठी एकच उद्देश आहे का? की, सूझीचे म्हणणे बरोबर होते—तुम्ही ज्याप्रकारे तुमचे जीवन घडवण्याचा प्रयत्न करता तो तुमच्या जीवनाचा अर्थ असतो? आपल्या समाजाने तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली असली तरी, आपल्या अंतर्यामात जीवनाचा अर्थ समजून घेण्याची इच्छा असते. जीवनातील कोणत्या तरी क्षणाला आपल्यातील बहुतेकांच्या मनात, ‘आपण इथं का आहोत?’ हा प्रश्‍न येतो.

आधुनिक विज्ञानाने या प्रश्‍नाचं उत्तर देण्याचा बराच आटापिटा केला आहे. काय आहे त्याचे उत्तर? “उत्क्रांतीच्या प्रक्रियेत केवळ जिवंत असण्याला काही अर्थ नाही,” असे मानसशास्त्राचे व प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डेव्हीड पी. बेरश म्हणतात. उत्क्रांतीच्या शास्त्रज्ञांनुसार, जिवंत प्राण्यांचा केवळ एकच उद्देश आहे: जगणे आणि पुनःउत्पत्ती करणे. म्हणून, प्राध्यापक बेरश असे सुचवतात: “उद्देशाची उणीव असलेल्या व लोकांची काळजी नसलेल्या या प्रचंड विश्‍वात, आपण करत असलेल्या मुक्‍त, जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर निवडींद्वारे आपण आपल्या जीवनाला अर्थ देऊ शकतो.”

अर्थ आणि उद्देशाचा उगम

म्हणजे प्रत्येकाने आपल्याला वाटते तसे करणे, केवळ हाच जीवनाचा अर्थ आहे का? उद्देश किंवा अर्थाची उणीव असलेल्या विश्‍वात आपल्याला वाऱ्‍यावर टाकण्याऐवजी बायबलने फार पूर्वी हे प्रकट केले की आपण येथे एका उद्देशास्तव आहोत. आपण कोणत्यातरी अंतरीक्ष अपघाताने अस्तित्वात आलो नाही. आपल्याला सांगितले जाते, की आपल्या निर्माणकर्त्याने मानवाच्या आगमनासाठी अगणित काळापासून पृथ्वीची तयारी करण्यास सुरवात केली होती. योगायोगाने काहीच घडले नाही. तो जे काही निर्माण करेल ते “चांगले” असेल याची त्याने खात्री केली. (उत्पत्ति १:३१; यशया ४५:१८) का? कारण मानवाबद्दल देवाचा एक उद्देश होता.

परंतु, उल्लेख करण्याजोगी गोष्ट अशी की देवाने हस्तक्षेप करून किंवा जैविक प्रक्रियेद्वारे प्रत्येकाचे भविष्य आधी ठरवून ठेवले नाही. आपल्यावर आनुवंशिकतेचा प्रभाव असला तरीसुद्धा, आपल्या कार्यांवर आपला बहुतांशी ताबा असतो. जीवनात स्वतःचा मार्ग निवडण्यास आपण सर्व मुक्‍त आहोत.

आपल्या जीवनात आपण काय केले पाहिजे याची निवड करण्याचे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असले तरी, आपल्या योजनांतून निर्माणकर्त्याला वगळणे ही सर्वात मोठी चूक ठरेल. खरे तर पुष्कळ लोकांना कळाले आहे, की जीवनाचा खरा अर्थ किंवा उद्देश, देवाबरोबर नातेसंबंध जोडण्याशी संबंधित आहे. देव आणि आपल्या जीवनाचा उद्देश यांतील महत्त्वपूर्ण संबंध, देवाच्या व्यक्‍तिगत नावाद्वारे—यहोवाद्वारे—ठळकपणे दिसून येतो ज्याचा अक्षरशः अर्थ “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा होतो. (निर्गम ६:३, तळटीप; स्तोत्र ८३:१८, तळटीप) याचा अर्थ, तो जे काही अभिवचन देतो ते तो प्रगतीशीलपणे पूर्ण करतो आणि तो जे काही उद्देशितो ते नेहमी साध्य करतो. (निर्गम ३:१४; यशया ५५:१०, ११) या नावाचा जरा विचार करा. यहोवा हे नाव आपल्या सर्वांसाठी एक हमी आहे, की तोच अर्थपूर्ण उद्देशाचा मूळ व चिरकालिक स्रोत आहे.

