व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भौतिक गोष्टींची हाव

भौतिक गोष्टींची हाव

भौतिक गोष्टींची हाव

“आपण केव्हाही तृप्त नसलो तर, पुरे हा शब्द आपल्या शब्दकोशात कधीच नसेल.”—वर्ल्डवॉच इन्स्टिट्यूटतर्फे एक अहवाल.

“आपल्याला काय हवे आहे? सर्व काही. केव्हा हवे आहे? आता.” १९६० च्या दशकातील काही कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये हे घोषवाक्य लोकप्रिय होते. आज, आपल्याला तंतोतंत हेच शब्द ऐकायला मिळणार नाहीत परंतु मूळ कल्पना मात्र आजही अस्तित्वात आहे. होय, भौतिक गोष्टींची हाव आपल्या युगाचे गुणलक्षण आहे.

आज, धनसंपत्ती गोळा करणे हे पुष्कळ लोकांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे ध्येय बनले आहे. माजी यु.एस. अध्यक्ष जिमी कार्टर एकदा म्हणाले होते: “आता, मानवाचे अस्तित्व, त्याच्या कर्तृत्वाने नव्हे तर त्याच्याजवळ जे आहे त्याने ओळखले जाते.” पण संपत्तीपेक्षाही महत्त्वपूर्ण अशी मूल्ये आहेत का? आहेत तर ती कोणती आहेत आणि त्यांच्यामुळे कोणता फायदा मिळू शकतो?