यहोवा नम्र लोकांना आपले वैभव प्रकट करतो
यहोवा नम्र लोकांना आपले वैभव प्रकट करतो
“नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४.
१, २. (अ) प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून स्तेफन “विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष” होता हे कसे दिसते? (ब) स्तेफन नम्र होता याचा कोणता पुरावा आहे?
स्तेफन “विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष” होता. तो “कृपा व सामर्थ्य ह्यांनी [देखील] पूर्ण” होता. येशूचा प्रारंभिक शिष्य या नात्याने तो लोकांमध्ये मोठी अद्भुते व चिन्हे करत होता. एके प्रसंगी, काही लोक त्याच्याशी वाद घालायला उठले परंतु “तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.” (प्रेषितांची कृत्ये ६:५, ८-१०) यावरून स्पष्ट होते की, स्तेफन हा देवाच्या वचनाचा निपुण विद्यार्थी होता आणि त्याने आपल्या दिवसांतील यहुदी धार्मिक नेत्यांपुढे कौशल्याने त्याचे समर्थन केले. देवाचा उद्देश हळूहळू प्रकट होण्यामध्ये त्याला किती उत्सुकता होती हे प्रेषितांची कृत्ये अध्याय ७ मधील त्याच्या तपशीलवार साक्षीतून कळून येते.
२ स्तेफन नम्र होता; तो धार्मिक पुढाऱ्यांसारखा नव्हता जे त्यांच्या पदामुळे आणि ज्ञानामुळे सामान्य लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायचे. (मत्तय २३:२-७; योहान ७:४९) तो शास्त्रवचनांत पारंगत असला तरी “पंक्तिसेवा” करण्याच्या नेमणुकीबद्दल तो आनंदी होता जेणेकरून प्रेषितांना “प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर” राहता येऊ शकत होते. स्तेफनाचे बांधवांमध्ये चांगले नावलौकिक होते आणि म्हणून त्याला दररोज पंक्तिसेवा करण्यासाठी सात प्रतिष्ठित पुरुषांपैकी निवडण्यात आले होते. त्याने नम्रपणे आपली नेमणूक स्वीकारली.—प्रेषितांची कृत्ये ६:१-६.
३. स्तेफनाला देवाच्या अपात्र कृपेचा कोणता उल्लेखनीय आविष्कार अनुभवायला मिळाला?
३ स्तेफनाची नम्र मनोवृत्ती तसेच त्याची आध्यात्मिकता आणि निष्ठा यांकडे यहोवाचे लक्ष गेल्याशिवाय राहिले नाही. न्यायसभेत यहुदी धर्मपुढाऱ्यांच्या कठोर जमावापुढे स्तेफन साक्ष देत होता तेव्हा, त्याच्या विरोधकांना “त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.” (प्रेषितांची कृत्ये ६:१५) त्याच्या चेहऱ्यावरील भाव देवाच्या दूतासारखा होता आणि त्याचे शांत चित्त गौरवी देव, यहोवा याच्याकडून मिळाल्यासारखे होते. न्यायसभेतील सदस्यांना धीटपणे साक्ष दिल्यानंतर स्तेफनाला देवाच्या अपात्र कृपेचा उल्लेखनीय आविष्कार अनुभवायला मिळाला. “पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.” (प्रेषितांची कृत्ये ७:५५) हा लक्षवेधक दृष्टान्त पाहिल्यावर, येशू देवाचा पुत्र आणि मशीहा असल्याची स्तेफनाला पुन्हा एकदा खात्री पटली. यामुळे नम्र स्तेफनाला बळकटी मिळाली आणि त्याच्यावर यहोवाची कृपा आहे हे आश्वासन मिळाले.
४. यहोवा आपले वैभव कोणाला प्रकट करतो?
४ स्तेफनाला दिलेल्या दृष्टान्तातून दिसते त्याप्रमाणे, जे नम्र आहेत आणि जे त्याच्यासोबतच्या नातेसंबंधाची कदर बाळगतात अशा देव-भीरू व्यक्तींना देव आपले वैभव आणि उद्देश प्रकट करतो. “नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय,” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे २२:४) यास्तव, खरी नम्रता म्हणजे काय, हा महत्त्वपूर्ण गुण कसा विकसित करता येतो आणि जीवनाच्या हरएक पैलूत तो दाखवल्याने आपल्याला कसा फायदा प्राप्त होऊ शकतो हे समजणे आवश्यक आहे.
