पदवीदान दिन —अप्रतिम दिन
पदवीदान दिन —अप्रतिम दिन
“आजचा दिवस खरोखरच अप्रतिम दिवस आहे. लख्ख प्रकाश, निळेभोर आकाश, हिरवेगार गवत आणि जोडीला पक्ष्यांचे मंजूळ गाणे. अगदी सुखद वातावरणात आपण आहोत, आपली निराशा होणार नाही. यहोवा निराश करणारा देव नाही. तो आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे.”
या शब्दांनी, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य, बंधू सॅम्युएल हर्ड यांनी, वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ११७ व्या वर्गाच्या पदवीदान समारंभाची सुरवात केली. सप्टेंबर ११, २००४ रोजी हा समारंभ होता. या उत्तम कार्यक्रमात, उभारणीकारक बायबल आधारित सल्ला तसेच स्थानीय व मिशनरी क्षेत्रातील अनुभव होते. होय, न्यू यॉर्क पॅटरसन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रात तसेच ब्रुकलिन व वॉलकिलमधील इमारतींमध्ये जमलेल्या सर्व ६,९७४ जणांसाठी हा अप्रतिम दिवस होता. ब्रुकलिन व वॉलकिलमध्ये जमलेल्यांना ऑडिओ व व्हिडिओवरून हा कार्यक्रम पाहायला व ऐकायला मिळाला.
विद्यार्थ्यांसाठी उत्तेजनपर शब्द
अमेरिकेतील शाखा समितीचे सदस्य असलेल्या बंधू जॉन किकॉट यांनी, “मिशनरी या नात्याने आपला आनंद टिकवून ठेवा,” या विषयावर प्रोत्साहनदायक भाषण दिले. गिलियड विद्यार्थी त्यांच्या आनंदासाठी नावाजले जातात व पदवीदानाच्या दिवशीसुद्धा हे दिसून येत होते, असे ते म्हणाले. प्रशालेच्या दरम्यान शास्त्रवचनांतून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला व आता ते इतरांना हा आनंद मिळावा म्हणून मदत करण्यास सज्ज आहेत. ते कसे? मिशनरी म्हणून आपल्या सेवाकार्याला स्वतःस वाहून घेण्याद्वारे. येशूने म्हटले होते: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) इतरांना सत्य उपलब्ध करून देणारा ‘धन्यवादित देव’ यहोवा याचे जेव्हा हे नवीन मिशनरी अनुकरण करतील तेव्हा त्यांनाही आपला आनंद टिकवून ठेवण्यास मदत मिळेल.—१ तीमथ्य १:११.
कार्यक्रमातील पुढील भाषण, नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य, बंधू डेव्हीड स्प्लेन यांनी दिले; त्यांच्या भाषणाचा विषय होता: “लोकांबरोबर तुम्ही जमवून घेऊ शकाल का?” ऐक्याने एकत्र राहणे चांगले व मनोरम आहे, यात काही शंका नाही; परंतु यासाठी “सर्वांना सर्व काही” होण्याची गरज असेल. (१ करिंथकर ९:२२; स्तोत्र १३३:१) बंधू स्प्लेन म्हणाले, की पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, मिशनरी कार्यात अनेक लोकांशी—क्षेत्रातील लोकांशी, सहमिशनऱ्यांशी, त्यांच्या नवीन मंडळीतील बंधूभगिनींशी आणि प्रचार व शिकवण्याच्या कार्यासंबंधी मार्गदर्शन देणाऱ्या शाखा दप्तरातील बांधवांशी संपर्क येईल. अशावेळी, व्यक्तिगत नातेसंबंध होता होईल तितके मैत्रीपूर्ण कसे करता येतील यासंबंधाने त्यांनी काही व्यावहारिक सूचना दिल्या; जसे की, स्थानीय भाषा शिकून घेतल्याने, स्थानीय रूढीपरंपरांची जाणीव बाळगल्याने, सहमिशनऱ्यांना स्वतःसाठी काही वेळ हवा असतो याचा विचार केल्याने व जे पुढाकार घेतात अशा बांधवांच्या अधीन राहिल्याने त्यांना मदत होऊ शकेल.—इब्री लोकांस १३:१७.
योहान ७:२४) अपरिपूर्ण मानव असल्यामुळे, ‘देवाच्या गोष्टींकडे लक्ष’ देण्याऐवजी आपण सर्व ‘माणसांच्या गोष्टींकडे लक्ष’ देणार नाही यासंबंधाने खबरदारी बाळगली पाहिजे. (मत्तय १६:२२, २३) आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ लोकांनीही आपल्या विचारसरणीत फेरबदल करत राहिले पाहिजेत. समुद्रात असलेल्या एका जहाजाप्रमाणे, आता फेरबदल केल्याने एकतर ध्येय साध्य होऊ शकते किंवा आध्यात्मिक नौकाभंग घडू शकतो. यासंदर्भात सतत बायबलचा अभ्यास केल्याने आपल्याला ‘देवाच्या गोष्टींवर लक्ष’ लावण्यास मदत मिळते.
