व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘माझ्या प्रशिक्षणाविषयी मी आनंदी आहे’

‘माझ्या प्रशिक्षणाविषयी मी आनंदी आहे’

माझ्या प्रशिक्षणाविषयी मी आनंदी आहे’

काझुना नावाच्या एका मुलीच्या शिक्षकाने तिला इंग्रजी व्याख्यान स्पर्धेत भाग घेण्याचे सुचवले, तेव्हा ती थक्क झाली. जपानच्या उत्तरेकडच्या प्रचंड होकायडो बेटावरील सर्व उच्च माध्यमिक शाळांसाठी ही स्पर्धा खुली होती. पण तिच्या शाळेने या आधी या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. स्पर्धेच्या दिवशी, काझुना अस्वस्थ होती कारण तिचा सामना इतर ५० विद्यार्थ्यांबरोबर होता. त्यातल्या त्यात, जेव्हा तिने इंग्रजी मातृभाषा असलेल्या दोन परिक्षकांना पाहिले तेव्हा तर तिच्या पोटात गोळाच आला.

विजेत्यांची घोषणा करण्यात आली, तेव्हा सर्वप्रथम छोट्या बक्षिसांच्या विजेत्यांची नावे पुकारण्यात आली. शेवटी जेव्हा काझुनाचे नाव पुकारण्यात आले तेव्हा तिच्या तोंडातून शब्द निघेना. ती व तिच्या शेजारी बसलेले शिक्षक आश्‍चर्याने एकमेकांकडे बघत राहिले. त्याच स्थितीत काझुनाने मंचावर जाऊन, आपल्याला मिळालेले प्रथम पारितोषिक स्वीकारले!

काझुनाने आनंदाने सांगितले, “यहोवाची संघटना, ईश्‍वरशासित सेवा प्रशालेद्वारे पुरवत असलेल्या प्रशिक्षणामुळेच हे शक्य झाले. मला हे प्रशिक्षण मिळाले, याचा मला खूप आनंद वाटतो.” ज्या प्रशालेत काझुना लहानपणापासून भाग घेत आली आहे, ती यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील एक सभा आहे. या स्पर्धेची तयारी करताना काझुनाने माईकचा वापर करणे, प्रेमळपणे व उत्साहाने बोलणे, हावभाव करणे, श्रोत्यांशी संपर्क साधणे, यांवर आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत शिकवल्या जाणाऱ्‍या इतर विषयांवर विशेष लक्ष दिले.

ही प्रशाला दर आठवडी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहात आयोजित केली जाते; ती कशी चालवली जाते हे येऊन पाहण्याचे आम्ही आपल्याला आमंत्रण देत आहोत. तरुण व वृद्ध या सभेचा कसा लाभ घेतात हे स्वतः पाहा. या सभा सर्वांसाठी खुल्या आहेत. तुमच्या घराजवळ ही प्रशाला कोठे चालवली जाते, यासंबंधी अधिक माहितीसाठी, कृपया तुमच्या भागातल्या यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.