थकलो पण खचलो नाही
थकलो पण खचलो नाही
“दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, . . . भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.”—यशया ४०:२८, २९.
१, २. (अ) शुद्ध उपासना करू इच्छिणाऱ्या सर्वांना कोणते अपीलकारक आवाहन देण्यात आले आहे? (ब) आपल्या आध्यात्मिकतेला कशामुळे गंभीर धोका संभवू शकतो?
आपण येशूचे शिष्य आहोत, त्याअर्थी आपल्याला त्याचे हे अपीलकारक आवाहन ओळखीचे आहे: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. . . . कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) ख्रिश्चनांना ‘प्रभूजवळून विश्रांतीचे समय’ देखील देऊ करण्यात आले आहेत. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) बायबलची सत्ये शिकून घेतल्याने, भविष्याकरता एक उज्ज्वल आशा मिळाल्याने व तुमच्या जीवनात यहोवाच्या तत्त्वांचे पालन केल्याने जे तजेलादायक परिणाम घडून येतात ते नक्कीच तुम्ही स्वतः अनुभवले असतील.
२ तरीसुद्धा यहोवाच्या उपासकांपैकी काहींना वेळोवेळी भावनिकरित्या खचून गेल्यासारखे वाटते. कधीकधी ही निराशा केवळ काही काळ राहते तर कधीकधी ती बऱ्याच काळपर्यंत चालत राहते. काळाच्या ओघात काहींना त्यांच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या, येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे विसावा देणाऱ्या न वाटता ओझ्यासमान वाटू लागतात. अशाप्रकारच्या नकारात्मक भावनांमुळे एका ख्रिस्ती व्यक्तीच्या यहोवासोबतच्या नातेसंबंधाला गंभीर धोका संभवू शकतो.
३. योहान १४:१ येथे दिलेला सल्ला येशूने का दिला?
३ येशूला अटक झाली व वधस्तंभावर खिळण्यात आले त्याच्या केवळ काही काळाआधीच त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरहि विश्वास ठेवा.” (योहान १४:१) प्रेषितांना लवकरच दुःखदायक घटना सोसाव्या लागणार होत्या, हे ओळखून येशूने हे शब्द उद्गारले. यानंतर त्यांना तीव्र छळाला तोंड द्यावे लागणार होते. येशूला माहीत होते की प्रेषित पूर्णपणे निराश होऊन आध्यात्मिकरित्या अडखळून पडू शकतात. (योहान १६:१) दुःखद भावनांना बांध न घातल्यास ते आध्यात्मिकरित्या कमजोर होऊन, यहोवावरचा त्यांचा भरवसा नाहीसा होण्याचीही शक्यता होती. आजही ख्रिश्चनांच्या बाबतीत हेच खरे आहे. दीर्घकाळापर्यंत निराशाजनक भावना राहिल्यास आपल्याला अनेक मानसिक यातना होऊ शकतात आणि यामुळे आपले हृदय भारावून जाऊ शकते. (यिर्मया ८:१८) आपले मनोधैर्य खचू शकते. आणि या दबावाखाली आपण भावनिक व आध्यात्मिकरित्या दुर्बल होऊन, यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा पूर्णपणे नाहीशी होऊ शकते.
४. आपण खचून जाऊ नये म्हणून आपल्या लाक्षणिक हृदयाचे रक्षण करण्याकरता कोणती गोष्टी आपली मदत करेल?
४ म्हणूनच बायबलचा सल्ला अगदी योग्य आहे: “सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) बायबल आपल्याला व्यवहारोपयोगी सल्ला देते की ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या लाक्षणिक हृदयाचे निराशा व आध्यात्मिक थकव्यापासून रक्षण करू शकतो. पण सर्वप्रथम, आपण का खचून गेलो आहोत याचे नेमके कारण शोधणे आवश्यक आहे.