नंतर, गिलियड प्रशालेचे प्रशिक्षक, बंधू लॉरेन्स बोव्हन यांनी, “तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष देता?” या प्रश्नवजा विषयावर भाषण दिले. ‘वरवर पाहून न्याय’ करणाऱ्यांनी येशूला मशीहा म्हणून स्वीकारले नाही, अशी त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली. (गिलियड प्रशालेचे आणखी एक प्रशिक्षक, वॉलस लिव्हरन्स यांनी कार्यक्रमातील या भागाची सांगता केली. “तुम्ही काय विकत घ्याल?” हा त्यांच्या भाषणाचा विषय यशया ५५:१ [पं.र.भा.] वर आधारित होता. आजच्या दिवसांसाठी देवाच्या भविष्यसूचक संदेशातून येणारा तजेला, आनंद आणि पोषण “विकत” घेण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले. यशयाच्या भविष्यवाणीने देवाच्या वचनाला, पाणी, द्राक्षारस आणि दुध यांची उपमा दिली. हे “पैक्यावाचून व मोलावाचून” विकत कसे काय घेता येईल? बायबल भविष्यवाणीकडे लक्ष देण्याद्वारे व शारीरिक विचारसरणी व मार्गाक्रमणाऐवजी देवाचे विचार व मार्ग स्वीकारण्याद्वारे हे विकत घेता येतील, असे बंधू लिव्हरन्स यांनी सांगितले. (यशया ५५:२, ३, ६, ७) असे केल्याने, नवीन मिशनऱ्यांना आपल्या विदेशी नेमणुकीत टिकून राहायला मदत मिळेल. सौख्यानंद, ऐषोआरामाचा पिच्छा केल्यावरच मिळतो, असा अपरिपूर्ण लोक विचार करतात. “पण, तुम्ही हे विकत घेऊ नका. तुम्ही असा विचार करू नका. देवाच्या भविष्यसूचक वचनाचा अर्थपूर्ण अभ्यास करण्यासाठी वेळ काढा. यामुळेच तुम्हाला तजेला मिळेल, तुम्ही सशक्त व्हाल आणि तुमच्या मिशनरी नेमणुकीत तुम्हाला आनंद मिळेल,” असे वक्त्याने आर्जवले.
विद्यार्थ्यांचे आल्हाददायक अनुभव व मुलाखती
विद्यार्थ्यांनी प्रचार कार्यात नियमित भाग घेतला. आणखी एक गिलियड प्रशिक्षक, बंधू मार्क न्यूमर यांच्या “सुवार्तेची लाज वाटून घेऊ नका” असा विषय असलेल्या भाषणात, वर्गातील अनेकांनी, त्यांना आलेल्या अनुभवांचे नाट्य रुपांतर करून दाखवले. (रोमकर १:१६) हे अनुभवी साक्षीदार जेव्हा, घरोघरी जाऊन, रस्त्यावर, आणि शॉपिंग सेंटरमध्ये जाऊन त्यांनी कशाप्रकारे साक्ष दिली त्याचे अनुभव सांगत होते तेव्हा श्रोत्यांमधील सर्वांना ते भावले. इतर भाषा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मंडळीच्या क्षेत्रात त्यांची भाषा बोलणाऱ्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी पुढाकार घेतला. इतर विद्यार्थ्यांनी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल आधारित प्रकाशनांचा उत्तम प्रकारे उपयोग केला; पुनर्भेटींच्या वेळी व गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी त्यांनी यांचा उपयोग केला. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्यांना ‘लाज वाटली नाही.’
सेवा विभागात काम करणारे बंधू विल्यम नोनकीस यांनी, बुर्किना फासो, लॅटव्हिया व रशिया येथील अनुभवी मिशनऱ्यांची मुलाखत घेतली. “विश्वासू जणांना यहोवा प्रेमळपणे प्रतिफळ देतो” या विषयावर केंद्रित त्यांनी व्यावहारिक सल्ला दिला. गिदोनाच्या ३०० सैनिकांच्या सैन्याची आठवण करा, असे मुलाखत घेतलेल्या एका बांधवाने विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले. प्रत्येक सैनिकाला एक नेमणूक देण्यात आली होती ज्यामुळे गिदोनाची मोहीम यशस्वी झाली. (शास्ते ७:१९-२१) तसेच, आपल्या नेमणुकीत टिकून राहणाऱ्या मिशनऱ्यांना प्रतिफळ दिले जाते.