नम्रता—ईश्वरी गुण
५, ६. (अ) नम्रता काय आहे? (ब) यहोवाने नम्रता कशी दाखवली आहे? (क) यहोवाच्या नम्रतेचा आपल्यावर काय परिणाम झाला पाहिजे?
५ यहोवा देव, विश्वातील सर्वात श्रेष्ठ आणि वैभवशाली स्तोत्र १८:३५) यहोवाचे वर्णन ‘लीन’ असे करताना दावीदाने एका इब्री मूळ शब्दाचा उपयोग केला ज्याचा अर्थ “खाली वाकलेले” असा होतो. ‘लीन’ या शब्दाव्यतिरिक्त त्या मूळ शब्दाशी “नम्र,” “दीन,” आणि “स्वतःला कनिष्ठ करणे” हे शब्द देखील संबंधित आहेत. यास्तव, अपरिपूर्ण मनुष्य दावीद याच्याशी व्यवहार करण्यासाठी यहोवाने स्वतःला कनिष्ठ केले आणि त्याला आपला प्रतिनिधी राजा नेमले तेव्हा त्याने नम्रता दाखवली. स्तोत्र १८ च्या उपरीलेखनात दाखवल्याप्रमाणे, यहोवाने दावीदाला संरक्षण व मदत दिली आणि त्याला “त्याच्या सर्व वैऱ्यांच्या हातून व शौलाच्या हातून सोडविले.” दावीदाला हेही ठाऊक होते की, यहोवा त्याच्या वतीने नम्रपणे कार्य करत असल्यामुळे त्याला राजा या नात्याने महानता आणि वैभव मिळत होते. हे जाणल्यामुळे दावीदाला नम्र राहता आले.
व्यक्ती नम्रतेचे परमोच्च उदाहरण आहे याचे काहींना आश्चर्य वाटेल. राजा दावीदाने यहोवाला म्हटले: “तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहे; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरिले आहे; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (६ आपल्याविषयी काय? आपण सत्य शिकण्यास पात्र आहोत हे यहोवाने पाहिले असावे व त्याने त्याच्या संघटनेत आपल्याला सेवेचे काही सुहक्क दिले असावेत किंवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या न् कोणत्या प्रकारे आपला उपयोग केला असावा. याबद्दल आपल्याला कसे वाटायला हवे? आपण नम्र होऊ नये का? यहोवाने नम्रता दाखवल्याबद्दल आपण कदर बाळगू नये का? तसेच आपण स्वतःला श्रेष्ठ समजले तर निश्चित अरिष्ट ओढवेल म्हणून तसे करण्याचे टाळू नये का?—नीतिसूत्रे १६:१८; २९:२३.
७, ८. (अ) मनश्शेसोबतच्या व्यवहारांमध्ये यहोवाची नम्रता कशी दिसून आली? (ब) यहोवाने त्याचप्रमाणे मनश्शेने नम्रता दाखवण्यासंबंधी आपल्याकरता कोणते उदाहरण मांडले आहे?
७ यहोवाने केवळ अपरिपूर्ण लोकांसोबत व्यवहार करून नम्रता दाखवलेली नाही तर लीन जनांना दया दाखवण्याची इच्छाही त्याने दाखवली आहे; इतकेच नव्हे तर स्वतःला नम्र करणाऱ्यांना त्याने उठविले किंवा वर उचलले आहे. (स्तोत्र ११३:४-७) यहूदाचा राजा मनश्शे याचे उदाहरण पाहा. त्याने खोट्या उपासनेला बढावा देण्याकरता राजा या नात्याने आपल्या सन्मानित हुद्द्याचा गैरवापर केला आणि “परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणिला.” (२ इतिहास ३३:६) शेवटी, मनश्शेला अश्शूरच्या राजाद्वारे राजपदावरून काढून टाकण्याची अनुमती देऊन यहोवाने मनश्शेला शिक्षा केली. तुरुंगात असताना, मनश्शे “आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि . . . देवासमोर फार दीन झाला.” यामुळे यहोवाने त्यास पुन्हा जेरुसलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले तेव्हा “परमेश्वरच देव आहे असे मनश्शेस कळून आले.” (२ इतिहास ३३:११-१३) होय, मनश्शेची नम्र मनोवृत्ती पाहून यहोवा आनंदित झाला आणि यहोवानेही नम्रपणे त्याला क्षमा करून पुन्हा त्याला राजा या नात्याने नियुक्त केले.