ख्रिस्ती मार्गाक्रमण जाचक नाही
५. ख्रिस्ती शिष्यत्वासंबंधी कोणता विरोधाभास आहे असे वाटते?
५ अर्थात, ख्रिस्ती या नात्याने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता कठीण परिश्रम घ्यावे लागतात हे खरे आहे. (लूक १३:२४) येशूने तर म्हटले, “जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.” (लूक १४:२७) वरवर पाहिल्यास, आपले ओझे हलके आहे आणि आपण विसावा देऊ या येशूच्या विधानाशी वरील शब्दांची तुलना केल्यास आपल्याला विरोधाभास आढळेल, पण खरे पाहता यांत काहीही विरोधाभास नाही.
६, ७. आपली उपासना पद्धत थकवा आणणारी नाही असे का म्हणता येईल?
६ कठीण परिश्रम आणि मेहनत जरी शारीरिकरित्या माणसाला थकवू शकते तरीसुद्धा चांगल्या कारणासाठी ती केली जाते तेव्हा त्यामुळे समाधान आणि विसावा मिळतो. उपदेशक ३:१३, २२) आणि आपल्या शेजाऱ्यांना बायबलमधील अद्भुत सत्ये सांगण्यापेक्षा अधिक चांगले कारण कोणते असू शकते? तसेच देवाच्या उच्च नैतिक दर्जांनुसार जगल्यामुळे आपल्याला जे उत्तम परिणाम अनुभवायला मिळतात त्यांच्या तुलनेत आपल्याला यासाठी करावा लागणारा संघर्ष नगण्य ठरतो. (नीतिसूत्रे २:१०-२०) आपला छळ होतो तेव्हा देखील आपण देवाच्या राज्याकरता हाल सोसणे यास एक बहुमानच समजतो.—१ पेत्र ४:१४.
(७ येशूचे ओझे खरोखरच विसावा देणारे आहे; खासकरून जे खोट्या धर्माच्या जुवाखाली राहतात त्यांच्या आध्यात्मिक अंधकाराशी तुलना केल्यास याची सत्यता पटते. देवाला आपल्याविषयी कोमल प्रीती आहे आणि त्यामुळे तो कधीही आपल्याला पेलणार नाहीत अशा अपेक्षा आपल्याकडून करत नाही. यहोवाच्या “आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) शास्त्रवचनात प्रकट केलेले ख्रिस्ती मार्गाक्रमण निश्चितच जाचक नाही. स्पष्टपणे, आपली उपासना पद्धत ही कधीही थकवा व निराशा यांना कारणीभूत ठरू शकत नाही.
‘सर्व भार टाकून द्या’
८. आध्यात्मिकरित्या थकून जाण्याचे सहसा काय कारण असते?
८ आध्यात्मिकरित्या जर आपल्याला खचून गेल्यासारखे वाटत आहे तर सहसा याचे कारण या भ्रष्ट व्यवस्थीकरणामुळे आपल्यावर टाकला जाणारा अतिरिक्त दबाव हे असू शकते. “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” त्यामुळे आपल्याभोवती सर्वत्र आपल्याला थकविणाऱ्या आणि आपले ख्रिस्ती संतुलन बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत. (१ योहान ५:१९) अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतल्यास आपला ख्रिस्ती नित्यक्रम गुंतागुंतीचा होऊन बिघडू शकतो. हे अतिरिक्त भार आपल्यावर दबाव आणतात आणि आपल्याला अगदी पस्त करून टाकतात. म्हणून बायबल अगदी योग्य सल्ला देते की ‘आपण सर्व भार टाकून द्यावा.’—इब्री लोकांस १२:१-३
९. भौतिक गोष्टींचा ध्यास घेतल्यामुळे कशाप्रकारे आपल्यावर दबाव येऊ शकतो?
