व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचलेल्या माहितीचे चित्र तुम्ही डोळ्यापुढे उभे करू शकता का?

वाचलेल्या माहितीचे चित्र तुम्ही डोळ्यापुढे उभे करू शकता का?

वाचलेल्या माहितीचे चित्र तुम्ही डोळ्यापुढे उभे करू शकता का?

तुम्ही ज्या ठिकाणांविषयी वाचता त्यांच्याशी परिचित झाल्यास तुम्हाला त्यांचे चित्र डोळ्यापुढे उभे करता येईल. उदाहरणार्थ, बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील प्रेषित पौलाच्या मिशनरी दौऱ्‍यांचा विचार करा. येशूच्या अनुयायांना जेथे पहिल्यांदा ख्रिस्ती म्हटले गेले त्या अंत्युखियापासून पौलाचा पहिला मिशनरी दौरा सुरू झाला. तेथून तो सलमीना, पिसिदियातील अंत्युखिया, इकुन्या, लुस्त्र आणि दर्बे या ठिकाणी गेला. ही ठिकाणे कोठे होती यांचे चित्र तुम्ही डोळ्यापुढे उभे करू शकता का?

जोपर्यंत तुमच्याकडे नकाशा नाही तोपर्यंत तुम्ही असे करू शकणार नाही. ‘उत्तम देश पाहा’ (इंग्रजी) या ३६ पानी नवीन माहितीपत्रकात असा एक नकाशा आहे. अमेरिकेतील माँटाना येथील एका वाचकाने असे कृतज्ञापूर्वक विधान केले: “मी पौलाला प्रवास करताना पाहू शकते, प्रवासासाठी त्याने कोणत्या माध्यमाचा उपयोग केला असावा, त्याने व इतर प्राचीन ख्रिश्‍चनांनी सुवार्तेचा प्रसार कसा केला असावा याचे चित्र मी डोळ्यापुढे उभे करण्याचा प्रयत्न करते. हे अतिशयी उपयोगी साधन पुरवल्याबद्दल आभारी आहे.”

या माहितीपत्रकातील पौलाच्या प्रवासाचा नकाशा, वाचकाला बायबलमध्ये दिलेल्या वर्णनाची कल्पना करण्यास मदत करणाऱ्‍या अनेक नकाशांपैकी एक आहे. सोबतचे कुपन भरून ते दिलेल्या पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ २ वरील उचित पत्त्यावर पाठवून तुम्ही ‘उत्तम देश पाहा’ (इंग्रजी) या माहितीपत्रकाविषयी आणखी माहिती मागवू शकता.

□ कसल्याही बाध्यतेविना, मी ‘उत्तम देश पाहा’ (इंग्रजी) या माहितीपत्रकाविषयी आणखी माहिती पाठवण्याची विनंती करत आहे.

□ कृपया मोफत गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.