८ क्षमा करण्याची यहोवाची तयारी आणि मनश्शेची पश्चात्तापी मनोवृत्ती यांतून नम्रतेविषयी आपल्याला महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपले मन दुखावलेल्यांसोबत आपण कसा व्यवहार करतो आणि पाप केल्यावर आपण कशी मनोवृत्ती दाखवतो यांचा यहोवा आपल्याशी कसा व्यवहार करतो यावर परिणाम होऊ शकतो. आपण इतरांचे अपराध माफ करायला आणि नम्रपणे आपल्या चुका कबूल करायला तयार झालो तर यहोवाकडून आपण दयेची अपेक्षा करू शकतो.—मत्तय ५:२३, २४; ६:१२.
नम्र जनांना ईश्वरी वैभव प्रकट होते
९. नम्रता हे दुर्बलतेचे चिन्ह आहे का? स्पष्ट करा.
९ नम्रता आणि त्याच्याशी संबंधित असलेले गुण दुर्बलतेचे चिन्ह आहे किंवा चुकीच्या गोष्टींना सूट देण्याची प्रवृत्ती आहे असा गैरसमज आपण करून घेऊ नये. पवित्र शास्त्रवचनांमधून दिसते त्याप्रमाणे यहोवा नम्र आहे आणि तरीही वेळ येते तेव्हा तो उचित गोष्टींसाठी क्रोध व्यक्त करतो आणि अफाट सामर्थ्य प्रदर्शित करतो. यहोवा नम्रतेमुळेच मनाचे दीन असलेल्यांवर कृपादृष्टी करतो किंवा त्यांच्याकडे खास लक्ष देतो आणि गर्विष्ठ लोकांपासून दूर राहतो. (स्तोत्र १३८:६) यहोवाने आपल्या नम्र सेवकांकडे खास लक्ष कसे दिले आहे?
१०. पहिले करिंथकर २:६-१० मध्ये दाखवल्याप्रमाणे, यहोवा नम्र जनांना काय प्रकट करतो?
१० यहोवाने आपल्या नियुक्त वेळी आणि संवाद साधण्याच्या आपल्या ठराविक माध्यमाद्वारे त्याचा उद्देश कसा सिद्धीस जाईल याची तपशीलवार माहिती नम्रपणे लोकांना प्रकट केली आहे. मात्र ही माहिती, मानवी बुद्धीवर किंवा विचारसरणीवर गर्विष्ठपणे विसंबून राहणाऱ्यांपासून किंवा हट्टीपणाने त्यांचे पालन करणाऱ्यांपासून लपून राहते. (१ करिंथकर २:६-१०) परंतु, नम्र जनांना यहोवाच्या उद्देशांची अचूक समज दिल्यामुळे ते त्याचे गौरव करण्यास प्रेरित होतात कारण त्याच्या भव्यदिव्य वैभवाची त्यांना कदर वाटते.
११. पहिल्या शतकात, काहींनी नम्रतेचा अभाव कसा प्रदर्शित केला आणि हे त्यांच्याकरता हानीकारक का ठरले?
११ पहिल्या शतकात, अनेकांनी—ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या काहींनी देखील—नम्रता दाखवली नाही आणि प्रेषित पौलाने त्यांना देवाच्या उद्देशाविषयी सांगितले तेव्हा ते अडखळले. पौल “परराष्ट्रीयांचा प्रेषित” झाला खरा पण राष्ट्रीयत्व, शिक्षण, वय किंवा अनेक वर्षांपासून उत्तम कार्ये करण्याच्या जोरावर नव्हे. (रोमकर ११:१३) या गोष्टींच्या आधारे यहोवा कोणाचा उपयोग करावा आणि कोणाचा करू नये हे ठरवतो असे सहसा जगिक मनोवृत्ती बाळगणाऱ्या व्यक्ती विचार करतात. (१ करिंथकर १:२६-२९; ३:१; कलस्सैकर २:१८) परंतु, पौलाला यहोवाने आपल्या प्रेमळ कृपेच्या आणि नीतिमान उद्देशाच्या एकमतात निवडले होते. (१ करिंथकर १५:८-१०) पौलाने ज्यांना ‘अतिश्रेष्ठ प्रेषित’ म्हटले त्यांनी त्याचप्रमाणे इतर विरोधकांनी पौलाचा आणि शास्त्रवचनांतून तर्क करण्याच्या त्याच्या पद्धतीचा स्वीकार केला नाही. त्यांनी नम्रता न दाखवल्यामुळे यहोवाचा उद्देश पूर्णत्वास नेण्याच्या वैभवी मार्गाचे ज्ञान आणि समज त्यांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे, यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यास ज्यांचा उपयोग करतो अशांबद्दल आपण कमी विचार करू नये किंवा त्यांच्याविषयी आधीच मत बनवू नये.—२ करिंथकर ११:४-६.