९ उदाहरणार्थ, जग आज प्रतिष्ठा, पैसा, मनोरंजन, पर्यटन आणि इतर भौतिक कार्यांना खूप जास्त महत्त्व देते; याचा आपल्याही विचारसरणीवर परिणाम होऊ शकतो. (१ योहान २:१५-१७) धनसंपत्तीच्या मागे लागलेल्या पहिल्या शतकातील काही ख्रिश्चनांनी आपल्या जीवनात अनेक गंभीर समस्या ओढवून घेतल्या. प्रेषित पौल याचा खुलासा करतो: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.
१०. येशूने बी पेरणाऱ्याचा जो दृष्टान्त दिला त्यावरून आपण धनसंपत्तीविषयी काय शिकू शकतो?
१० देवाच्या आपल्या सेवेत आपल्याला थकल्यासारखे व निराश वाटते तेव्हा, कदाचित भौतिक गोष्टींच्या आकर्षणामुळे तर आपल्या आध्यात्मिकतेचा ऱ्हास होत नसावा? हे सहज घडू शकते. येशूने बी पेरणाऱ्याचा जो दृष्टान्त दिला होता त्यावरून हे सूचित होते. येशूने “प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ” यांची तुलना काट्यांशी केली जे ‘आपल्यामध्ये शिरून’ आपल्या अंतःकरणात देवाच्या वचनाचे जे बी पेरण्यात आले आहे, त्याची “वाढ खुंटवितात.” (मार्क ४:१८, १९) म्हणूनच बायबल आपल्याला असा सल्ला देते: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’”—इब्री लोकांस १३:५.
११. आपल्यावर अतिरिक्त भार टाकणाऱ्या वस्तू आपण कशाप्रकारे गुंडाळून ठेवू शकतो?
११ कधीकधी, आणखी वस्तू मिळवण्याच्या प्रयत्नाने नव्हे
तर आपल्याजवळ आधीपासूनच ज्या वस्तू आहेत, त्यांचा आपण ज्याप्रकारे उपयोग करतो त्यामुळे आपल्या जीवनात गुंतागुंत निर्माण होते. काहीजण गंभीर आरोग्य समस्या, जवळच्या माणसांपासून ताटातूट किंवा इतर दुःखदायी समस्यांमुळे भावनिकरित्या खचून जातात. वेळोवेळी आपल्या जीवनात काही फेरबदल करण्याची गरज ते ओळखतात. एका विवाहित जोडप्याने आपले काही छंद आणि अनावश्यक वैयक्तिक प्रकल्प गुंडाळून ठेवण्याचे ठरवले. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या वस्तूंची पाहणी केली आणि या छंदांशी किंवा कार्यप्रकल्पांशी संबंधित असलेले सर्व सामान व साहित्य अक्षरशः बांधून, दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवले. वेळोवेळी आपणही आपल्या सवयींची व आपल्याजवळ असलेल्या वस्तूंची पाहणी केली आणि अनावश्यक भार ठरू शकणाऱ्या अशा सर्व गोष्टी मार्गातून काढून टाकल्या तर आपल्याला बराच फायदा होईल; यामुळे आपले मन खचून आपण थकून जाणार नाही.वाजवी आणि नम्र दृष्टिकोन आवश्यक
१२. आपल्या स्वतःच्या चुकांसंबंधाने आपण काय ओळखले पाहिजे?
१२ आपल्या स्वतःच्या चुका, मग त्या क्षुल्लक बाबतीत का असेनात, त्या हळूहळू आपल्या जीवनात गुंता निर्माण करू शकतात. दाविदाचे शब्द किती खरे आहेत: “माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.” (स्तोत्र ३८:४) सहसा थोडेफार व्यावहारिक फेरबदल केल्याने या जड ओझ्यांपासून आपण मुक्ती मिळवू शकतो.
१३. वाजवी दृष्टिकोन आपल्याला आपल्या सेवाकार्याविषयी संतुलित दृष्टिकोन ठेवण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो?