या नंतर, पॅटरसन येथे प्रशिक्षक असलेले, बंधू सॅम्यूएल रोबर्सन यांनी घेतलेल्या मुलाखतींत, “सर्वांसाठी सर्व काही होणे” या विषयावर भर देण्यात आली. त्यांनी, सेनेगल, ग्वाम, लायबेरिया आणि मदागास्कर येथून आलेल्या चार शाखा समितीच्या सदस्यांची मुलाखत घेतली. एकूण १७० मिशनरी या देशांत सेवा करतात. शाखा समित्या, नवीन मिशनऱ्यांना त्यांच्या नवीन नेमणुकीशी जुळवून घ्यायला कशाप्रकारे मदत करतात, हे पदवीधर विद्यार्थ्यांना समजले. नवीन मिशनऱ्यांना, पाश्चिमात्य संस्कृतीपासून अगदी वेगळ्या असलेल्या रूढीपरंपरा शिकवून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, काही देशांत, पुरुष मग ते ख्रिस्ती मंडळीतील असले तरी, हातात हात घालून मित्रांप्रमाणे रस्त्यावर चालताना दिसतात. ग्वाम शाखेच्या काही ठिकाणी, विचित्र अन्नपदार्थ दिले जातात. पण इतरांनी स्वतःला जुळवून घेतले आहे त्यामुळे नवीन मिशनरीसुद्धा जुळवून घेऊ शकतील.
नियमन मंडळाचे सदस्य, बंधू गाय पिअर्स यांनी, “‘आपल्या प्रभूच्या राज्याशी’ एकनिष्ठ राहा” या विषयावर भाषण दिले. त्यांनी श्रोत्यांना आठवण करून दिली: “निर्मितीमागे यहोवाचा एक उद्देश आहे. आपल्या सृष्टीसाठी त्याच्या मनात एक उद्देश होता. या पृथ्वीबद्दल त्याचा उद्देश बदललेला नाही. या उद्देशाची पूर्ती होण्याच्या मार्गावर आहे. कोणीही तो बदलू शकत नाही.” (उत्पत्ति १:२८) पहिला मनुष्य आदाम याच्या पापामुळे आलेल्या अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरीसुद्धा आपण देवाच्या सार्वभौमत्वाला एकनिष्ठपणे अधीन राहू या, असे बंधू पिअर्स यांनी सर्वांना उत्तेजन दिले. “आपण न्याय समयाच्या घडीत जगत आहोत. प्रांजळ मनाच्या लोकांना सत्याचे ज्ञान घेण्यास मदत करण्याकरता आपल्याकडे फार कमी वेळ उरला आहे. तेव्हा, इतरांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा,” असे बंधू पिअर्स यांनी आर्जवले. आज, देवाच्या राज्याची बाजू एकनिष्ठपणे घेणारे, यहोवाच्या पाठिंब्याची खात्री बाळगू शकतात.—स्तोत्र १८:२५.
कार्यक्रमाच्या शेवटल्या भागात, कार्यक्रमाच्या अध्यक्षकांनी, संपूर्ण जगभरातील शाखांकडून आलेले ख्रिस्ती प्रेम आणि शुभेच्छा वाचून दाखवल्या. यानंतर त्यांनी, पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या दिल्या; विद्यार्थ्यांपैकी एकाने, प्रशिक्षणाबद्दल मनापासून आभार व्यक्त करणारे वर्गाच्या वतीने लिहिलेले पत्र वाचून दाखवले. उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनावर कायमची छाप पडेल अशाप्रकारे, एका अप्रतिम दिनाची अतिशय उत्तमरीत्या समाप्ती झाली होती.
[२३ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ११
नेमलेले देश: २२
एकूण विद्यार्थी: ४८
सरासरी वय: ३४.८
सत्यात सरासरी वर्षे: १८.३
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.४
[२४ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११७ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.
(१) थॉमसन, ई.; नॉरवेल, जी.; पावेल, टी.; कोझा, एम.; मॅकिनटायर, टी. (२) रायली, ए.; क्लेटन, सी.; ॲलन, जे.; ब्लांको, ए.; मुनयोस, एल.; रुस्ताद, एन.; (३) गुरेरो, झेड.; गार्सिया, के.; मॅकर्ली, डी.; ईशिकावा, टी.; ब्लांको, जी.; (४) मॅकिनटायर, एस.; क्रूझ, ई.; गुरेरो, जे.; रिची, ओ.; अबेयानेथा, एल.; गार्सिया, आर.; (५) पावेल, जी.; फिसका, एच.; मुनयोस, वी.; बाऊमन, डी.; शॉ, एस.; ब्राऊन, के.; ब्राऊन एल.; (६) शॉ, सी.; रायली, ए.; पेलोक्वीन, सी.; म्युईंक, एन.; मॅकर्ली, डी.; ईशिकावा, के.; (७) म्युईंक, एम.; पेलोक्वीन, जे.; कोझा, टी.; अबेयानेथा, एम.; ॲलन, के.; रिची, ई.; नॉरवेल, टी.; (८) क्रूझ, जे.; बाऊमन, एच.; क्लेटन, झेड.; फिसका, ई.; थॉमसन, एम.; रुस्ताद, जे.