१२. यहोवा नम्र जनांवर कृपादृष्टी करतो हे मोशेच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?
१२ दुसऱ्या बाजूला पाहता, बायबलमध्ये अशी अनेक गणना १२:३) ४० वर्षांतील बहुतेक वर्षे अरेबियन द्वीपकल्पावर साधा मेंढपाळ म्हणून राहिलेल्या या नम्र मनुष्यावर निर्माणकर्त्याने अनेक मार्गांनी कृपादृष्टी केली होती. (निर्गम ६:१२, ३०) यहोवाच्या साहाय्याने मोशे इस्राएल राष्ट्राचा प्रतिनिधी आणि मुख्य आयोजक बनला. देवासोबत त्याचे दुतर्फी संभाषण होत असे. एका दृष्टान्तात त्याने “परमेश्वराचे स्वरूप” पाहिले. (गणना १२:७, ८; निर्गम २४:१०, ११) ज्यांनी या नम्र सेवकाचा आणि देवाच्या प्रतिनिधीचा स्वीकार केला त्यांनाही आशीर्वाद प्राप्त झाले. त्याचप्रमाणे, मोशेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या संदेष्ट्याला अर्थात येशूला तसेच त्याने नेमलेल्या “विश्वासू व बुद्धिमान दासाला” आपण स्वीकारले आणि त्यांची आज्ञा पाळली तर आपल्यालाही आशीर्वाद प्राप्त होतील.—मत्तय २४:४५, ४६; प्रेषितांची कृत्ये ३:२२.
उदाहरणे आहेत ज्यांमध्ये नम्र लोकांना देवाच्या वैभवाचे ओझरते दर्शन प्राप्त झाले. मोशे हा “सर्व मनुष्यांपेक्षा नम्र” होता; त्याने देवाचे वैभव पाहिले आणि त्याच्यासोबत त्याचा गहिरा नातेसंबंध होता. (१३. पहिल्या शतकातल्या नम्र मेंढपाळांना यहोवाचे वैभव कशाप्रकारे प्रकट करण्यात आले?
१३ ‘प्रभूचे तेज कोणावर प्रकाशले’ व देवदूतांनी ‘तारणारा जो ख्रिस्त प्रभु आहे’ त्याच्या जन्माच्या सुवार्तेची घोषणा कोणाला केली? घमेंडी धार्मिक पुढाऱ्यांना किंवा उच्चपदस्थ लोकांना नव्हे तर “रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप” राखणाऱ्या नम्र मेंढपाळांना. (लूक २:८-११) हे लोक फार कौशल्य असलेले व आपल्या कामासाठी प्रसिद्ध असे लोक नव्हते. तरीही, यहोवाने त्यांच्याकडे लक्ष दिले आणि त्यांना मशीहाच्या जन्मण्याची पहिली खबर देण्यास निवडले. होय, नम्र आणि देव-भीरू लोकांना यहोवा आपले वैभव प्रकट करतो.
१४. नम्र असलेल्यांना देवाकडून कोणते आशीर्वाद प्राप्त होतात?
१४ या उदाहरणांवरून आपल्याला काय शिकायला मिळते? हेच की, यहोवा नम्र लोकांवर कृपादृष्टी करतो आणि त्यांना आपले ज्ञान व आपल्या उद्देशांची समज देतो. मानवांच्या अपेक्षांना न उतरणाऱ्या लोकांना तो निवडतो आणि त्यांच्याद्वारे इतरांना आपले उद्देश कळवतो. यामुळे, यहोवाकडून, त्याच्या भविष्यसूचक वचनातून आणि त्याच्या संघटनेकडून संदेश प्राप्त करण्यास आपण प्रेरित झाले पाहिजे. यहोवा आपल्या नम्र सेवकांना आपला वैभवी उद्देश प्रकट करत राहील याची आपण खात्री बाळगू शकतो. संदेष्ट्या आमोसने घोषणा केली: “प्रभु परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.”—आमोस ३:७.
नम्रता विकसित करा आणि देवाची कृपादृष्टी मिळवा
१५. नम्रता टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न का केला पाहिजे आणि इस्राएलचा राजा शौल याच्या बाबतीत हे कसे दिसते?
