व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्रेषित योहानाने जेव्हा “पूर्ण प्रीति भीति घालवून देते” असे लिहिले तेव्हा त्याला “पूर्ण प्रीति” म्हणजे काय म्हणायचे होते आणि ही कोणती “भीति” आहे जिला घालवून दिले जाते?

प्रेषित योहानाने लिहिले: “प्रीतिच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीति बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.”—१ योहान ४:१८.

संदर्भावरून दिसून येते, की योहान देवावरील प्रेम आणि त्याच्याबरोबर संभाषण करण्याचा मनमोकळेपणा यांच्यातील संबंधाची चर्चा करत होता. हे १७ व्या वचनात आपल्याला वाचायला मिळते जेथे म्हटले आहे: “न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य [मनमोकळेपणा] असावे म्हणून त्याची प्रीति आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे.” एका ख्रिश्‍चन व्यक्‍तीचे देवावर असलेले प्रेम आणि देवाचे तिच्यावरील प्रेमाची जाणीव याचा, तिच्यावर थेट परिणाम होतो व ती एकतर देवाला मनमोकळपणाने प्रार्थना करू शकते किंवा करू शकत नाही.

“पूर्ण प्रीति” हा शब्दांश अर्थपूर्ण आहे. बायबलमध्ये उपयोग केल्याप्रमाणे, “पूर्ण” या शब्दाचा नेहमीच संपूर्ण अर्थाने परिपूर्णता म्हणजे कमाल परिपूर्णता नव्हे तर सापेक्ष अर्थाने परिपूर्णता असा होतो. उदाहरणार्थ, डोंगरावरील आपल्या प्रवचनात येशूने म्हटले: “ह्‍यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” येशू आपल्या अनुयायांना सांगत होता, की त्यांनी जर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्‍यांवरच प्रेम केले तर त्यांचे प्रेम हे अपूर्ण, अपुरे, सदोष असेल. त्यांनी प्रेम दाखवण्यात परिपूर्ण असले पाहिजे अर्थात आपल्या शत्रूंवरही प्रेम दाखवले पाहिजे. त्याचप्रकारे, योहानाने जेव्हा ‘पूर्ण प्रीतिविषयी’ लिहिले तेव्हा तो देवाविषयीच्या प्रेमाविषयी बोलत होता जे पूर्ण मनापासून, परिपक्व आणि एखाद्या जीवनातील सर्व पैलूंत लागू होणारे आहे.—मत्तय ५:४६-४८; १९:२०, २१.

देवाला प्रार्थना करताना एखाद्या ख्रिश्‍चनाला ही जाणीव असते, की तो पापी व अपरिपूर्ण आहे. परंतु, देवाबद्दलचे त्याचे प्रेम आणि देवाला त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव यांची पूर्ण वाढ झाली असेल तर त्याला निर्भत्सनेची किंवा अस्वीकार होण्याची भीती वाटणार नाही. उलट, आपल्या मनात काय आहे हे तो मनमोकळेपणाने सांगेल आणि येशू ख्रिस्ताद्वारे देवाने प्रेमळपणे केलेल्या खंडणी बलिदानाच्या तरतूदीच्या आधारावर क्षमा मागेल. आपल्या विनवण्या देव निश्‍चित ऐकेल याची त्याला खात्री वाटेल.

एक व्यक्‍ती ‘प्रीतीत परिपूर्ण’ कशी होऊ शकेल व त्याद्वारे निर्भत्सनेची किंवा अस्वीकाराची भीती मनातून “घालवून” देऊ शकेल? “जो कोणी त्याच्या [देवाच्या] वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीति खरोखर पूर्णत्व पावली आहे,” असे प्रेषित योहानाने म्हटले. (१ योहान २:५) विचार करा: आपण पापी असतानाही देवाने जर आपल्यावर प्रेम केले तर, आपण खरोखर पश्‍चात्ताप केला आणि मनापासून ‘त्याच्या वचनाप्रमाणे चाललो’ तर तो आपल्यावर आणखी प्रेम करणार नाही का? (रोमकर ५:८; १ योहान ४:१०) होय, आपण जोपर्यंत विश्‍वासू राहू तोपर्यंत प्रेषित पौलाप्रमाणे खात्री बाळगू शकतो; देवाविषयी त्याने असे म्हटले: “ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही?”—रोमकर ८:३२.