एक निर्माणकर्ता आहे एवढे कबूल केल्यानेच एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनाविषयीच्या दृष्टिकोनावर प्रभाव पडू शकतो. लिनेट नावाची एक १९ वर्षीय मुलगी म्हणते: “यहोवानं बनवलेल्या सर्व अद्‌भुत गोष्टी आणि त्या ज्या उद्देशास्तव बनवल्या आहेत हे पाहिल्यावर, मलाही काही कारणास्तव निर्माण करण्यात आलं आहे, हे मी पाहू शकते.” ॲम्बर म्हणते: “लोक जेव्हा, ‘अज्ञात’ देवाविषयी बोलतात तेव्हा मला असं वाटतं, की मी किती कृतज्ञ आहे कारण मला तो माहीत आहे. गोष्ट साधीशी आहे, यहोवा अस्तित्वात आहे याचा पुरावा, त्याने बनवलेल्या वस्तूंवरून मिळतो.” (रोमकर १:२०) अर्थात, निर्माणकर्ता अस्तित्वात आहे हे मानणे ही एक बाजू आहे परंतु त्याच्याशी अर्थपूर्ण नातेसंबंध जोडणे ही दुसरी बाजू आहे.

देवाबरोबर मैत्री

याबाबतीतही बायबल आपली मदत करू शकते. बायबलच्या सुरवातीच्या अध्यायांमध्ये, यहोवा देव एक प्रेमळ पिता असल्याचा स्पष्ट पुरावा मिळतो. जसे की, त्याने आदाम व हव्वेला निर्माण करून, तो कोण आहे याच्याविषयीची माहिती न देता त्यांना असेच वाऱ्‍यावर सोडून दिले नाही. तर तो नेहमी त्यांच्याशी दळणवळण करायचा. एदेन बागेत त्यांना एकटे सोडून तो दुसऱ्‍या कामाला लागला नाही. तर, ते उत्तमप्रकारे जीवन कसे जगू शकतील याबाबतीत त्याने त्यांना विशिष्ट मार्गदर्शन दिले. त्याने त्यांना समाधानकारक काम दिले आणि त्यांना सतत शिक्षण मिळत राहील याचीही व्यवस्था केली. (उत्पत्ति १:२६-३०; २:७-९) एका कार्यक्षम, प्रेमळ पालकाकडून तुम्ही देखील अशी अपेक्षा करणार नाही का? याचा काय अर्थ होतो यावर जरा विचार करा. “यहोवानं पृथ्वीची निर्मिती केली आणि आपल्याला त्यानं अशाप्रकारे बनवलं आहे की आपण त्याच्या सृष्टीतून आनंद लुटू शकतो, यावरून मला कळतं, की आपण आनंदी राहावं अशी त्याची इच्छा आहे,” असे डिन्येल म्हणते.

एवढेच नव्हे तर, कोणत्याही प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाची देखील अशी इच्छा आहे की त्याच्या सर्व मुलांनी त्याच्याबरोबर एक व्यक्‍तिगत नातेसंबंध जोडावा. याबाबतीत, प्रेषितांची कृत्ये १७:२७ आपल्याला असे आश्‍वासन देते: “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” याने काही फरक पडतो का? ॲम्बर म्हणते: “यहोवाशी ओळख झाल्यानंतर माझी पक्की खात्री झाली की मी आता पूर्णपणे एकटी नाही. माझ्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी माझी अशी विश्‍वासाची एक व्यक्‍ती आहे जिला मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकते.” शिवाय, जसजशी तुमची यहोवाबरोबरची ओळख वाढेल तसतसे तुम्हाला समजून येईल की तो दयाळू, न्यायी आणि चांगला आहे. तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू शकता. जेफ म्हणतो: “यहोवा माझा जवळचा मित्र झाला तेव्हा, अडचणीच्या वेळी त्याच्याशिवाय दुसरा कोणीही मला मदत देऊ शकणार नाही, अशी माझी खात्री पटली.”

परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाविषयी पुष्कळ नकारात्मक गोष्टी बोलण्यात आल्या आहेत. मानवावरील दुःख आणि धार्मिक गैरवर्तन यासाठी त्याला दोषी ठरवले जाते. मानव इतिहासातल्या काही अतिशय क्रूर कृत्यांसाठी त्याला जबाबदार ठरवले जाते. परंतु अनुवाद ३२:४, ५ म्हणते: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; . . . हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे.” त्यामुळे खरे काय आहे हे शोधून काढण्याची आपली जबाबदारी आहे.—अनुवाद ३०:१९, २०.

