व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“काय आहे याचं रहस्य?”

“काय आहे याचं रहस्य?”

“काय आहे याचं रहस्य?”

असा, फास्ट-फूड रेस्टॉरंटमधील एका वृद्ध माणसाने प्रश्‍न विचारला, तेव्हा तीन मुलांची आई असलेली म्यूरीअल आश्‍चर्यचकित झाली. म्यूरीअल आपल्या मुलांना डॉक्टरांकडे घेऊन गेली होती आणि तिथेच तिला बराच उशीर झालेला होता. यानंतर त्यांना एका ख्रिस्ती सभेलाही जायचे होते, पण तेथे जाण्याआधी घरी जाऊन काही खाण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे, तिने मुलांना जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये नेले.

त्यांचे खाणे होतंच आले होते, तेव्हा एक माणूस त्यांच्या जवळ येऊन म्यूरीअला म्हणाला: “मी तुम्हाला इथं आल्यापासून बघत आहे आणि मला तुमच्या मुलांमध्ये व इतर मुलांमध्ये फार मोठा फरक दिसून आला आहे. मुलं टेबल, खुर्च्या कशा हाताळतात ते तुम्ही बघितलं पाहिजे. त्यांचे पाय टेबलावर असतात. खुर्च्यांची आदळआपट चाललेली असते. पण तुमची मुलं इतकी शांत व चांगल्या वर्तणुकीची आहेत. काय आहे याचं रहस्य?”

म्यूरीअल म्हणाली: “आम्ही पतीपत्नी आमच्या मुलांबरोबर नियमित बायबलचा अभ्यास करतो आणि जे शिकतो ते आम्ही आमच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत.” यावर त्या माणसाने सांगितले: “मी स्वतः नात्सी शासनकाळात घडलेल्या हत्याकांडातून बचावलेला एक यहुदी आहे. जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांचा कसा छळ करण्यात आला हे मला आठवतं. तेव्हासुध्दा ते दुसऱ्‍यांपेक्षा खूप वेगळे होते. तुमच्या मुलांच्या चांगल्या वागणुकीने मी अतिशय प्रभावित झालो आहे. मला तुमच्या धर्माचं परीक्षण केलं पाहिजे.”

बायबल मुलांचे संगोपन करण्यात उत्तम मार्गदर्शन पुरवणारे पुस्तक आहे. यहोवाच्या साक्षीदारांना शास्त्रवचनात असलेल्या मार्गदर्शनाचा इतरांना लाभ घेण्यास मदत करण्याची मनःपूर्वक आस्था आहे. खालील निमंत्रण स्वीकारण्यास आम्ही आपणास हार्दिक निवेदन करतो.