१५ देवाची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहायची असल्यास आपण नेहमी नम्र राहिले पाहिजे. एकदा नम्रता दाखवली म्हणजे ती व्यक्ती नेहमीच नम्र असते असे नाही. नम्रता सोडून गर्विष्ठ आणि घमंडी देखील बनणे शक्य आहे; यामुळे एक व्यक्ती मिजासखोर बनते आणि विनाशाच्या मार्गावर जाते. इस्राएलचा सर्वात पहिला अभिषिक्त राजा शौल याने अगदी हेच केले. त्याला पहिल्यांदा निवडण्यात आले तेव्हा ‘आपल्या दृष्टीने आपण क्षुद्र’ आहोत असे त्याला वाटले. (१ शमुवेल १५:१७) परंतु, राजपदावर येऊन केवळ दोनच वर्षे झाल्यावर तो मगरूर बनला. त्याने संदेष्ट्या शमुवेलाद्वारे बलिदान अर्पण करण्याची यहोवाची व्यवस्था झिडकारली आणि नंतर ज्या गोष्टी करण्याचा त्याला हक्क नव्हता त्या गोष्टी करून वर सबबीही दिल्या. (१ शमुवेल १३:१, ८-१४) ही केवळ सुरवात होती परंतु या घटनांवरून त्याच्यामध्ये नम्रता राहिली नव्हती ही गोष्ट ठळकपणे दिसत होती. परिणामस्वरूप देवाचा आत्मा आणि कृपादृष्टी त्याच्यावरून निघून गेली आणि शेवटी अगदी लाजिरवाण्या पद्धतीने त्याचा मृत्यू झाला. (१ शमुवेल १५:३-१९, २६; २८:६; ३१:४) यातून धडा अगदी स्पष्ट आहे: आपण नम्रता आणि आज्ञाधारकता टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे; स्वतःला श्रेष्ठ समजण्याची इच्छा आपल्या मनात अंकुरते तेव्हा वेळीच आपण तिचा बिमोड केला पाहिजे; अशारीतीने यहोवाची कृपादृष्टी राहणार नाही अशी कोणतीही गर्विष्ठपणाची कृत्ये आपण करणार नाही.
१६. यहोवा आणि आपल्या सहमानवासोबतच्या नातेसंबंधाचा गहन विचार केल्याने आपल्याला नम्रता विकसित करायला मदत कशी मिळू शकेल?
१६ नम्रता या गुणाचा देवाच्या आत्म्याच्या फळात गलतीकर ५:२२, २३; कलस्सैकर ३:१०, १२) हा मनोवृत्तीचा—अर्थात, आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल कसा दृष्टिकोन बाळगतो याचा—प्रश्न असल्यामुळे, नम्रता विकसित करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. यहोवासोबतच्या आणि सहमानवांसोबतच्या आपल्या नातेसंबंधाचा गहन विचार केला आणि त्यावर मनन केले तर आपल्याला नम्र राहण्यास मदत मिळेल. देवाच्या नजरेत, अपरिपूर्ण देह हे हिरव्या गवतासारखे आहे जे अल्पकाळापर्यंत वाढते आणि मग कोमेजून सुकून जाते. आणि मानव शेतातल्या टोळांसमान आहेत. (यशया ४०:६, ७, २२) गवताचे एक पाते इतर पात्यांपेक्षा जरा लांब असल्यामुळे त्याने गर्व करणे उचित आहे का? एक टोळ इतर टोळांपेक्षा जरा जास्त उडी मारू शकत असल्यामुळे त्याने आपल्या सामर्थ्याची बढाई मारावी हे योग्य आहे का? हा विचारही किती हास्यास्पद वाटतो. यास्तव, प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना अशी आठवण करून दिली: “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (१ करिंथकर ४:७) बायबलमधील अशा शास्त्रवचनांचा विचार केल्यावर आपल्याला नम्रता हा गुण विकसित करून तो आपल्या जीवनात दाखवण्यास मदत मिळेल.
समावेश नाही परंतु तो एक ईश्वरी गुण आहे जो विकसित करण्याची गरज आहे. (१७. संदेष्ट्या दानीएलाला नम्रता विकसित करायला कशामुळे मदत मिळाली आणि आज आपल्यालाही हे करण्यास मदत कशी मिळू शकते?
