व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अतिशय सुरेख” भाषांतर

“अतिशय सुरेख” भाषांतर

“अतिशय सुरेख” भाषांतर

एका अंदाजानुसार, १९५२ ते १९९० पर्यंत, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची ५५ नवीन भाषांतरे प्रकाशित करण्यात आली होती. भाषांतर कसे करायचे याविषयी अनुवादकांना स्वातंत्र्य असल्यामुळे साहजिकच कोणतेही दोन अनुवाद एकसारखे नसतात. भाषांतरकाराच्या कामाची विश्‍वसनीयता ठरवण्यासाठी, अमेरिकेच्या ॲरिझोनातील फ्लॅगस्टाफ येथील नॉर्दन ॲरिझोना युनिव्हर्सिटीत धार्मिक अभ्यासांचे सहप्राध्यापक जेसन बिडून यांनी अचूकतेकरता आठ प्रमुख भाषांतरांचे परीक्षण केले व तुलना केली; यात यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) देखील होते. त्यांनी काय निष्कर्ष काढला?

नवे जग भाषांतर यात भाषांतरकारांनी निवडलेले काही शब्द त्यांना पटले नाहीत; पण तरीसुद्धा, नवे जग भाषांतर “अतिशय सुरेख” भाषांतर आहे, आणि त्यांनी ज्यांचे परीक्षण केले त्या भाषांतरांपैकी काही भाषांतरांच्या तुलनेत “बऱ्‍यापैकी उत्तम आहे,” आणि “सुसंगतपणे उत्तम” आहे, असे म्हटले. बिडून शेवटी म्हणाले, की त्यांनी तुलना केलेल्या इतर भाषांतरांपैकी एकूणच, नवे जग भाषांतर “नव्या कराराच्या सध्या उपलब्ध असलेल्या इंग्रजी भाषांतरांपैकी सर्वात अचूक भाषांतर आहे.”—ट्रूथ ट्रान्सलेशन: ॲक्यूरसी ॲण्ड बायस इन इंग्लिश टान्सलेशन्स ऑफ द न्यू टेस्टमेंट.

बिडून यांना असेही आढळले, की पुष्कळ भाषांतरकारांवर, “आधुनिक वाचकांना हवे तसे व जसे म्हणायला पाहिजे असे वाटते तसे बायबल वाक्यांशांचा सारांश सांगण्याचा किंवा फुगवून सांगण्याचा दबाव आणण्यात आला आहे.” परंतु, नवे जग भाषांतर हे, “नव्या कराराच्या लेखकांच्या मूळ वाक्यांशांचे शब्दशः व सावधगिरी बाळगून केलेले अगदी अचूक भाषांतर असल्यामुळे ते वेगळे आहे,” असे बिडून पुढे म्हणाले.

नवे जग बायबल भाषांतर समितीने, नवे जग भाषांतराच्या प्रस्तावनेत कबूल केले आहे, की पवित्र शास्त्रवचनांचे त्यांच्या मूळ भाषांतून आधुनिक भाषेत भाषांतर करण्याचे काम “अतिशय जबाबदारीचे काम” आहे. या समितीने पुढे म्हटले: “पवित्र शास्त्रवचनांच्या ईश्‍वरी लेखकाबद्दल भीती बाळगणाऱ्‍या व त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या या अनुवादकांना, त्याचे विचार आणि त्याच्या आज्ञा होता होईल तितक्या अचूकतेने विदित करण्याची खास जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे असे वाटते.”

पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) याचे पहिले प्रकाशन १९६१ मध्ये झाले; तेव्हापासून याची ३२ भाषांत आणि ब्रेलमधील दोन आवृत्त्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवे जग भाषांतराची ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने, किंवा “नवा करार,” आणखी १८ भाषांत आणि एक ब्रेल आवृत्तीत उपलब्ध आहे. तुमच्या भाषेत हे भाषांतर उपलब्ध असेल तर, देवाच्या वचनाचे या आधुनिक व “अतिशय सुरेख” भाषांतराचे वाचन करण्याचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत.