व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

काही विदेशी लोकांबरोबर सोयरीक करू नको अशी मोशेच्या नियमशास्त्रात आज्ञा देण्यात आली होती तरीसुद्धा इस्राएली पुरुषांना बंदिवान करून आणलेल्या विदेशी स्त्रियांबरोबर विवाह करण्याची परवानगी का देण्यात आली?—अनुवाद ७:१-३; २१:१०, ११.

याला काही विशिष्ट परिस्थितींमध्येच परवानगी होती. यहोवाने इस्राएली लोकांना, कनान प्रदेशातील सात राष्ट्रांतील शहरांचा समूळ नाश करून त्यातील सर्व रहिवाशांना ठार मारण्याची आज्ञा दिली होती. (अनुवाद २०:१५-१८) इतर राष्ट्रांच्या बाबतीत, यांतून बचावणारे, केवळ बंदिवान करून आणलेल्या प्रौढ कुमारी स्त्रिया होत्या. (गणना ३१:१७, १८; अनुवाद २०:१४) एक इस्राएली पुरुष अशा स्त्रीबरोबर लग्न करू शकत होता पण तिलाही याआधी काही गोष्टी करायच्या होत्या.

तिला कोणकोणत्या गोष्टी करायच्या होत्या याविषयी बायबल म्हणते: “तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावी. मग तिने आपल्या परस्वाधीन स्थितीतली वस्त्रे टाकून तुझ्या घरी एक महिनाभर आपल्या आईबापासाठी शोक करावा; ह्‍यानंतर तू तिच्यापाशी जावे म्हणजे तू तिचा पति होशील व ती तुझी पत्नी होईल.”—अनुवाद २१:१२, १३.

एक इस्राएली पुरुष जिच्याबरोबर विवाह करू इच्छितो त्या बंदिवान करून आणलेल्या कुमारिकेला आपल्या डोक्याचे मुंडन करायचे होते. शोक किंवा दुःख व्यक्‍त करण्याकरता मुंडन केले जात असे. (यशया ३:२४) जसे की कुलपिता ईयोबाची सर्व मुले मरण पावली आणि त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली तेव्हा त्याने शोक व्यक्‍त करण्यासाठी आपले डोके मुंडिले. (ईयोब १:२०) बंदिवान करून आणलेल्या कुमारिकेला आपली नखे देखील कापायची होती; कदाचित ‘अगदी बारीक कापायची’ होती जेणेकरून तिची नखे रंगवलेली असली तरीसुद्धा ती आकर्षक दिसणार नाहीत. (अनुवाद २१:१२, नॉक्स) ही “परस्वाधीन स्थितीतली वस्त्रे” काय होती जी तिला उतरवायची होती? ज्यांना बंदिवान करून नेले जाई अशा कनानी शहरातल्या स्त्रियांमध्ये, उत्तमातला उत्तम पोशाष परिधान करण्याची प्रथा होती. असे केल्याने त्या कैद करून आणणाऱ्‍याची मर्जी प्राप्त करू शकतील असे त्यांना वाटायचे. तर, बंदिवान म्हणून आणलेल्या स्त्रीला शोक व्यक्‍त करताना हे वस्र उतरवायचे होते.

इस्राएली पुरुष जिच्याबरोबर लग्न करू इच्छितो त्या स्त्रिला तिच्या मृत प्रिय जनांसाठी एक चांद्र मासासाठी शोक करायचा होता. कनान शहरांचा अशारीतीने नाश करावयाचा होता, की या स्त्रीच्या एकाही नातेवाईकाला किंवा तिच्या ओळखीच्या कोणालाही जिवंत सोडायचे नव्हते. इस्राएली लोकांनी तिच्या मूर्तींचा नाश केलेला असल्यामुळे तिच्या सर्व उपासना वस्तूंचा समूळ नाश झालेला असे. शोक करण्याचा एक महिना, शुद्धीकरणाचा महिना असे ज्यात बंदिवान म्हणून आणलेली स्त्री स्वतःला, तिच्या गत धार्मिक उपासनेशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींपासून मुक्‍त करू शकत होती.

परंतु इतर बाबतीत विदेशी स्त्रियांची गोष्ट वेगळी होती. याबाबतीत यहोवाने अशी आज्ञा दिली: “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नको व त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नको.” (अनुवाद ७:३) ही आज्ञा का देण्यात आली होती? अनुवाद ७:४ म्हणते: “कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील.” इस्राएली लोकांना धार्मिक भ्रष्टतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही आज्ञा देण्यात आली होती. परंतु अनुवाद २१:१०-१३ मध्ये वर्णन केलेल्या परिस्थितीत, विदेशी स्त्रीकडून हा धोका नव्हता. तिचे सर्व आप्तजन मरण पावलेले असत आणि तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचा नाश केलेला असे. खोट्या धर्माचे आचरण करणाऱ्‍यांशी तिचा कसलाही संपर्क नसे. अशा परिस्थितीत एका इस्राएली पुरुषाला एका विदेशी स्त्रीबरोबर लग्न करण्याची परवानगी होती.