व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरी सुरक्षितता आपल्याला कधी मिळेल का?

खरी सुरक्षितता आपल्याला कधी मिळेल का?

खरी सुरक्षितता आपल्याला कधी मिळेल का?

आ पल्या पालकांबरोबर आनंदाने बागडणारी मुले कोणाला पाहायला आवडत नाही? प्रेमळ पालकांच्या उपस्थितीत मुलांना कसलीही भीती वाटत नाही. तरीपण कित्येक लहान मुलांच्या वाट्याला हे सुख येत नाही. काही मुलांना दररोज, जमीन हाच बिछाना आणि आकाश हेच पांघरुण असते. अशा निराश्रीत मुलांसाठी आणि सुरक्षितता नसलेल्या वातावरणात राहणाऱ्‍या इतर लोकांसाठी काही आशा आहे का?

भविष्य अंधकारमय वाटत असले तरी, देवाचे वचन आशा देते. संदेष्टा यशया याने असे भाकीत केले, की सर्व जण पूर्ण सुरक्षिततेत जगतील असा एक दिवस येत आहे. त्याने लिहिले: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२.

पण या आशेला भक्कम आधार आहे का? कारण, “आशा” या शब्दावरून नेहमीच निश्‍चितता सूचित होत नाही. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये एक म्हण सर्रास वापरली जाते: “आशा सर्वात शेवटी मरते.” या म्हणीचा शब्दशः असा अर्थ होतो, की पुष्कळ लोक, आशा बाळगण्याचा खरा आधार नसतानाही आशावादी राहतात. परंतु, जिवंत देवाने आपल्याला दिलेली आशा वेगळी आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “त्याच्यावर विश्‍वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही.” (रोमकर १०:११) आधीच पूर्ण झालेल्या बायबल भविष्यवाणींवरून ही खात्री मिळते, की यहोवा देवाने केलेली इतर सर्व अभिवचने देखील निश्‍चित पूर्ण होतील. ही अभिवचने पूर्ण झाल्यावर पुन्हा कधीही मुलांना रस्त्यांवर राहणे भाग पडणार नाही.

आजही बायबलमधील व्यावहारिक सल्ला आशा नसलेल्यांना आपले जीवन सुधारण्यास व खरी सुरक्षितता शोधण्यास मदत करू शकतो. ते कसे शक्य आहे? तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्या या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास आनंद वाटेल.