व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या भविष्यावर कोणाचे नियंत्रण आहे?

तुमच्या भविष्यावर कोणाचे नियंत्रण आहे?

तुमच्या भविष्यावर कोणाचे नियंत्रण आहे?

जॉन ग्रे या उत्क्रांतीवाद्याने लिहिले: “प्राण्यांप्रमाणे मानवही आपल्या नशीबावर नियंत्रण ठेवू शकत नाही.” पण, यहुदी धर्माचा ज्ञानी मार्गदर्शक (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लेखक श्‍मुली बोटॉख यांनी अगदी याच्या उलट मत मांडले. ते म्हणतात: “मानव, प्राण्यांसारखा नाही त्यामुळे तो नेहमी आपल्या नशीबावर नियंत्रण ठेवतो.”

पुष्कळ लोक ग्रेंशी सहमत आहेत आणि ते असा विश्‍वास करतात, की आंधळी निसर्गशक्‍ती मानवाच्या नशीबावर नियंत्रण करते. इतर लोक असे मानतात, की मानवाला देवाने निर्माण केले आहे व त्याला आपल्या नशीबावर नियंत्रण ठेवण्याची ताकद देण्यात आली आहे.

काहींना वाटते, की शक्‍तिशाली मानवशक्‍ती त्यांच्या भवितव्यावर नियंत्रण ठेवतात. रॉय वेदरफोर्ड या लेखकानुसार, “जगातील बहुतांश लोकांचे—आणि खासकरून इतिहासातील बहुतांश स्त्रियांचे, आपल्या स्वतःच्या जीवनावर नियंत्रण नसते; याचे कारण म्हणजे मानवी जुलूम आणि शोषण.” (नियतिवादाचे ध्वनितार्थ) चढाओढ करणाऱ्‍या राजनैतिक किंवा लष्करी शक्‍तींमुळे, पुष्कळ लोकांना भवितव्याबद्दल त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुरा झाल्याचा प्रत्यय आला आहे.

संपूर्ण इतिहासात पुष्कळ लोकांना, अलौकिक शक्‍तींचे आपल्या नशीबावर नियंत्रण आहे असा त्यांचा ग्रह असल्यामुळे असाहाय्य वाटले. बोटॉख म्हणतात: “प्राचीन ग्रीक लोकांच्या मनात ही कल्पना होती की मानव, पूर्वनियोजित नशीब बदलू शकत नसल्यामुळे सर्व आशा निरर्थक आहेत.” प्रत्येक व्यक्‍तीचे नशीब, चंचल देवतांनी ठरवलेले आहे, असा या लोकांचा विश्‍वास होता. मनुष्य केव्हा मरेल आणि त्याला त्याच्या जीवनभर किती हाल आणि दुःख सोसावे लागतील, हेही या देवतांनी ठरवलेले असते, असा या लोकांचा विश्‍वास होता.

एक अलौकिक शक्‍ती मानवाच्या नशीबावर नियंत्रण करते, ही कल्पना आज सर्वसामान्य आहे. उदाहरणार्थ, पुष्कळ लोक किस्मत किंवा दैव यावर विश्‍वास ठेवतात. त्यांचे असे म्हणणे आहे, की देवाने सर्व मानवी कर्मांचा परिणाम आणि एखाद्याच्या मृत्यूची वेळ आधीच ठरवली आहे. याशिवाय, पूर्वनियोजनाचा सिद्धांत देखील प्रचलित आहे; सर्वसमर्थ देवाने, “प्रत्येक मानवाचे अंतिम तारण किंवा शिक्षा आधीच ठरवलेली आहे,” अशी या सिद्धांताची शिकवण आहे. अनेक तथाकथित ख्रिस्ती ही शिकवण मानतात.

तुम्ही काय विश्‍वास करता? तुमचे नशीब, पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या शक्‍तींनी आधीच ठरवले आहे का? की, “माणूस कधीकधी आपल्या दैवाचा धनी असतो,” असे ज्याने लिहिले त्या इंग्रज नाटककार विल्यम शेक्सपियर याच्या शब्दात काही तथ्य आहे? बायबल याबाबतीत काय म्हणते ते पाहू या.