व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्भय जगाची तुम्हाला उत्कंठा आहे का?

निर्भय जगाची तुम्हाला उत्कंठा आहे का?

निर्भय जगाची तुम्हाला उत्कंठा आहे का?

“आज आपल्यावर ‘दहशतीचे व . . . लाचारीचे’ सावट पसरले आहे कारण . . . धोका आपल्यावर कधी, केव्हा आणि कोणत्या प्रकारे झडप घालेल, हे आपल्याला माहीत नाही.”

मागच्या वर्षाच्या न्यूजवीक मासिकातील या शब्दांवरून, गोंधळ माजलेल्या आजच्या जगात राहणाऱ्‍या लोकांच्या भावना प्रतिबिंबित होतात. जवळच्या भविष्यात लोकांच्या अशा भावना अधिकच वाढतील असे येशू ख्रिस्ताने सूचित केले. त्याने अशा एका काळाविषयी भाकीत केले जेव्हा, राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील व भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. परंतु आपल्याला घाबरून जाण्याचे किंवा असाहाय्य वाटण्याचे कोणतेही कारण नसेल, कारण येशूने पुढे असेही म्हटले, की “ह्‍या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२५-२८.

या मुक्‍तीनंतर आपल्या लोकांच्या पृथ्वीवरील जीवनाविषयीचे वर्णन देताना यहोवा देवाने म्हटले: “माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” (यशया ३२:१८) संदेष्टा मीखाद्वारे यहोवाने म्हटले: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.

हे वर्णन आजच्या जीवनापेक्षा किती वेगळे आहे! कोणत्याही अज्ञात धोक्याचे सावट मानवजातीला घाबरवून टाकणार नाही. दहशत व लाचारी या ऐवजी अंतहीन शांती आणि आनंदाची परिस्थिती असेल.