व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लोट काय होते आणि ते इतके महत्त्वपूर्ण का होते?

ते समांतर, शेजारी शेजारी असलेल्या रकान्यांत हिब्रू, ग्रीक आणि लॅटिनमध्ये निवडक मजकूर असलेले त्याचप्रमाणे अरेमिकमध्ये काही भाग असलेले छापील बहुभाषिक बायबल होते. या बहुभाषिक बायबलचे निर्माणकार्य, मूळ भाषांतील अधिक अचूक भाषांतर बनवण्यातील सर्वात मोठे पाऊल होते.—४/१५, पृष्ठे २८-३१.

• मानव देवाचे मन आनंदित कसे करू शकतात?

एक जिवंत व्यक्‍ती या नात्याने, यहोवा विचार करू शकतो, कार्य करू शकतो आणि त्याला भावनाही आहेत. तो ‘आनंदी देव’ आहे आणि आपला उद्देश पूर्ण करण्यात त्याला आनंद वाटतो. (१ तीमथ्य १:११, NW; स्तोत्र १०४:३१) यहोवाच्या भावनांची आपल्याला जितकी अधिक जाणीव असेल तितकेच देवाचे मन आनंदित करण्याबद्दल आपण दक्ष असू.—५/१५, पृष्ठे ४-७.

• दाविदाने आपली पत्नी मिखल हिला तेराफीमची मूर्ती बाळगण्यास परवानगी का दिली?

दावीदाला ठार मारण्याचा राजा शौलाने कट रचला तेव्हा, मिखलने दाविदाला पळून जाण्यास मदत केली आणि जी कदाचित माणसाच्या आकाराची मूर्ती होती ती पलंगावर निजवली. मिखलने तेराफीमची मूर्ती बाळगली असावी कारण तिचे मन पूर्णपणे यहोवाच्या बाजूने नव्हते. दावीदाला कदाचित या तेराफीम प्रतिमेविषयी काही माहीत नसावे किंवा ती राजा शौलाची मुलगी असल्यामुळे त्याने कदाचित तिला ती बाळगू दिली असावी. (१ इतिहास १६:२५, २६)—६/१, पृष्ठ २९.

• रक्‍ताविषयी देवाने दिलेल्या आज्ञेमागे कोणते मूलभूत सत्य होते?

जलप्रलयानंतर देवाने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राद्वारे व प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ मधील आज्ञेद्वारे, त्याने येशूने आपल्या बलिदानाद्वारे वाहिलेल्या रक्‍ताकडे अंगुली दर्शवली. केवळ या रक्‍तानेच आपण आपल्या पापांची क्षमा मिळवू शकतो आणि देवाबरोबर शांती प्राप्ती करू शकतो. (कलस्सैकर १:२०)—६/१५, पृष्ठे १४-१९.

• बायबलमध्ये येशूच्या किती चमत्कारांचा उल्लेख आहे?

शुभवर्तमानाच्या अहवालांत येशूच्या ३५ चमत्कारांचा उल्लेख केला आहे. परंतु, ज्यांच्याविषयीचा अहवाल दिलेला नाही त्या चमत्कारांसोबत त्याने एकूण किती चमत्कार केले हे सांगितलेले नाही. (मत्तय १४:१४)—७/१५, पृष्ठ ५.