व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भोजनाची वेळ केवळ खाण्याची वेळ नव्हे!

भोजनाची वेळ केवळ खाण्याची वेळ नव्हे!

भोजनाची वेळ केवळ खाण्याची वेळ नव्हे!

सर्वांनाच स्वादिष्ट भोजन आवडते. भोजनाबरोबर चांगले संभाषण व प्रिय जनांचा प्रेमळ सहवास नुसती भूख तृप्त करत नसून एक आनंदमय घटना बनते. बरीच कुटुंबे दिवसातील एक तरी भोजन एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. जेवणाच्या वेळी, दिवसभराच्या घटना किंवा योजनांची चर्चा करण्याची संधी मिळते. आपल्या मुलांच्या अभिप्रायांकडे व त्यांनी व्यक्‍त केलेल्या कल्पनांकडे लक्ष देणाऱ्‍या पालकांना त्यांचे विचार व भावना कळतात. कालांतराने भोजनाच्या वेळी आनंदी व मनोरंजक सहवासामुळे कुटुंबात सुरक्षितता, विश्‍वास आणि प्रेम निर्माण होते व त्या कुटुंबाला स्थैर्य लाभते.

आजकाल, कुटुंबातील बरेच सदस्य व्यग्र व धावपळीत असल्याने भोजनास एकत्र येणे कठिण जाते. जगातल्या काही भागातील स्थानिक संस्कृतींमध्ये, कुटुंबाने एकत्र भोजन करणे किंवा भोजनाच्या वेळी बोलणे याबद्दल नापसंती व्यक्‍त केली जाते. काही कुटुंबे भोजनाच्या वेळी टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे अर्थपूर्ण पद्धतीने विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी गमावतात. पण, ख्रिस्ती पालक नेहमी आपल्या कुटुंबाची उभारणी करण्याच्या संधींप्रती जागरूक असतात. (नीतिसूत्रे २४:२७) पुरातन काळात पालकांना असे सांगण्यात आले होते, की आपल्या मुलांना देवाच्या वचनाविषयीचे शिक्षण देण्याच्या संधींपैकी एक उत्कृष्ट संधी “घरी बसलेले असता” मिळू शकते. (अनुवाद ६:७) नियमितपणे मुलांबरोबर भोजनास बसल्याने पालकांना आपल्या मुलांमध्ये यहोवाबद्दल व त्याच्या धार्मिक तत्त्वांबद्दल गाढ प्रीती विकसित करण्याची अप्रतिम संधी मिळते. भोजनाच्या वेळी आनंदी व शांतीमय वातावरण राखल्याने तुम्ही आपल्या कुटुंबाकरता ही वेळ एक सुखदायक व उभारणीकारक अनुभव बनवू शकाल. तेव्हा, भोजनाची वेळ केवळ खाण्याची वेळ नव्हे!