१३ बायबल आपल्याला व्यावहारिक बुद्धी, किंवा “चातुर्य व विवेक” अर्थात, विचारशक्ती विकसित करण्याचे प्रोत्साहन देते. (नीतिसूत्रे ३:२१, २२) बायबल म्हणते, “वरून येणारे ज्ञान हे . . . सौम्य,” म्हणजेच वाजवी असते. (याकोब ३:१७) काहींना वाटते की ख्रिस्ती सेवाकार्यात इतरजण जितके करतात तितकेच आपणही केले पाहिजे आणि यामुळे त्यांच्या जीवनात तणाव येतो. पण बायबल आपल्याला असा सल्ला देते: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:४, ५) सहख्रिस्ती बांधवांचे उत्तम उदाहरण आपल्याला यहोवाची मनापासून सेवा करण्याकरता प्रोत्साहन देते यात शंका नाही; पण व्यावहारिक बुद्धी आणि वाजवी दृष्टिकोन आपल्याला स्वतःच्या परिस्थितीनुसार जीवनात वास्तविक ध्येये ठेवण्यास मदत करेल.
१४, १५. आपल्या शारीरिक व भावनिक गरजा भागवण्याकरता आपण व्यावहारिक बुद्धीचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो?
१४ अगदी क्षुल्लक भासणाऱ्या बाबतीतही जेव्हा आपण वाजवी दृष्टिकोन ठेवतो, तेव्हा थकवा येण्यापासून आपण स्वतःला सांभाळू शकतो. उदाहरणार्थ, उत्तम शारीरिक आरोग्याला पोषक अशा सवयी आपण स्वतःला लावतो का? यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तरात सेवा करत असलेल्या एक विवाहित दांपत्याचे उदाहरण पाहा. थकवा टाळण्याकरता व्यावहारिक बुद्धीचे महत्त्व त्यांनी ओळखले आहे. पत्नी म्हणते: “आम्हाला कितीही काम असले तरीसुद्धा आम्ही दररोज ठरलेल्या वेळी झोपण्याचा प्रयत्न करतो. तसेच आम्ही नियमित व्यायाम करतो. यामुळे आम्हाला खरोखर खूप फायदा झाला आहे. आम्हाला आमच्या मर्यादांची
जाणीव झाली आहे आणि त्यानुसारच आम्ही काम करतो. काहीजणांना असामान्य उत्साह असतो, पण आम्ही त्यांच्याशी आपली तुलना करण्याचा प्रयत्न करत नाही.” आपण नियमितरित्या पौष्टिक आहार व पर्याप्त विश्रांती घेतो का? आपल्या प्रकृतीकडे योग्य प्रमाणात लक्ष दिल्यास, भावनिक व आध्यात्मिक थकव्याची भावना आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो.१५ आपल्यापैकी काहींच्या गरजा असामान्य असतात. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती बहिणीने पूर्णवेळेच्या सेवेत कित्येक आव्हानात्मक नेमणुका पार पाडल्या आहेत. तिला कर्करोगाव्यतिरिक्त, इतर गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा कठीण समस्यांना तोंड देण्यास कशामुळे तिला मदत मिळाली आहे? ती म्हणते: “मला कधीकधी एकांताची आणि पूर्णपणे शांत वातावरणाची गरज असते. माझा तणाव व थकवा वाढू लागला की मला अशा निवांत क्षणांची, शांतपणे वाचन करण्याची व विश्रांती घेण्याची अतिशय गरज भासू लागते.” व्यावहारिक बुद्धी आणि विचारशक्ती आपल्याला आपल्या वैयक्तिक गरजा ओळखून त्या भागवण्यास मदत करते जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक थकवा टाळता येईल.
यहोवा देव आपल्याला सामर्थ्य देतो
१६, १७. (अ) आपल्या आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे का आहे? (ब) आपल्या दैनंदिन नित्यक्रमात आपण कशाचा समावेश केला पाहिजे?
