व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भरवशालायक वारसा

भरवशालायक वारसा

भरवशालायक वारसा

“इतर कोणाचाही जिच्यावर दावा नाही अशा एका मोठ्या इस्टेटीचे तुम्ही नुकतेच वारसदार बनला आहात, असा संदेश तुम्हाला मिळाल्यास, सावध राहा. हा फसवणुकीचा प्रकार असू शकतो.”

संयुक्‍त संस्थानांतील टपाल निरीक्षण संस्थेने आपल्या वेब साईटवर वरील इशारा दिला. का? कारण हजारो लोकांना पत्राद्वारे असे कळवण्यात आले होते, की ‘तुमच्या एका नातलगाचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मागे त्यांच्या संपत्तीचे तुम्ही वारसदार आहात.’ हे पत्र वाचून अनेकांनी या तथाकथित ‘इस्टेटीचा रिपोर्ट’ मिळवण्याकरता ३० डॉलरची फी पाठवली. यात, ही इस्टेट नेमकी कोठे आहे आणि तिच्याकरता दावा कसा करता येईल याविषयी माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण त्यांची घोर निराशा झाली. पत्राचे उत्तर देणाऱ्‍या सर्वांना एकच रिपोर्ट पाठवण्यात आला—अर्थातच यांपैकी कोणालाही काहीएक मिळणार नव्हते.

अशा फसव्या स्कीम्स कशाच्या भरवशावर चालतात? तर, आपल्याला वारसा मिळावा या मनुष्याच्या नैसर्गिक इच्छेच्या भरवशावर. बायबलही आपल्या संततीकरता वारसा ठेवणाऱ्‍यांबद्दल अनुकूल भाष्य करते: “चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांस वतन ठेवितो.” (नीतिसूत्रे १३:२२) किंबहुना, या संदर्भात खुद्द येशू ख्रिस्ताने केलेले एक विधान सर्वश्रुत आहे व बरेच लोक ते अतिशय प्रेमळपणे मनात बाळगतात: “जे लीन ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.”—मत्तय ५:५, पं.र.भा.

येशूच्या या शब्दांवरून, अनेक शतकांआधी प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याला जे लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती, त्याची आपल्याला आठवण होते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.

“पृथ्वीचे वतन”—किती हवेहवेसे वाटणारे भवितव्य! पण हा देखील फसवणुकीचा प्रकार नाही अशी शाश्‍वती आपल्याला मिळू शकते का? होय, नक्की मिळू शकते. पृथ्वी ही यहोवाच्या अद्‌भुत निर्मितीचा एक भाग असल्यामुळे, तिचा रचनाकार व मालक या नात्याने त्याला ती आपल्या मर्जीनुसार कोणाच्याही सुपूर्द करण्याचा अधिकार आहे. राजा दावीद याच्याद्वारे यहोवाने आपला प्रिय पुत्र, येशू ख्रिस्त याला हे भविष्यसूचक वचन दिले: “माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन.” (स्तोत्र २:८) या कारणास्तव, पौलाने येशूबद्दल असे म्हटले, की “[देवाने] त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले.” (इब्री लोकांस १:२) त्याअर्थी, जे लीन त्यांना ‘पृथ्वीचे वतन मिळेल’ असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा त्याने अतिशय प्रामाणिक हेतूने ही प्रतिज्ञा केली; शिवाय, ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता योग्य अधिकार त्याच्याकडे आहे याचीही आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो.—मत्तय २८:१८.

पण सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न उद्‌भवतो, की ही प्रतीज्ञा कशी पूर्ण होणार? आज कोठेही पाहिले तर आक्रमक आणि गर्विष्ठ प्रवृत्तीच्याच लोकांचा वरचष्मा आहे; त्यांना जे हवे ते त्यांना मिळते, नव्हे ते हिसकावून घेतात. मग लीन जनांचा प्रश्‍नच कोठे येतो? शिवाय, प्रदूषणामुळे पृथ्वी आज गंभीर समस्यांनी पीडित आहे आणि स्वार्थी व संधीसाधू लोक तिच्या साधनांचा आपल्या फायद्याकरता वाटेल तसा उपयोग करत आहेत. मग पृथ्वी वतन म्हणून मिळण्यालायक स्थितीत असेल का? या व इतर महत्त्वपूर्ण प्रश्‍नांच्या उत्तरांकरता आम्ही तुम्हाला पुढील लेख वाचून पाहण्याचे निवेदन करतो.

[३ पानांवरील चित्र]

तुम्हाला खरोखरचा वारसा मिळणार का?