देवाच्या उद्देशाची पूर्ती

आपण काहीही ठरवले तरी, ही पृथ्वी आणि मानवजात यांच्यासंबंधाने असलेला देवाचा उद्देश पूर्ण होण्यापासून कोणतीही गोष्ट त्याला रोखू शकत नाही. कारण तो निर्माणकर्ता आहे. मग त्याचा उद्देश काय आहे? डोंगरावरील प्रवचन देताना येशू ख्रिस्ताने त्याचा उल्लेख करीत म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” नंतर, प्रेषित योहान याला त्याने असे सांगितले की देवाने “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करण्याचे ठरवले आहे. (मत्तय ५:५; प्रकटीकरण ११:१८) सृष्टीच्या वेळी येशू देवाबरोबर असल्यामुळे त्याला हे माहीत होते, की परादीस पृथ्वीवर एका परिपूर्ण मानवी कुटुंबाने चिरकाल जगावे असा देवाचा सुरवातीपासूनच उद्देश होता. (उत्पत्ति १:२६, २७; योहान १:१-३) आणि देव बदलणारा नाही. (मलाखी ३:६) तो असे वचन देतो: “मी कल्पिले तसे होईलच; मी योजिले तसे घडेलच.”—यशया १४:२४.

आपल्या काळात यहोवाने केव्हाच एका संयुक्‍त समाजाचा पाया रचण्यास सुरवात केली आहे; हा समाज आज आपण जगात पाहतो त्या लोभ व स्वार्थीपणावर आधारित नाही तर देव आणि शेजाऱ्‍यांबद्दल असलेल्या प्रेमावर आधारित आहे. (योहान १३:३५; इफिसकर ४:१५, १६; फिलिप्पैकर २:१-४) या समाजात स्वेच्छेने आलेले लोक प्रगतीशील आहेत व अगदी आवेशाने एक कामगिरी अर्थात या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी देवाच्या येणाऱ्‍या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची कामगिरी पार पाडण्यास प्रवृत्त होतात. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये ६० लाखांपेक्षा अधिक ख्रिश्‍चनांनी, एका प्रेमळ, संयुक्‍त आंतरराष्ट्रीय बंधूसमाजासोबत मिळून देवाची उपासना करण्यास केव्हाच सुरवात केली आहे.

तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवा

तुम्ही तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू इच्छित असाल तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की यहोवा देव तुम्हाला त्याच्या लोकांबरोबर अर्थात त्याच्या ‘धार्मिक राष्ट्राबरोबर’ आता संगती करण्याचे आमंत्रण देत आहे. (यशया २६:२) तुमच्या मनात असे प्रश्‍न येतील, जसे की, ‘या ख्रिस्ती समाजातील जीवन कशाप्रकारचे असेल? या समाजाचा भाग बनण्याची माझी खरोखरच इच्छा आहे का?’ काही तरुणांचे काय मत आहे, ते पाहा:

क्वेन्टीन: “माझी मंडळी ही माझ्यासाठी जगापासून आसरा आहे. यहोवा माझ्या जीवनाचा भाग आहे या जाणीवेमुळे, तो अस्तित्वात आहे आणि मी आनंदी राहावे अशी त्याची इच्छा आहे हे समजण्यास मला मदत मिळते.”

जेफ: “उत्तेजन मिळण्यासाठी माझ्या मंडळीसारखं दुसरं उत्तम ठिकाण नाही. तिथं माझे भाऊबहीण आहेत जे मला आधार देतात, माझी स्तुती करतात. हेच माझं मोठं कुटुंब आहे.”

लिनेट: “लोक बायबल सत्य स्वीकारून यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतात हे पाहण्याचा आनंद वेगळाच आहे; त्याची तुलना इतर कशासोबतही करता येत नाही. याने माझ्या जीवनात बरेच समाधान प्राप्त होते.”

कॉडी: “यहोवाशिवाय माझे जीवन निरर्थक ठरले असते. इतरांसारखा मीसुद्धा आनंदाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसरीकडे व्यर्थपणे वाहवत गेलो असतो. पण, देवाने मला त्याच्यासोबत नातेसंबंध जोडण्याचा मौल्यवान सुहक्क दिला आहे आणि यामुळे माझ्या जीवनाला अर्थ लाभला आहे.”

तुम्हीसुद्धा स्वतः परीक्षण करून पाहू शकता. निर्माणकर्ता, यहोवा देव, याच्या जवळ गेल्याने तुमच्याही जीवनाला खरा अर्थ लाभेल.

[३१ पानांवरील चित्रे]

देवासोबतच्या नातेसंबंधामुळे आपल्या जीवनाला अर्थ लाभतो

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

NASA photo