१६ अर्थात, आपल्या आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यहोवा देवासोबत आपला घनिष्ठ नातेसंबंध असल्यास, आपण शारीरिकरितीने जरी थकलो तरीसुद्धा त्याची उपासना करण्यास आपण कधीही थकणार नाही. यहोवा स्वत: “भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.” (यशया ४०:२८, २९) प्रेषित पौलाने स्वतः या शब्दांची सत्यता अनुभवली होती; त्याने लिहिले: “आम्ही धैर्य सोडीत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.”—२ करिंथकर ४:१६.
१७ “दिवसानुदिवस” या शब्दाकडे लक्ष द्या. यावरून सूचित होते की आपण यहोवाच्या तरतुदींचा दररोज फायदा घेतला पाहिजे. ४३ वर्षे मिशनरी म्हणून विश्वासूपणे सेवा केलेल्या एका बहिणीला बऱ्याचदा शारीरिक थकवा व निराशेला तोंड द्यावे लागले. पण ती खचली नाही. ती म्हणते: “दररोज इतर कोणतेही काम सुरू करण्याआधी यहोवाला प्रार्थना करण्यासाठी आणि त्याचे वचन वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मी सकाळी लवकर उठण्याची सवय लावली आहे. या दैनंदिन नित्यक्रमामुळे आतापर्यंत टिकून राहणे मला शक्य झाले आहे.” आपण नियमितपणे, होय “दिवसानुदिवस” यहोवाला प्रार्थना केली आणि त्याच्या उदात्त गुणांविषयी व त्याच्या प्रतिज्ञांविषयी मनन केले तर निश्चितच यहोवाच्या जीवनदायक सामर्थ्यावर विसंबून राहू शकतो.
१८. वाढत्या वयाला अथवा आजारपणाला तोंड देत असलेल्या विश्वासू बांधवांना बायबलमध्ये कोणते सांत्वन देण्यात आले आहे?
१८ ज्यांना वाढत्या वयामुळे व आजारपणामुळे निराश वाटते त्यांच्याकरता हे विशेषतः सहायक ठरू शकते. हे बांधव स्वतःची तुलना इतरांशी केल्यामुळे नव्हे, तर पूर्वी ते स्वतःच जितके साध्य करत होते त्याच्याशी आपल्या कार्यांची तुलना केल्यामुळे खिन्न होतात. यहोवा या वयस्क बांधवांचा सन्मान करतो ही जाणीव किती सांत्वनदायक आहे! बायबल म्हणते: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १६:३१) यहोवाला आपल्या मर्यादांची कल्पना आहे आणि आपल्या दुर्बलतांना तोंड देऊन आपण मनापासून त्याची उपासना करतो तेव्हा तो त्याची कदर करतो. आपण जी चांगली कार्ये आजपर्यंत केली आहेत ती कायमची देवाच्या स्मरणात राहतील. शास्त्रवचने आपल्याला आश्वासन देतात की: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) अनेक दशकांपासून यहोवाला निष्ठावान राहिलेल्या अशा बांधवांचा सहवास खरोखर किती आनंददायक आहे!
हिंमत हारू नका
१९. चांगले करण्यात व्यग्र राहिल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
१९ अनेकांचे मत आहे की नियमितरित्या कठीण शारीरिक परिश्रम केल्याने थकवा कमी होतो. त्याचप्रकारे नियमित आध्यात्मिक कार्यांत सहभाग घेतल्यामुळे भावनिक व आध्यात्मिक थकव्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. बायबल म्हणते: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी गलतीकर ६:९, १०) “चांगले करण्याचा” आणि “बरे करावे” या वाक्यांशांकडे लक्ष द्या. यावरून आपण सक्रिय असणे आवश्यक आहे असे सूचित होते. इतरांकरता चांगली कार्ये केल्यामुळे खरोखरच आपण यहोवाच्या सेवेत थकून जाण्याचे टाळू शकतो.
पीक पडेल. तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (२०. निराशा टाळण्याकरता आपण कोणाचा सहवास टाळला पाहिजे?