१७ इब्री संदेष्टा दानीएल, देवाच्या नजरेत ‘परमप्रिय पुरुष’ असा होता कारण लीनतेमुळे त्याने स्वतःला “नम्र” केले होते. (दानीएल १०:११, १२) दानीएल नम्र कसा बनला? पहिली गोष्ट म्हणजे, दानीएल यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिला व तो नेहमी देवाला प्रार्थना करत असे. (दानीएल ६:१०, ११) शिवाय, दानीएल मेहनतीने आणि उचित हेतू बाळगून देवाच्या वचनाचा अभ्यास करत असे ज्यामुळे देवाचा वैभवी उद्देश सतत त्याच्या केंद्रस्थानी राहिला. तो केवळ त्याच्या लोकांच्याच नव्हे तर स्वतःच्या चुका देखील कबूल करण्यास तयार होता. आणि त्याने स्वतःच्या नव्हे तर देवाच्या न्यायत्वाला उंचावून धरण्याची आस्था दाखवली. (दानीएल ९:२, ५, ७) दानीएलाच्या उल्लेखनीय उदाहरणातून आपण धडा शिकू शकतो का आणि आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये नम्रता विकसित करून ती दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो का?
१८. आज नम्रता दाखवणाऱ्यांना कोणता सन्मान प्राप्त होणार आहे?
१८ “नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय,” असे नीतिसूत्रे २२:४ म्हणते. यहोवा नम्र लोकांवर कृपादृष्टी करतो आणि याचा परिणाम सन्मान व जीवन होय. स्तोत्रकर्त्या आसाफाने देवाची सेवा करणे जवळजवळ सोडून दिले होते पण नंतर त्याने यहोवाच्या मदतीने आपल्या विचारसरणीत सुधार केला आणि नम्रपणे कबूल केले: “तू बोध करून मला मार्ग दाखविशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करिशील.” (स्तोत्र ७३:२४) आज हे कसे लागू होऊ शकते? नम्रता दाखवणाऱ्यांना कोणता सन्मान प्राप्त होणार आहे? यहोवाची कृपापसंती असण्याशिवाय आणि त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध असण्याशिवाय ते राजा दावीदाच्या या प्रेरित शब्दांच्या पूर्णतेची वाट पाहू शकतात: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” खरोखर किती अत्युत्तम भविष्य!—स्तोत्र ३७:११.
तुम्हाला आठवते का?
• यहोवाने आपले वैभव ज्याला प्रकट केले तो स्तेफन नम्रतेचे उदाहरण कसा आहे?
• यहोवा देवाने कोणत्या मार्गांनी नम्रता दर्शवली?
• यहोवा नम्र लोकांना आपले वैभव प्रकट करतो हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?
• दानीएलाचे उदाहरण आपल्याला नम्रता विकसित करण्यास कसे मदत करू शकते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२ पानांवरील चौकट]
ठाम तरीही नम्र
अमेरिकेतील सिडर पॉइंट, ओहायो येथे १९१९ मध्ये भरवलेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या (सध्या ज्यांना यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाते) अधिवेशनात, त्या काळी कार्यावर देखरेख करणारे ५० वर्षीय जे. एफ. रदरफोर्ड अधिवेशनाला येणाऱ्यांचे सामानसुमान उचलून त्यांना आपापल्या खोल्यांमध्ये घेऊन जाण्याचे काम स्वेच्छेने करत होते. अधिवेशनाच्या शेवटल्या दिवशी, त्यांनी श्रोत्यांमध्ये जमलेल्या ७,००० जणांना या शब्दांनी रोमांचित करून टाकले: ‘तुम्ही राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याचे राजदूत असून लोकांना आपल्या प्रभूच्या वैभवी राज्याची घोषणा करत आहात.’ बंधू रदरफोर्ड अतिशय ठाम मताचे होते, सत्याविषयी अत्यंत आवेशाने व जोरदारपणे बोलणारे म्हणून ज्ञात होते परंतु त्याच वेळी ते देवापुढे खरोखरच नम्र होते; त्यांची ही नम्रता सहसा बेथेलमधील सकाळच्या उपासनेतील त्यांच्या प्रार्थनांमधून दिसून येत असे.
[९ पानांवरील चित्र]
स्तेफन, शास्त्रवचनांत पारंगत होता; त्याने नम्रपणे पंक्तिसेवा केली
[१० पानांवरील चित्र]
मनश्शेने लीनता दाखवल्यामुळे यहोवा संतुष्ट झाला
[१२ पानांवरील चित्र]
दानीएल ‘परमप्रिय पुरुष’ कसा बनला?