“कोण योग्य आहे हे शोधून काढा”
“कोण योग्य आहे हे शोधून काढा”
दमिष्क अर्थात डमास्कस हे आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या शतकातले भरभराट होत असलेले शहर होते. याच्या आजूबाजूला फळबागा असल्यामुळे, पूर्वेकडच्या देशांतून येणाऱ्या तांड्यांसाठी ते एका मरूवनासारखे होते. येशू ख्रिस्ताचा मृत्यू होऊन जास्त काळ लोटला नव्हता तेव्हा तेथे एक ख्रिस्ती मंडळी स्थापन झाली. या मंडळीचे सदस्य, सा.यु. ३३ साली जेरूसलेममध्ये पेन्टेकॉस्टच्या सणादरम्यान येशूचे अनुयायी बनलेले यहुदी होते. (प्रेषितांची कृत्ये २:५, ४१) स्तेफनाला दगडमार करून ठार मारल्यानंतर सुरू झालेल्या छळामुळे यहुदीयातले काही शिष्य डमास्कसला राहायला आले असावेत.—प्रेषितांची कृत्ये ८:१.
सा.यु. ३४ साली कदाचित, डमास्कसमधील हनन्या नावाच्या एका ख्रिश्चनाला एक अनोखी नेमणूक मिळाली. प्रभूने त्याला सांगितले: “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे.”—प्रेषितांची कृत्ये ९:११.
नीट नावाचा रस्ता सुमारे दीड किलोमीटर लांब होता आणि तो डमास्कसच्या मध्यभागातून जात होता. या पानावरील १९ व्या शतकातल्या कोरीव चित्रावरून आपल्याला, प्राचीन काळी हा रस्ता कसा दिसायचा त्याची कल्पना येईल. रस्ता ज्याप्रकारे बनवला होता त्यामुळे हनन्याला यहुदाचे घर शोधून काढायला जरा वेळच लागला असावा. सरतेशेवटी त्याला यहुदाचे घर सापडले आणि आणि त्याच्या भेटीची फलश्रुती म्हणजे, शौल नंतर सुवार्तेचा एक आवेशी उद्घोषक अर्थात प्रेषित पौल बनला.—प्रेषितांची कृत्ये ९:१२-१९.
येशूने आपल्या शिष्यांना प्रचाराला पाठवले आणि जे सुवार्तेसाठी ‘योग्य आहेत त्यांना शोधून काढा’ असे सांगितले. (मत्तय १०:११) तर हनन्याने अक्षरशः शौलाला शोधून काढले. हनन्याप्रमाणे यहोवाचे साक्षीदार हर्षाने योग्य असलेल्यांना शोधून काढतात आणि लोक जेव्हा राज्याच्या सुवार्तेचा स्वीकार करतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. अशा वेळी, योग्य लोकांना शोधून काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे चीज होते.—१ करिंथकर १५:५८.
[३२ पानांवरील चित्र]
आधुनिक दिवसातला ‘नीट नावाचा रस्ता’
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
From the book La Tierra Santa, Volume II, १८३०