२० याउलट, देवाच्या नियमांची कदर नसलेल्या लोकांसोबत सहवास व कार्य करणे आपल्याकरता एक थकविणारे ओझे बनू शकते. बायबल आपल्याला बजावून सांगते: “दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खामुळे होणारा मनःस्ताप ह्या दोहोहून भारी असतो.” (नीतिसूत्रे २७:३, NW) निराशा व थकव्याच्या भावना येऊ नयेत म्हणून, आपण सतत नकारात्मक विचार करण्याऱ्यांचा किंवा नेहमी इतरांच्या चुका काढण्याची व टीका करण्याची सवय असलेल्यांचा सहवास टाळल्यास बरे होईल.
२१. ख्रिस्ती सभांमध्ये आपण इतरांना प्रोत्साहन कसे देऊ शकतो?
२१ ख्रिस्ती सभा या आपल्याला आध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण करण्याकरता यहोवाने केलेल्या तरतूदी आहेत. तेथे आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देण्याची आणि तजेलादायक शिक्षण व सहवासाचा आनंद लुटण्याची उत्तम संधी मिळते. (इब्री लोकांस १०:२५) मंडळीतल्या सर्वांनी सभांमध्ये उत्तरे देताना किंवा व्यासपीठावरून कार्यक्रमात सहभाग घेताना, इतरांना उभारी मिळेल अशाप्रकारे बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षक या नात्याने मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांवर खासकरून इतरांना उत्तेजन देण्याची जबाबदारी आहे. (यशया ३२:१, २) सल्ला किंवा ताडन देण्याची गरज उद्भवते तेव्हासुद्धा इतरांना तजेला मिळेल अशीच आपली बोलण्याची ढब असावी. (गलतीकर ६:१, २) इतरांबद्दल आपले प्रेम आपल्याला थकून न जाता यहोवाची सेवा करण्यास मदत करेल.—स्तोत्र १३३:१; योहान १३:३५.
२२. अपरिपूर्ण मानव यानात्याने आपण दुर्बल असलो तरीसुद्धा आपण धैर्य का बाळगू शकतो?
२२ या अंतकाळात यहोवाची उपासना करणे परिश्रमाचे आहे. तसेच मानसिक थकवा, भावनिक दुःख आणि तणावपूर्ण परिस्थितीच्या दुष्परिणामांपासून ख्रिस्ती देखील सुटलेले नाहीत. अपरिपूर्ण मानव या नात्याने आपण दुर्बल आहोत. नाजूक मातीच्या भांड्यांसारखे. तरीसुद्धा, बायबल म्हणते, “आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.” (२ करिंथकर ४:७) होय, आपण थकू पण आपण कधीही खचून जाऊ नये, हिंमत हारू नये. उलट, “आपण धैर्याने [म्हणावे,] प्रभु मला साहाय्य करणारा आहे.”—इब्री लोकांस १३:६.
संक्षिप्त उजळणी
• ओझ्यासमान ठरू शकतील असे कोणते काही भार आपण टाळू शकतो?
• आपल्या सहख्रिस्ती बांधवांप्रती ‘बरे करण्यात’ आपण कशाप्रकारे सहभाग घेऊ शकतो?
• आपण थकतो किंवा निराश होतो तेव्हा यहोवा आपल्याला कशाप्रकारे सांभाळतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२३ पानांवरील चित्र]
दीर्घकाळापर्यंत निराशेच्या भावना प्रेषितांना अपायकारक ठरू शकतात हे येशूला माहीत होते
[२४ पानांवरील चित्र]
काहींनी आपले छंद आणि अनावश्यक वैयक्तिक कार्ये त्यागली आहेत
[२६ पानांवरील चित्र]
आपल्याला अनेक मर्यादा असूनही यहोवा मनापासून केलेल्या आपल्या सेवेची अतिशय कदर करतो