“हो, तुम्ही असंच केलं पाहिजे!”
“हो, तुम्ही असंच केलं पाहिजे!”
अलेक्सीस, हा पाच वर्षांचा आहे. तो मेक्सिकोतील मोरेलिया शहरात राहतो; त्याचे आईवडील बायबलचा अभ्यास करतात आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहतात. एकदा आपल्या कुटुंबाबरोबर तो एका विभागीय संमेलनाला गेला; तेथे त्याने घरोघरी प्रचार करण्याविषयी एक प्रात्यक्षिक पाहिले. पटकन् आपल्या वडिलांकडे पाहत त्याने त्यांना विचारले: “पप्पा, प्रचार कार्याला तुम्ही का जात नाही?” त्याच्या वडिलांनी उत्तर दिले: “म्हणून तर मी अजूनही अभ्यास करतोय!” अलेक्सीसने लगेच त्यांना म्हटले: “हो, तुम्ही असंच केलं पाहिजे!”
या लहानशा मुलाला, यहोवाविषयीच्या ज्ञानाच्या अनुषंगात कार्य करण्याची गरज आहे हे समजले. त्याच्या मावशीची दोन मुले त्याच्याबरोबरच राहत असल्यामुळे त्याने पहिल्यांदा यहोवाला प्रार्थना केली आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला बायबल कथांचं माझं पुस्तक यातून सांगितलेल्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या. अलेक्सीसला नीट वाचता येत नव्हते तरीपण चित्रे पाहून तो संपूर्ण कथा सांगू शकत होता. देवाच्या उद्देशांविषयी मी जे शिकत आहे ते लोकांना त्यांच्या घरी जाऊन मला सांगायचं आहे, असेही तो म्हणाला.
खरेच, तरुण आणि वृद्ध असे दोघेही आपले जीवन “पवित्र प्रभू” यहोवा जे अपेक्षितो त्याच्या सामंजस्यात आणू शकतात आणि राष्ट्रांमध्ये त्याच्याविषयीची साक्ष देण्याचा सर्वथोर सुहक्क प्राप्त करू शकतात. (यशया ४३:३; मत्तय २१:१६) हा एखाद्याच्या जीवनातील सर्वोत्तम अनुभव ठरू शकतो, यात काही शंका नाही.